Thursday, July 2, 2020

(लघुकथा) ढेकूण

चाळीस वर्षांपूर्वी आम्ही मुंबईत शेजारी शेजारी भाड्याने राहत होतो. त्याला पैसेवाल्यांचा मोठा तिरस्कार होता. दुसऱयांच्या मुंड्या मुरगाळून हे लोक पैसे जमवतात, दुसऱ्याचे शोषण केल्याशिवाय ते श्रीमंत होत नाहीत,असा त्याचा आरोप होता. कधीकधी रागाच्या भरात म्हणायचा," हे साले सगळे ढेकणाच्या औलादीचे आहेत. रक्ताप्रमाणे दुसऱ्याचे शोषण करून मोठे होतात."

झाले! आमची ताटातूट झाली. मी बदली झाल्याने पुण्याला आलो. योगायोगाने चाळीस वर्षानंतर आमची एका लग्न समारंभात भेट झाली. बोलता बोलता त्याने सांगितले की, त्याचे मुंबईला चार प्लॉट आणि तीन प्लॅट  आहेत. घरात तीन कार आहेत आणि ग्रामीण मार्गावर 10 वडाप गाड्या आहेत.
मी त्याच्या या प्रगतीवर खूश झालो. त्याचे अभिनंदन केले,पण का कुणास ठाऊक मला त्याच्या शरीरातून ढेकणाची दुर्गंधी येत होती.

1 comment:

  1. खूपच छान आणि मार्मिक
    :महादेव बी. बुरुटे

    ReplyDelete