(जागतिक
पशुचिकित्सा दिवस)
जीवाणू,
विषाणू व परजीवी हे सर्व सजीवांसाठी घातक आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जागतिक पशुचिकित्सा दिवस साजरा करताना समाजजागृत महत्त्वाची असून आरोग्य, स्वच्छता,
लसीकरण सक्षमतेने हाताळण्याची गरज आहे. जागतिक
पशुचिकित्सा दिवस एप्रिल महिन्याच्या शेवटच्या शनिवारी साजरा करण्याचा प्रघात
2000 सालापासून नियमीत सुरु आहे. जागतिक पशुचिकित्सा
संघटना प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम किंवा विषय स्वीकारून जागतिक स्तरावर हा पशुचिकित्सा
दिवस साजरा करण्याचे निश्चित करते. यावर्षी
सूक्ष्मजैविकांची प्रतिकारत्मकता: जागरूकता व कारवाई हा विषय
घेऊन जागतिक पशुचिकित्सा दिवस साजरा करण्याचे ठरले आहे. सूक्ष्मप्रतिजैवके
जैविक रोकथाम करण्यासाठी उपयोगात आणली
जातात हे खरे आहे. मात्र, जर हा उपयोग तंत्रशुद्ध नसेल तर प्रतिकार क्षमतेत क्षीणता येईल.

पशुचिकीत्सक,
जागतिक पशुचिकित्सा दिवस, जागतिक आरोग्य संघटना
आदी अनेक अनेक शब्दांचा शेवट फक्त प्रयत्नात आहे. जो साध्य करण्यासाठी
लहान लहान प्रेरणादायी कार्यात सुख, आनंद शोधने पर्याय ठरेल.
सूक्ष्मजैविकांची प्रतिकारत्मकता: जागरूकता व कारवाई
या विषयाचा विचार झाल्यास काही बाबी समजून घेणे गरज ठरते. अभ्यासपूर्ण
माहिती, विेषणात्मक शिक्षण, अनुकूल वातावरण,
स्वच्छता, संसर्ग प्रतिबंध, जबाबदारवृत्ती, रोगनिदानाच्या सोई व त्यांच्या उपलब्धता,
वैयक्तिक व सामूहिक उत्तरदायित्व असे अनेक मुद्दे हाताळल्याशिवाय समाज
व देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही.
No comments:
Post a Comment