Sunday, September 24, 2017

उलटे धावणे: व्यायाम आणि मनोरंजन

     वजन कमी करण्यासाठी एखादे रंजक व्यायाम प्रकार करायचा असेल तर रेट्रो रनिंग म्हणजेच उलटे धावणे चांगले आहे. यात तुम्हाला सरळ न धावता उलटे धावायचे असल्याने तुमचा व्यायाम तर होतोच, शिवाय मनोरंजनही होते. यामुळे तुमाचा फक्त स्टॅमिना वाढत नाही तर फिटनेसचा स्तरदेखील सुधारतो. एकाग्रता आणि शरीराचे संतुलन यावरदेखील उलटे धावण्याच्या प्रकाराने चांगला प्रभाव पडतो.
अलिकडेच झालेल्या एका संशोधनानुसार उलटे धावणे वजन कमी करण्यासाठी चांगला व्यायाम प्रकार आहे. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ सायन्समध्ये झालेल्या एका संशोधनानुसार सरळ धावण्याच्या तुलनेत उलटे धावण्याने मांसपेशींवर अधिक परिणाम होतो. खास करून पोटाच्या मांसपेशींवर विशेष असा अधिक प्रमाणात प्रभाव पडतो. त्याचबरोबर अशा धावण्याने 30 टक्क्यांपेक्षा अधिक कॅलरी वापरली जाते. यामुळे वजन वेगाने कमी होते.

पोश्चरवर पडतो प्रभाव
उलटे धावल्याने कंबर आणि मान सरळ राहते,त्यामुळे शरीराचे पोश्चर बिघडत नाही. मागच्या दिशेने धावण्याने सरळ धावण्याच्या तुलनेत अधिक ताकद लावावी लागते. त्यामुळे जास्त कॅलरी जळते. याशिवाय एकाच प्रकारचा व्यायाम करत राहिल्याने एकाच मसल्सवर परिणाम होतो,पण पाठीमागे धावल्याने अशा मसल्सवरदेखील प्रभाव पडतो,ज्यांवर सामान्यपणे कोणताच परिणाम होत नाही.
गुडघ्यावर प्रेशर कमी
सरळ धावण्याच्या तुलनेत उलटे धावल्याने गुडघ्यावर ताण अधिक पडत नाही. एखाद्या गुडघे वाकण्याबाबतची समस्या असेल तर किंवा गुडग्यातून पाय वाकवताना त्रास होत असेल तर तो त्रास कमी होऊन गुडघा वर्कआऊट करू शकतो.उलटे धावण्याने शरीराच्या अशा भागावर सरळ चालण्याने किंवा धावण्याने मार लागला होता.जखम झाली होती.नेहमी जखमी खेळाडू अशाच प्रकारच्या धावण्याने आपला स्टॅमिना वाढवतात.
हृदयासाठी चांगला व्यायाम
उलटे धावल्याने कार्डियोवेस्कुलर क्षमता आणि स्टॅमिना दोन्हींमध्ये फायदा होतो. मागच्या बाजूने धावताना एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाताना अडचण येते. यासाठी अधिक जोर द्यावा लागतो.मात्र हृदयासंबंधी समस्या असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उलटे धावण्याचा व्यायाम करावा.उलटे धावल्याने पोटाची चरबी कमी होते आणि एकाग्रतादेखील वाढते. विद्यार्थ्यांसाठी हा व्यायाम प्रकार अधिक फायद्याचा आहे.

No comments:

Post a Comment