Tuesday, April 4, 2017

ट्रम्प सरकारचा भारतीयांना फटका

     अलिकडच्या काही दिवसांत भारतीय मूलनिवासी लोकांविरोधात अमेरिकेत काही ठिकाणी वर्णद्वेषी हिंसेच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेत राहत असलेल्या भारतीय मूल निवासी लोकांच्या मनात संताप आहेच शिवाय त्यांच्यात जागृतीही आली आहे. याविषयावर अलिकडेच मूल भारतीय तीन विद्वानांनी खूप मेहनत करून एक पुस्तक लिहिले आहे,त्याचे नाव आहे, द अदर वन पर्सेंट:इंडियंस इन अमेरिका. संजय चक्रवर्ती,देवेश कपूर आणि निर्विकार सिंह यांनी खूप अभ्यास करून आणि संशोधन करून लिहिलेल्या पुस्तकात म्हटले आहे की, 20 व्या शतकाच्या प्रारंभी खूपच कमी भारतीय अमेरिकेला जात होते. यावेळेला संपूर्ण अमेरिकेत भारतीय मूल निवासी लोक खूप झाले तर पाच हजाराच्या आसपास असतील. पण आज अमेरिकेत भारतात जन्मलेले किंवा भारतीय मूल असलेल्या लोकांची संख्या जवळपास 20 लाख आहेत. तिथल्या अल्पसंख्यांमध्ये असलेल्या लोकांमध्ये त्यांचे स्थान सगळ्यात वरचे आहे. तिथले अधिकांश युवा भारतीय  आहेत, श्रीमंत आहेत. त्यांनी उच्च शिक्षण मिळवलेलं आहे. या संशोधनानुसार अमेरिकेतल्या पश्चिमी तटावर मूळचे भारतीय असलेल्या लोकांची चलती आहे. त्याचा बोलबाला आहे. सिलिकॉन व्हॅलीमध्ये ते अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. म्हटलं जातं की, अमेरिकेत राहत असलेल्या भारतीय प्रवाशी लोकांची संख्या चीनच्या नागरिकांपेक्षा कमी असली तरी भारतीयांची राजकीय प्रतिष्ठा फारच वरची आहे. कारण एका बाजूने तिथले भारतीय लोक राजकीय स्तरावर खूपच सक्रिय आहेत. आणि राजकीय देणगी देण्याच्याबाबतीतही सगळ्यात पुढे आहेत.

     गेल्या साठच्या दशकात अमेरिकेतल्या सरकारने आपल्या व्हिसा नियमांमध्ये शिथिलता आणली होती, ज्यामुळे शिकले-सवरलेले भारतीय युवक मोठ्या संख्येने अमेरिकेत जात होते. त्या दिवसांत अशी धारणा होती की, जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जातील, त्या विद्यार्थ्यांना पार्ट टाईम नोकरीदेखील मिळेल.या पैशातून विद्यार्थी आपल्या शिक्षणाचा खर्चदेखील काढू शकतील.तंत्रज्ञानसंबंधी शिक्षण प्राप्त करणार्यांना तिथे नोकरी मिळवणंही सोपं होतं. 1990 च्या दशकात पुन्हा एकदा मोठ्या संख्येने भारतीय युवकांनी अमेरिकेच्या दिशेने प्रस्थान केले. या संशोधनानुसार आज अमेरिकेत जितके भारतीय मूलनिवासी राहत आहेत.त्यातल्या एक चतुर्थांश गेल्या 25 वर्षांत अमेरिकेत पोहचले आहेत. भारतात खुले आर्थिक धोरण आणि माहिती तंत्रज्ञान आल्यानंतर हा सिलसिला पुन्हा वेग घेऊ लागला.
अलिकडेपर्यंत अमेरिकेतल्या सरकारने भारतीय मूलनिवासी युवकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना अमेरिकेत उच्च शिक्षण देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण शिष्यवृत्तीसारख्या फुलब्राइट शिष्यवृत्ती,फोर्ड फाऊंडेशन शिष्यवृत्ती आणि अन्य काही शिष्यवृत्त्या द्यायला सुरुवात केली होती. काही भारतीय युवक, जे श्रीमंत घरचे होते, स्वत: शिक्षणाचा खर्च पेलून अमेरिकेत उच्च शिक्षण मिळवण्यासाठी जात होते. अमेरिकेत संपादन केलेले शिक्षण पूर्ण जगात कोठेही चांगली नोकरी मिळवण्याची गॅरंटी मानली जात होती. त्यामुळे अमेरिकेचे आकर्षण सतत वाढत चालले होते.
     जे भारतीय अमेरिकेत गेले,त्यांनी अमेरिकेला समृद्ध तर केलेच आणि स्वत:ही समृद्ध झाले. हे सगळे काही फक्त तंत्रज्ञान कंपनीत काम करणारे नव्हते.त्यात गुजराती व्यापारी होते, त्यांनी व्यापार चालवला. आणि यात पंजाबी व्यापारीही आहेत,ज्यांनी तिथे दुकानेही चालवली. आजही तिथल्या लहान-मोठ्या शहरांमध्ये मोठ्या नेटाने हे लोक दुकाने चालवताहेत. शिवाय तिथल्या हॉस्पीटलमध्येदेखील मोठ्या संख्येने भारतीय डॉ़क्टर काम करत आहेत. तिथे त्यांना खूप निपूण आणि हुशार समजले जाते. त्यांना तिथे मोठी प्रतिष्ठा आहे. आतापर्यंत खूप मोठ्या संख्येने प्रशिक्षित भारतीय युवक अमेरिकेत जात राहिले. आणि त्यांच्या अमेरिकेत येण्याला अमेरिका सरकारने कधी पायबंद घातला नाही. राष्ट्रपती ओबामा यांच्या कारकिर्दीपर्यंत भारत आणि अमेरिकेचे संबंध खूपच छान होते. त्यामुळे भारतीय मूल निवासी लोकांना व्हिसा मिळवताना आणि दीर्घकाळापर्यंत तिथे राहायला काही अडचण नव्हती. विविध संशोधनानुसार समजलं आहे की, 2014 मध्ये जितके भारतीय अमेरिकेला गेले,त्यातले भारतीय मूलनिवासी लोकांची संख्या मोठी होती. अगोदर चीन आणि मॅक्सिकोमधून मोठ्या संख्येने लोक अमेरिकेला जात होते, पण 2014 नंतर अमेरिकेला जाणार्यांमध्ये भारतीयांची संख्या सगळ्यात अधिक राहिली आहे. हा सिलसिला असाच वाढत होता,पण ज्यावेळेला ट्रम्प सरकार आले आहे, तेव्हापासून भारतीयांना दीर्घकाळाचा व्हिसा मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे भारतीय लोकांमध्ये भिती तर आहेच, शिवाय संतापही आहे.

No comments:

Post a Comment