अनेकांना असं वाटतं की, उत्तम शिक्षण आणि मेहनत यांच्या मदतीने यशाच्या शिखरापर्यंत
पोहचता येतं. अर्थात ही गोष्ट खरी आहे,पण
जर व्यक्तीने सकारात्मक दृष्टीकोन आणि थोडा समजूतदारपणा उपयोगात आणला तर यश मिळवण्यासाठी
कोणताच अडथळा निर्माण होऊ शकत नाही. सुरुवातीला आपल्याला ध्येय
निश्चित करावे लागणार आहे आणि मग त्या दिशेने काम करावे लागणार
आहे. आपले ध्येय निवडताना आपली ताकद, आवड
आणि प्राथमिकता यांचा आधार घ्यावा लागणार आहे. ध्येयाच्या दिशेने
वाटचाल करताना आपली कार्यनीति बनवली पाहिजे. आपल्या कमकुवत पैलू
ओळखून त्या दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. वेळोवेळी आपल्या
प्रगतीचा लेखा-जोखा मांडला पाहिजे. या कालावधीत
चुका या होत राहतात. त्यामुळे अशा चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न
केला पाहिजे. आणि सर्वात म्हणजे स्वत:वर
विश्वास ठेवला पाहिजे.
1. कार्यनीति बनवा
आपल्याला ध्येय मिळवायचे असेल तर नियोजन
हे महत्त्वाचे आहे. यासाठी कार्यनीती बनवणे
आवश्यक आहे. कारण याच्या आधारावरच आपल्याला यशाचे शिखर गाठायचे
आहे. कार्यनीति बनवताना आपल्या क्षमतेकडे कमी-जास्त या दृष्टीकोनाने पाहायचे नाही. त्याचबरोबर या गोष्टीकडेही
लक्ष दिले पाहिजे की, कार्यनीति आणि कार्यकाळ यांचा मेळ बसला
पाहिजे आणि कुठूनही काम करण्याच्या क्षमतेला बाधा येता कामा नये.
2. कमकुवत पैलू ओळखा
माणसाला आपल्या अशा उणिवा कमी करायला
हव्यात, ज्या यशाच्या आड येतात. समजूतदारपणा
कामात आणून आपल्या कमकुवत पैलू जाणून घ्या. आपल्या उणिवा,
कमतरता जाणून घेण्यासाठी आपल्या आई-वडिलांची आणि
मित्र, शिक्षक यांची मदत घ्यायला शिका. त्याचबरोबर स्वत: देखील आपल्या मनाला प्रश्न विचारून कोणत्या आपल्या उणिवा आहेत आणि त्या आपल्या यशाच्या मार्गात अडथळे
आणतात का, याचा विचार करावा. जर उत्तर होय
असेल तर रणनीति बदलताना त्या उणिवा कमी करण्याला प्राथमिकता द्या.
3. आपली प्रगती तपासा
हळूहळू कार्यनीति विकसित झाल्यावर आपल्या
ध्येयाच्या दिशेने पावले टाका. ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी
जी तयारी करत आहात, ती योग्य दिशेने चालली आहे का, याची तपासणी करणे आवश्यक आहे. जर या गोष्टी माहीत नसतील
तर पुढे जाऊन शेवटच्या क्षणाला तुमचा वेग कमी होऊ शकतो. यापासून
स्वत: वाचवण्यासाठी एका ठराविक वेळेनंतर त्याची तपासणी स्वत:
करायला हवी.
4. चूकांमधून शिका
आपल्या चूकांमधून शिकले पाहिजे, यासाठी आपल्या चुकांकडे कधीही दुर्लक्ष करू नका.
कारण चूकांकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते. चूका का आणि कुठे होत आहेत, याकडे लक्ष दिले पाहिजे.
आणि पूर्ण तयारीने त्या दूर करा. जर पूर्ण प्रामाणिकपणे
या दिशेने मेहनतीपूर्वक काम करीत राहिलात तर यश जास्त दिवस तुमच्यापासून लांब राहू
शकणार नाही.
5. स्वत:वर विश्वास ठेवा
काम समर्पण भावनेने करा आणि स्वत:वर विश्वास ठेवा. काही तरी मिळवायचे असेल तर माणसाला आपले आपल्यावर पूर्ण विश्वास असायला हवा. स्वत:वर विश्वास असल्याने ध्येयाच्या दिशेने उत्साह आणि उत्कटतनेने पुढे जा. पुढे जाण्यासाठी आपल्याकडे त्याच्याविषयी प्रबळ इच्छा असणे महत्त्वाचे आहे.
शिवाय आवड असणेही महत्त्वाचे आहे. कामाच्याबाबतीत झपाटलेपणा,
पॅशनच तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये उज्ज्वल यश मिळवून देऊ शकते.
No comments:
Post a Comment