तू का हसतोयस?
नवरा: डार्लिंग, तू इतकी उदास का आहेस, काही विचार करतेयस का?
बायको: नाही, असं काही नाही, फक्त काही दिवसांपासून ही काळजी लागलीय की, शेवटी काय
कमी राहिले माझ्या प्रयत्नात, ज्यामुळे तू लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही
हसतो आहेस?
******
डॉक्टर,माझं वजन वाढवा
पुढारी: डॉक्टरसाहेब, माझ्यावर असा काही
तरी इलाज करा, ज्यामुळे माझं वजन वाढेल?
डॉक्टर:साहेब,पण तुम्हाला वजन का वाढवायचंय?
पुढारी: डॉक्टरसाहेब,प्रचाराच्यादरम्यान
माझी चांदी-तुला केली जाणार आहे.
******
चहासाठी काय पण!
प्रश्न: तुम्ही चहा पिण्यासाठी कोणत्या
थराला जाल?
उत्तर: अरे, मी एकदा चक्क मुलगी पाहण्याचा
कार्यक्रमदेखील केला.
*****
डिनर बॉससोबत
मुलगी: इतका उशीर का झाला, मी कधीची तुझी
वाट पाहतेय.
मुलगा: बॉसने थांबवून घेतलं आणि डिनर केलं बॉससोबत...
मुलगी: अरे व्वा! काय खाल्लंस?
मुलगा: शिव्या!
*****
सुंदर बायको
बायको: बघ ना! आपल्या शेजार्यांनी 50 इंचीचा एलईडी टीव्ही खरेदी केला आहे...!
तुम्हीदसुद्धा एक विकत आणा ना?
नवरा: अगं डार्लिंग, ज्याच्याजवळ तुझ्यासारखी सुंदर बायको असताना
... तो का बरं फालतुचा वेळ टीव्ही पाहण्यात घालवेल बरं!
बायको: तुम्हीही ना!... काही तरीच!...
थांबा हं, मी तुम्हाला भजी तळून आणते.
*****
पुढच्या वर्षी आणखी भाडे वाढणार
शिक्षक: रेल्वेचे भाडे इतकं वाढूनही प्रवाशीसंख्या वाढतच आहे,
काय कारण असावं सांगा बरं?
विद्यार्थी: याचं कारण आहे, प्रत्येकजण असा
विचार करतो की, पुढच्या वर्षी आणखी भाडे वाढेल. त्यामुळे आताच प्रवास का करू नये!
*****
तुझ्यासाठी खीर
बायको: तुम्ही माझा वाढदिवस कसा विसरलात बरं?
नवरा: अगं, तुझा वाढदिवस कोण कसं बरं लक्षात ठेवेल...तुझ्याकडं बघितल्यावर जराही वाटत नाही, तुझं वय वाढत
चाललंय म्हणून!
बायको: (डोळ्यांतले अश्रू पुसत) खरं...
थांबा हं, तुमच्यासाठी खीर घेऊन येते.
*****
चेहरा दिसत नाही
पत्नी कार चालवायला शिकत होती. अचानक तिचे लक्ष आरशाकडे गेले.
पत्नी: अहो, तो समोरचा आरसा बरोबर लावला
नाही.
पती: का ?काय गडबड झालीय का?
पत्नी: यात मागून येणारी वाहने दिसत आहेत, पण आपला चेहराच दिसत नाही.
*****
डीजे
मुलगी: (एका मुलाला) काय करतोस?
मुलगा: डीजेंकडे बाबू आहे.
मुलगी: ... असं! ... तर मग माझं गाणं लाव.
मुलगा: ताई, डिस्न्ट्रिक्ट जजकडे बाबू
आहे.
*****
वेडाच लग्न
करेल
प्रेमिक: प्रिय! आता आपण आपल्या लग्नाची
गोष्ट पूर्णपणे गुप्त ठेवायची.
प्रेमिका: नाही, ही गोष्ट मी माझ्या मैत्रिणीला-
अमृताला नक्की सांगेन. कारण ती म्हणते की, तुझ्याशी कुणी तरी वेडाच लग्न करेल.
*****
जावाईबापू रिचार्ज
करा
जावईबापूने
रागाच्या भरात मेसेज पाठवला.
जावई: तुमची वस्तू दिवसेंदिवस खराब होत चालली आहे, जेवण नीट करत नाही, भाकरीचा तर पापडच होतो.
सासू: जावईबापू! तीन तोळ्याचे सोने रिचार्ज
करा. एक वर्षांपर्यंत तरी अगदी व्यवस्थित चालेल.
No comments:
Post a Comment