आपला परफॉर्मन्स दरवेळी चांगला
व्हायचा असेल तर पूर्ण एनर्जी लावून आणि एकाग्रतेने काम करायला हवं.आणि सतत स्वतः
ला मोटिवेट करत राहिलात तर या गोष्टी शक्य आहेत.स्पर्धेच्या या युगात स्वतः ला
तयार ठेवण्यासाठी स्वतः ला मोटिवेट करत राहणं अतिशय गरजेचे आहे.मोटिवेशनमुळे माणूस
नेहमी काही तरी करण्याला प्रेरित होतो.मोटिवेशन एक प्रक्रिया आहे.याला नेहमी तयार
ठेवण्यासाठी काही खास गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.यासाठी काही गोष्टी
जाणून घ्यायला हवेत.
अचीवर्सच्या कंपनीत रहा
आपल्या फ्रेन्डस सर्कलमध्ये
काही अचीवर्स असायला हवेत.अशा लोकांना आपल्या सर्कलमध्ये सामावून घ्या.ज्यांच्याशी
बोलल्याने आपल्याला एक नवी ऊर्जा मिळेल. आपल्या सिनियर्स आणि बॉसेसशी नेहमी
संपर्कात रहा,कारण त्यांची सोबत आपल्याला काही
प्रमाणात मोटिवेट करू शकते.
वर्तमानचा विचार करा
आपल्या अपयशावर अफसोस करत
बसण्यापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करत रहा.कारण गेलेल्या गोष्टींचा विचार करत
बसण्याने हाताला काही लागत नाही.आपण आपल्या चुकांमधून बोध घ्यायला हवा. सोबत
वर्तमान परिस्थिती जोखून घ्येण्याचाही प्रयत्न केला पाहिजे.सेल्फ
मोटिवेशनसाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे की , तुम्ही
वर्तमानातील जॉब प्रोफाइल कायम ठेवू इच्छिता की आणखी काही वेगळे करू इच्छिता.जर
तुम्हाला काही वेगळे करायचे असेल तर अगदी मन लावून त्यावर कोन्सट्रेट करा.
आपला बेचमार्क निश्चित
करा
आपले जुने अचीवमेंटस विसरून
काही वेगळे करण्याचा विचार करा.अचीवमेंटसची यादी सतत वाढवण्यासाठी आवश्यक आहे की,तुम्ही जे काही अचीव केले आहे,ते विसरून
त्यापेक्षा अधिक करण्याचा प्रयत्न करा.तुम्ही जे लक्ष्य निश्चित केले आहे
त्यापेक्षा आणखी जास्त करण्याचा प्रयत्न करा.
वीक पॉईंट ओळखा
ऑफिसमधील तुमची भूमिका तुम्ही
वाढवायला हवी.कंपनीकडून आयोजित करण्यात आलेल्या लर्निँग आणि डेवलपमेंट
प्रोग्रँममध्ये स्वतः ला आवश्य एनरॉल करा.यामुळे तुम्हाला चांगला परफॉर्म करण्याला
मदत मिळेल.कंपनी रिव्यूमुळेदेखील तुम्हाला आपले वीक पॉईंटस् जाणून घ्यायला
आणि ते सुधारण्यास मदत मिळेल.-
No comments:
Post a Comment