Friday, September 8, 2017

कार घ्या,पण कोणती घेणार?

    सामान्यपणे कार खरेदी करताना ज्या गोष्टींचा गांभिर्याने विचार करायला हवा, त्यात प्रामुख्याने कारची आवश्यकताकंपनी ,लुक,  फिचर्स,  बजेट,सिक्युरिटी अथवा सेफ्टी, मेंटेनेंस आणि रिसेल वॅल्यू या गोष्टींचा समावेश होतो.पहिल्यांदाच कारची खरेदी करायला जात असाल तर या सगळ्या गोष्टींना महत्त्व अथवा प्राधान्य द्यावे लागणार आहे. जर तुम्ही एंट्री लेवलची कार खरेदी करणार असाल तर लक्षात घ्यायला हवे की, यातल्या वेगवेगळ्या मॉडेलमध्ये 20 ते 30 हजारपर्यंतचे अंतर असते. अशा परिस्थितीत कार खरेदी करण्यापूर्वी सेल्समनशी अगदी मनमोकळेपणाने चर्चा करा. प्रत्येक मॉडेल आणि त्याच्या फिचरच्याबाबतीत अगदी विस्ताराने जाणून घ्या आणि त्यांमधला फरक जाणून घ्या.त्यानंतरच मग तुमच्या गरजेनुसार कारची निवड करा.

     कार निवडण्यापूर्वी आपले बजेट निश्चित करा. कोणत्या किंमतीपर्यंत कार घ्यायची आहे, हे एकदा ठरले की, पुढच्या सगळ्या गोष्टी पाहताना अडचण येणार नाही.यानंतर निश्चित करा की, तुम्हाला आपल्या कुटुंबाच्यादृष्टीने पाच सिटर कार हवी आहे का त्यापेक्षाही अधिक. जर तुमचे कुटुंब लहान असेल आणि शहरही लहान असेल तर हॅचबॅक कार एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला सैरसपाटा करायचा असेल तर एसयूव्हीच्या जागी सॅलून सेगमेंट किंवा स्टेशन वॅगनला प्राधान्य द्या. एसयूव्ही सेगमेंटची किंमत अन्य सेगमेंटच्या तुलनेत अधिक असते. तुमचे कुटुंब मोठे असेल तर आणि फिरायची हौस असेल तर मात्र एसयूव्ही कार उपयुक्त आहे. या सेगमेंटमध्ये महिंद्रा क्वांटो, शेवरले इंजॉय, मारुती एर्टिगासारख्या गाड्या येतात. यातून तुम्ही अधिक लोकांसोबत लगेजसुद्धा जास्त घेऊन जाऊ शकता. जर तुम्ही एकाद्या स्पोर्टी लूकच्या मोठ्या कारच्या शोधात असाल तर एसयूव्ही गाड्या तुमच्यासाठी योग्य आहेत.या गाड्या ऑफ रोडलादेखीला चांगला परफॉर्मेंस देतात. या गाड्या आरामदायी आहेतच शिवाय लांबच्या प्रवासासाठी योग्य आहेत.मात्र मोठ्या ट्रॉफिकमध्ये चालवताना कधी कधी अडचण येऊ शकते.
     कार खरेदी करताना मायलेज पाहणंही महत्त्वाचं आहे. आजच्या परिस्थितीत एक कार अनेक इंजिनमध्ये उपलब्ध होते. जसं की, वॉक्सवॅगन, पोलो दोन वेगवेगळ्या इंजन 1.2 आणि 1.6 लीटरमध्ये उपलब्ध आहेत.चांगल्या कार मायलेजच्यादृष्टीने पाहता 1.2,1.6 लीटरच्या तुलनेत अधिक मोठे पर्याय आहेत. जर तुम्ही आठवड्यात 500 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करत असाल तर पेट्रोल किंवा सीएनजी कार घेणं फायद्याचं ठरेल.1000 किलोमीटरपेक्षा अधिकचा पल्ला जर तुमचा असेल तर डिझेल कार खरेदी करायला हरकत नाही. सीएनजी कारचा विचार करता, ती सुरक्षेच्यादृष्टीने कंपनी फिटेड सीएनजी किट उपयोगाची आहे.
     कार पाच प्रकारच्या असतात. यात वन बॉक्स कार, हॅचबॅक कार, सेडान कार, स्टेशन वॅगन आणि एसयूव्ही यांचा समावेश आहे. वन बॉक्स कारमध्ये इंजिन,पॅसेंजर आणि लगेज एकाच बॉक्समध्ये येतात., जसं की, मारुती ओमनी,टाटा ऐस मॅजिक. हॅचबॅकचा अर्थ अशा वाहनांचा होतो की, ज्यात इंजिन वेगळ्या केबिनमध्ये असते. मारुती स्विफ्ट,पोलो,ह्युंडाई आय 10 हॅचबॅक श्रेणीचे कार आहेत. सेडान अशी कार आहे, ज्यात इंजिन एरिया, प्रवासी एरिया आणि लगेज एरिया वेगवेगळ्या असतात. स्टेशन वॅगनदेखील सेडान कारच आहे. ज्यात छताचा भाग लांब असतो. एसयूव्ही याचा अर्थ स्पोर्ट्स युटिलिटी व्हीकलशी आहे. स्पोर्टी लूक कार मोठ्या असतात.
     या शिवाय मेंनटेंसवर लक्ष देणं महत्त्वाचं आहे.यासाठी कुठलीही नवीन कार खरेदी करण्यापेक्षा रनिंग मॉडेलला पसंदी देणं योग्य ठरेल.नव्या लॉन्च कारचा मेंटेनेंस महागात पडू शकतो.मात्र रनिंग कारचा मेंटेनेंस किफायतशीर पडतो. उदाहरणार्थ  मारुती आणि ह्युंडाईच्या कार गाड्यांना मेंटेनेंस कमी असतो.कारची निवड करण्यापूर्वी कंपनीद्वारा देण्यात येणार्या फ्री मेंटनेंस स्किमांचाही विचार केला जावा. काही कंपन्या फ्री सर्व्हिसिंगसारख्या स्किम्स चालवतात. अशा स्किम्स फायद्याच्या ठरतात. कारमध्ये तुम्हाला सहा ते सात प्रकारच्या रंगांचे ऑप्शन पाहायला मिळतात. मॅरून, पर्पल,गोल्ड आणि सिल्वर इत्यादी रंग मॅटेलिक रंगांचे असतात. यांची किंमतदेखील पांढर्या आणि काळ्या रंगांपेक्षा 15 ते 20 हजार रुपयांनी अधिक असते. अशा वेळेला नॉन मेटॅलिक रंगांना प्राधान्य द्या. यानंतर ज्या महत्त्वाच्या गोष्टी येतात,त्या म्हणजे फिचर्स,लूक आणि एक्सेसरीजच्या. कार फिचरसोबत वेगवेगळ्या मॉडेलमध्ये उपलब्ध असतात.फिचर आणि एक्सेसरीजनुसार मॉडेलची किंमत वेगवेगळी असते.उदाहरण द्यायचे म्हटले तर मारुती स्विफ्ट एलडीआय आणि झेडडीआय यांचे देता येईल. या दोघांमध्ये जवळपास एक लाखापेक्षा अधिक रुपयांचा फरक आहे. या मॉडेलचे फिचर्स आणि एक्सेसरीजदेखील खूपच वेगवेगळे असतात. जसं की एबीएस आणि एयरबॅग. दुसर्या फिचरमध्ये सनरुफ,म्युझिक सिस्टम किंवा नेविगेशन सिस्टम, सेंसर,कॅमेरा,ब्लूटूथ टॉप मॉडेलमध्ये मिळतात. पाहिजे असेल तर एलडीआय मॉडेल खरेदी करू शकता आणि कमी किंमतीत एक्सेसरीज बाहेरून घेऊन लावू शकता. यामुळे 50 ते 60 हजार रुपयांची बचत होते. इंश्योरेंसदेखील गरजेचे आहे. पण व्हिकल इंश्योरेंस अशावेळेला डोकेदुखीची ठरते, ज्यावेळेला तुम्हाला क्लेम घ्यायचा असेल तर! यासाठी या सगळ्या झंझटपासून मुक्तता मिळवायची असेल तर कॅशलेस प्लान घ्या, तो फायद्याचा आहे.(ऑटो एक्सपोटर्स यांच्याशी केलेल्या चर्चेच्या आधारावर)



No comments:

Post a Comment