फोर्ब्सच्या यादीत 2015 साली यू-ट्यूबकडून सर्वात जास्त पैसे मिळवणारी व्यक्ती
म्हणून लिली सिंहचं नाव पुढे आलं आहे. लिली सिंहचं यू-ट्यूबवर एक चॅनेल आहे, हे चॅनेल तिने 2010 साली सुरू केलं होतं. लिली सिंह ही 27 वर्षांची आहे, ती टोरांटोत राहते, सोशल मीडियावर ती सुपरवुमेन नावाने ओळखले जाते. सोशल
मीडियावर तिला 1.2 कोटी लोक फॉलो करतात. एका वर्षात तिने 15 कोटीपेक्षा जास्त रूपयांची कमाई यू-ट्यूबच्या माध्यमातून केली आहे. तिने 27 शहरांची वर्ल्ड टूर केली आहे, तर लहान चित्रपटांसारखे
दुसरे काही प्रोजेक्टसही तिने केले आहेत.
लिली
सिंह नेमकं तिच्या यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून लोकांना मनोरंजक
कार्यक्रम देते.लिलीने यासाठी फार मोठी मेहनत घेतली आहे.
त्यामुळे ती आज सेलिब्रिटी बनली आहे. मात्र आज
ती जी काही बनली आहे,ती तिच्या डिप्रेशन या आजारामुळे.
डिप्रेशनमधून बाहेर पडताना तिने कॅमेर्याला सामोरे
गेली. स्वत:चे मनोरंजन करता करता ती दुसर्याचे मनोरंजन करू लागली.
लिलीचे आई-वडील पंजाबचे राहणारे.कॅनडामध्ये स्थायिक झाले होते. ओनटेरियो शहरात जन्मलेल्या
लिलीला आई-वडिलांकडून भारतीय संस्कार मिळाले होते. सामान्य भारतीय कुटुंबाप्रमाणे तिच्या आईची इच्छा होती की,मुलीने शिक्षणाबरोबरच घरकामाच्या गोष्टीही शिकाव्यात. तिला आणि तिच्या मोठ्या बहीणीला सक्त ताकीद होती की, शाळा सुटली की थेट घरला यायचं. रात्री उशीरापर्यंत मित्रांबरोबर
बाहेर भटकण्याची त्यांना अजिबात परवानगी नव्हती. तिच्या वडिलांची
इच्छा होती की,तिने पदवी संपादन करून मानसशास्त्रात मास्टर्स
मिळवून अध्यापन क्षेत्रात जावं.
गोष्ट 2009 ची आहे. तिचं मन अभ्यासातून उडालं. ती गपगप राहू लागली. मित्रांबरोबर फिरणं बंद झालं.
शॉपिंगला जाण्यासाठी सतत हट्ट करणारी मुलगी अचानक आपल्या खोलीत कैद होऊन
राहिली. आईला चिंता सतावू लागली, आपल्या
मुलीला हे अचानक काय झालं? आई तिला विचारायची तेव्हा ती आईच्या
खांद्याला डोके टेकवून हमसाहमसी रडायची. डॉक्टरांना दाखवलं.
त्यांनी मुलगी डिप्रेशन गेल्याचं सांगितलं.उपचार
सुरू झाले. जवळजवळ एक वर्षं लागलं तिला डिप्रेशनमधून बाहेर यायला.लिली सांगते की, तिला सकाळी उठायला आवडायचं नाही.
मित्रांचे फोन घ्यायचे बंद करून टाकले तिने.मनात
भितीदायक विचार यायचे. वाटायचं, आपण विनाकारण
जगतो आहोत. तिने अन्न-पाणीही सोडून दिलं
होतं.
लिलीला माहित होतं
की, डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी
आनंदी राहाणं आवश्यक आहे. आयुष्य तिला बेकार वाटू लागलं होतं.
पण बालपणीच्या आठवणी फारच आनंददायी होत्या.शाळेतले
दिवस तिला आठवायला लागले. बालपणीतल्या नादान हरकतींमुळे आईला
कसा त्रास दिला जायचा आणि आई मग तिला जोरात रागवायची. जुन्या
गोष्टी आठवल्यावर तिला फार हसू यायचं.या आठवणींची तिला डिप्रेशनमधून
बाहेर येण्यासाठी फारच मदत झाली. मग तिने विचार केला की,
सुंदर आठवणींचा व्हिडिओ करावा. सुरुवातीला काही
गोष्टी तिने सहजच मोबाईलवर रेकॉर्डवर केल्या. आपला व्हिडिओ पाहिल्यावर
तिला खूप हसू यायचं. मग तिला पहिल्यांदा जाणीव झाली की,
आपण चांगल्याप्रकारे कॉमेडी करू शकतो. मग विचार
आला की, अशाप्रकारचे व्हिडिओ बनवून का नाही दुसर्यांनाही हसवावं.
तिने वडिलांना
सांगितलं की, मला युट्यूबसाठी
कॉमेडी व्हिडिओ बनवायचे आहेत. मात्र वडिलांना ही आयडिया काही
फारशी आवडली नाही. त्यांनी तिला सांगितलं की, अशा विनाकरण वेळ घालवण्यापेक्षा तुझं शिक्षण पूर्ण कर. तिचे वडिल सुखविंदर सिंह सांगतात की, लिली मला फक्त एक
वर्षाची मोहलत मागितली. जर ती यूट्यूबवर यशस्वी झाली नाही तर
ती पुन्हा विद्यापीठात जाऊन शिक्षण पूर्ण करेल. मला वाटलं,
तिच्या आनंदासाठी तिला एक संधी द्यावी. ऑक्टोबर
2010 मध्ये तिने सुपर वुमेन नावाचे युट्यूबवर चॅनेल सुरू केले.तिचे कॉमेडी व्हिडिओ हिट होऊ लागले. या व्हिडिओत तीन
व्यक्तीरेखा आहेत. एक किशोर मुलगी आणि दुसरे आई-वडील. तिन्ही व्यक्तीरेखांमध्ये लिली वेगवेगळ्या अंदाजात
पडद्यावर येऊ लागली. किशोरीच्या भूमिकेत तिचा अंदाज अगदी बिंदास आणि अल्लड आहे. आई-वडिलांच्या व्यक्तीरेखांमध्ये पंजाबीपणा दिसून येतो.
तिघांमधल्या कॉमेडी नोक-झोंकने प्रेक्षकांना चांगलेच
हसवून सोडले. लिली सांगते, मला कुणाच्या
आई-वडिलांची टर उडवायची नाही. ती आई-वडील आणि किशोर वयाच्या मुलांमधली प्रेमळ भांडणे आकर्षक रुपात सादर करते आहे.
त्यामुळे लोकांना हसू यावं. अशी प्रेमळ भांडणं
जगातल्या सगळ्याचं घरात होत असतात.
तिचे व्हिडिओ कॅनडा, अमेरिका, जर्मनी, भारतसह संपूर्ण जगात गाजल्या. चॅनेलवरच्या प्रेक्षकांची संख्या लाखो-कोटींमध्ये पोहोचल्या.
सब्सक्राइबर संख्यादेखील संख्या वेगाने वाढू लागली. चॅनेल जगातल्या टॉप युट्यूबमध्ये समावेश होऊ लागला. तिला
दक्षिण आशियातील युट्यूब कॉमेडियन होण्याची संधी मिळाली. आज तिच्या
चॅनेलवर जवळपास एक कोटी दहा लाख सब्सक्राइबर आहेत. तिची कमाईदेखील
कोटींमध्ये आहे. युट्यूबवर प्रसिद्ध पावल्यावर तिने विचार केला
की, आपण डिप्रेशनची शिकार होतो. या गोष्टी
तिला संपूर्ण जगाशी शेअर करायच्या आहेत.आजसुद्धा मुलं-मुली डिप्रेशनमध्ये गेले असल्यास अगदी नातेवाईकांसह इतर लोकांना ती वेडी झाली
असल्याचे समजतात. या आजाराविषयी लोकांमध्यी खूपच गैरसमज आहेत.
पण लिलीने हिंमत दाखवली. एक व्हिडिओ प्रसारित करून
तिने खुलासा केला आहे की, आपण डिप्रेशनची शिकार होतो,
पण आता आपण पूर्णपणे बरी आहोत, हे सांगून टाकले
आहे.तिने लोकांना विनंती केली आहे की, मानसिक
आजारांवर उपचार करा. हा व्हिडिओ सुरुवातीला सुमारे 50
लाख लोकांनी पाहिला आणि त्यांचे तिने आभार मानले.
लिली सांगते की, सगळ्यांसमोर डिप्रेशनची गोष्ट स्वीकारणं
कठीण होतं. पण मला वाटलं की, कदाचित माझी
कहानी ऐकून समाजातील डिप्रेशनसारख्या आजाराबाबतचे संभ्रम दूर होतील. 2015 मध्ये ती यूनीकॉर्न कार्यक्रमासह ती जगाच्या भ्रमणासाठी निघाली आहे.
अनेक देशांमध्ये तिने स्टेज शो केले. या जगभ्रमणाची
एक डॉक्यूमेंट्री फिल्मही बनली आहे. ती हिटही झाली.
2016 मध्ये फोब्रस ने तिला यूट्यूबवर सगळ्यात अधिक कमाई करणारी सेलिब्रिटीमध्ये
समावेश केला आहे. अलिकडेच तिचे हाउ टु बी ए बावसे,ए गाइड टु कॉन्वेरिंग लाइफ नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. जे आता चांगलेच चर्चेत आहे.
No comments:
Post a Comment