Thursday, April 20, 2017

रोज 7 पावले पुढे चला


कॉम्पिटिशनच्या या युगात विजेता तोच बनतो,जो आपले काम परफेक्शनने करतो. आपल्या कामात परफेक्शन आणण्यासाठी काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. या गोष्टी लक्षात ठेवून काम केल्यास तुम्ही परफेक्शनिस्ट बनू शकता. रोज काही गोष्टी निश्चित करून पुढे चालत राहिलात तर परफेक्शन मिळवणं, काही कठीण नाही.
1.ॅक्टिव बना, चार्ज सांभाळा

कामाच्याबाबतीत आपली जबाबदारी ओळखा.रोज आपली कामे चांगल्या पद्धतीने कशी होतील,याचा विचार करा. आपल्या चुकांची कारणे शोधा आणि त्या पुन्हा होऊ नयेत, याची काळजी घ्या. ॅक्टिव राहा आणि आपल्या कामाचा चार्ज सांभाळा म्हणजे कामे अगदी टीपटॉप होतील.
2. लक्ष्य कसल्याही परिस्थितीत मिळवा
कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी लक्षात ठेवा की, आपले लक्ष्य काय आहे. आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित केलात तर वायफट गोष्टींमध्ये वेळ वाया जाणार नाही. स्वत:ला रोज इम्प्रूव करण्याकडेही लक्ष असले पाहिजे.
3. फर्स्ट थिंक फर्स्ट
प्रायोरिटी निश्चित करा. कोणते काम पहिल्यांदा करायचे आहे आणि कोणते काम नंतर हे आधी ठरवा. महत्त्वाच्या कामाला आधी प्राधान्य द्या. उदाहरणार्थ, खेळायला जाण्यापूर्वी आपले दुसरे महत्त्वपूर्ण काम  पूर्ण झाले असले पाहिजे. शेड्युल बनवा आणि स्वत:ला आर्गनॉइज करा.
4. दुसर्यांचे ऐका
चांगल्या गोष्टी सांगण्याबरोबरच चांगल्या गोष्टी ऐकल्याही पाहिजेत. ही एक कला आहे. दुसरे ज्यावेळेला एकादी गोष्ट सांगत असतील तर त्यांचे मनपूर्वक ऐकले पाहिजे. त्याचे बोलणे मधेच तोडणे किंवा मधेच काही तरी शेरेबाजी करणे योग्य नाही. यामुळे समोरचा काय सांगतो, हे कळून येत नाही.
5. सन्मान द्या, सन्मान घ्या
दुसर्यांना सन्मान देणे महत्त्वाचे आहे. ज्यावेळेला आपण एखाद्या सन्मान देतो, त्यावेळेला आपल्याला त्याच्याकडून काही चांगल्या गोष्टी नव्याने शिकायला मिळतात. अडचणींना सोडवण्यासाठी दुसर्यांची मदत घ्या. अनेकांशी चर्चा केल्याने निश्चित सोल्यूशन मिळते. आपण दुसर्याला सन्मान दिल्याने आपल्यालाही आपोआप सन्मान मिळतो. टीमने कसे काम करायचे, याचे धडे आपल्याला अशा गोष्टीतून शिकायला मिळते.
6. फिट रहा,हिट रहा
आरोग्य चांगले राखण्यासाठी एक्सरसाइज करणं महत्त्वाचे आहे. व्यायाम माणसाला बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट बनवतो. व्यायामाबरोबरच खाण्या-पिण्याकडेही तितकेच लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक गोष्टींची वेळ निश्चित करायला हवी. खेळ, अभ्यास,टिव्ही आणि अन्य कामे यांच्या दरम्यानचा बॅलेंस सांभाळायला शिकले पाहिजे.
7. बना विजेता
प्लानिंगनुसार सगळी कामे वेळच्यावेळी पूर्ण झाली पाहिजेत. तसे झाले तरच तुम्ही विजेता बनू शकता. यासाठी प्रत्येक गोष्टींची वेळ निश्चित केली गेली पाहिजे. विजेता काही खास किंवा वेगळे काही करत नाही. तर प्रत्येक गोष्ट परिपूर्णतेने करण्याचा प्रयत्न करतो. तो आपली सगळी कामे परफेक्शननुसार करतो आणि विजेता ठरतो.

No comments:

Post a Comment