परशुराम जयंती (28 एप्रिल)
भगवान परशुराम
आजच्या युवकांसाठी खरे मार्गदर्शक सिद्ध होऊ शकतात.भगवान परशुराम स्वत:
विष्णूचे अवतार होते. त्यामुळे ते स्वत:
शक्तीसंपन्न होते. परंतु, ज्या उद्देशाने त्यांचा अवतार घडला होता,तलक्ष्याच्या
प्राप्तीसाठी त्यांनी कठोर आणि पुरुषार्थ केला. परशुराम यांनी
आपल्या तपस्येद्वारा अनेक शक्ती प्राप्त केल्या, ज्यात भगवान
शिवच्या तपस्येतून प्राप्त झालेले परशु अस्त्र प्रमुख आहे. हे
अस्त्र प्राप्त केल्यामुळेच त्यांचे रामाचे परशुराम असे नामकरण झाले. या शक्तीमधूनच युवकांसाठी सद्कर्म आणि पुरुषार्थ यामुळे मिळणारे सुफळ प्रतिष्ठा
मिळवून देईल, असा संदेश असेल.भगवान परशुराम
यांचे गुरु स्वत: संहार आणि सृजनाचे देवता भगवान शिव होते.
युवा परशुरामाने भगवान शिव यांची घोर तपस्या आणि सेवा यातून अनेक अस्त्र-शस्त्र मिळवले आणि अनेक विद्यांचा वापर करून त्यांनी अनाचारी क्षत्रियांचा
अंत केला. त्यांच्या अत्याचारातून पृथ्वीची सुटका केली.
भगवान परसुरामद्वारा प्राप्त केलेली ही विविध प्रकारची अस्त्रं आणि विद्या
युवकांना संदेश देतात की, तुम्ही लक्ष्यासंबंधीच्या प्रत्येक
विद्यांमध्ये निपुणता मिळवा. आपले मन-मस्तिक
मोकळे-ठाकळे ठेवून यथासंभव जास्तीतजास्त शिकण्याचा प्रयत्न करावा.
स्वत: भोवती कोणत्याही मर्यादा घालून घेऊ नयेत.
भगवान परशुराम यांच्याप्रमाणे आदर्श शिष्य बनण्याचा प्रयत्न करावा.
No comments:
Post a Comment