Sunday, June 17, 2018

दुसर्‍याचे ऐकायला हवे


     मला कधी कधी फार कंटाळा आला आणि, घरी आलो की, गप्प पडून राहतो. कुणाचं काही ऐकून घ्यावसं वाटत नाही. आणि हमखास अशा वेळेलाच कुणी तरी येऊन टपकतं किंवा मोबाईलची रिंग वाजते. यावरून तर माझी मैत्रिणीशी सारखी भांडणे होतात. तिला नेमके अशा वेळेलाच काही तरी बोलायचे असते. मग माझ्याकडून फोन रिसिव्ह होत नाही, तेव्हा तिची आदळआपट सुरू होते. खरे तर मी पहिल्यापासून एकलकोंडा आहे. मला एकांत फार आवडतो. पण हल्ली हा आता मला कमी मिळायला लागला आहे. त्यामुळे मला माझ्या मनासारखा विचार करता येत नाही. प्रत्यक्षात साकार होत नसलं तरी स्वप्नरंजनातून स्वप्नांची पूर्ति करून घेता येते. त्यामुळे तेवढाच तत्कालिन आनंद! शेवटी आपलं मन आहे, त्यामुळे काय विचार करावा आणि काय नाही, यावर आपला मालकी हक्क आहे. पण मी ज्यावेळेला कुणाचे ऐकून घ्यायला तयार होत नाही,तेव्हा दुसर्याची चीडचीड होत असणार हे नक्कीत्यांना टाळण्यापेक्षा कामात असल्याचा बहाणा करून टाळता येऊ शकते, पण मला तेही अजून जमत नाही.

     असो, पण असे कोण ना कोण दुसर्याचे ऐकून घेण्याचे टाळत असतात, तेव्हा सांगू इच्छिणार्याची काय अवस्था होत असेल बरं! याचा विचार केला पाहिजे. एकाद्याला आपल्या बॉसला काही सांगायचं आहे, आणि बॉस ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसेल तर...! म्हणजे कुणाला ना कुणाला काही ना काही सांगायचं असतं.परंतु, त्यांचं कुणी ऐकायलाच तयार होत नाही, अशी काहींची अवस्था आहे. अनेकांना आपलंच खरं असल्याचं सांगायची घाई असते. त्यामुळे समोरचा व्यक्त व्हायचा राहून जातो. काही जण नाराज होतात,काहीजण चिडतात,काहीजण मनानं कोलमडून पडतात. एकाद्याला एकाद्या गोष्टीत रसच नसेल, तेव्हा तर तो बिलकूल ऐकून घेत नाही. ङ्ग आपण सगळेजण बोलण्यासाठी उतावळे आहोत,पण ऐकून घ्यायची मात्र इच्छा नसते. असहमत असेल तर, अजिबात नाही.ङ्घ असं म्हणणं आहे ते डॉ. ग्रेगरी मायको यांचं! ते प्रसिद्ध सोशल सायकोलॉजिस्ट आहेत. त्यांचे एक फार गाजलेले पुस्तक आहे,ङ्घ द सायकॉलॉजी ऑफ अॅटीट्यूड्स एंड एटीट्यूड चेंजङ्घ त्यांनी हे पुस्तक जी हॅडिक यांच्यासोबत लिहिले आहे.
     बोलणं जितकं सोपं असतं, तितकंच ऐकून घेणं कठीण असतं. त्यामुळे आपण बोलतो अधिक आणि ऐकतो कमी. जर ज्यावेळेला नावड्त्या माणसाला, विषयाला ऐकणं भाग असतं, तेव्हा तर आपली ऐकण्याची इच्छाच राहत नाही. आपल्याला ऐकायला आवडतं, पण ते चांगलं, मधुर म्हणजे  ऐकायला गोड गोड असावं. नेहमीच आपल्याला कडवट गोष्टी ऐकायला आवडत नाहीत. शेवटी कडवट गोष्टी आवडणार तरी कशा? पण ऐकायल्याशिवाय काहीच चालत नाही. जर आपण बोलणार असू तर मग आपल्यालाही ऐकायला हवं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा गोष्टी आवश्य ऐकायला हव्यात, ज्या आपल्याला आवडत नाहीत. ती ऐकताना कडवट वाटेल,पण नंतर ती चांगली वाटते. ती आपल्याला आरसा दाखवते. त्यात आपल्याला आपला खरा चेहरा पाहायला मिळतो. आपल्याला जे गोड गोड ऐकावेसे वाटते, ते जंकफूड सारखं आहे. खाताना खूप मजा येते, पण एकूण पाहिलं तर ते आपल्याला नुकसान पोहचवत राहते. शरीराचं वजन वाढतं किंवा एकाद्या व्याधीची लागण लागायला लागते. त्यामुळे आपल्याला आपल्याविषयीच्या कडवट गोष्टी ऐकायलाच हव्यात. किंवा त्याची सवय लागायला हवी. जर प्रयत्न केलात तर तुम्हाला अशी सवय सहज लावून घेऊ शकतो, मात्र यासाठी आपल्याला आपला अंदाज बदलायला हवा.

1 comment: