जवळपास एक शतकांपूर्वी एक व्यक्ति वर्तमानपत्र वाचत बसली होती.सहवेदना
बातम्यांच्या कॉलमवर त्याची नजर गेली आणि तो चकित होऊन ताडकन उठून उभा
राहिला. कारण त्या सहवेदना बातम्यांच्या कॉलममध्ये त्याच्याच मृत्यूची बातमी
होती.तो घाबरला.असं कसं झालं? चूक वर्तमानपत्राची होती,त्यांनी चुकीने दुसऱ्या व्यक्तीच्या जागी याचे नाव प्रसिद्ध केले
होते.थोड्या वेळाने ती व्यक्ती सामान्य झाली तेव्हा त्या
व्यक्त्तीने विचार केला, खरेच जर मी मेलो असतो तर लोकांनी
मला कसे लक्षात ठेवले असते.हा विचार करून त्या व्यक्तीने ती सहवेदनेची बातमी पूर्ण
वाचून काढली.ती बातमी वाचून ती व्यक्ती चकीत झाली.कारण तिच्यासाठी मृत्यूचा
व्यापारी आणि डायनामाइट किंग असे शब्द प्रयोग करण्यात आले होते.ही व्यक्ती दुसरी
कोणी नसून डायनामाइटचा आविष्कार करणारी अल्फ्रेड नोबेल होती.

शेवटी आपण या जगाचा निरोप घेतो
तेव्हा लोक आपल्याला कोणत्या रूपात लक्षात ठेवतील? हा
असा प्रश्न आहे जो आपण क्वचितच विचार करतो. या प्रश्नाचे उत्तर या एका
छोट्याशा गोष्टीत शोधले जाऊ शकते. या अल्फ्रेड नोबेलसारखे आपल्यालाही आतला आवाज
ऐकायला हवा.आपण जे काही करतो ते चांगले आहे की वाईट हे तपासायला हवे.जर आपल्यालाही
वाटत असेल की लोकांनी आपल्याला एका चांगल्या रूपात ओळखावे तर आपण आपल्या
आयुष्यातही लक्षात राहावीत अशीच चांगली,लोकोपयोगी कामे
करायला हवीत. तरच लोक आपल्याला एक भला माणूस म्हणून ओळखतील.
No comments:
Post a Comment