किशोरकुमार आणि
एस.डी.बर्मन यांनी
सुंदर गाणी रसिकांना दिली आहेत. ती आजही तरुणताजा आहेत.एस.डी.बर्मनसाठी किशोरकुमार यांनी
सगळ्याच प्रकारची गाणी गायली आहेत. सुरुवातीला किशोरकुमार हिंदी
चित्रपट सृष्टीत अभिनेता म्हणूनच आले होते.त्यामुळे ते प्रारंभी मोजकीच गानी गात होते. मात्र आराधना चित्रपटानंतर ते राजेश खन्नाचा आवाज झाले.विशेष म्हणजे किशोरकुमार 1969 च्या आराधना नंतर खर्या अर्थाने स्थिरस्थावर पार्श्वगायक बनले.
आराधनासाठी किशोरकुमार
यांनी राजेश खन्नाला आवाज दिला. तो सुपरहिट ठरला.या चित्रपटापासून राजेश खन्नासाठी किशोरकुमार
यांचा आवाज पक्का झाला. वास्तविक किशोरकुमार यांच्या गायकीची
ही दुसरी खेळी होती. पहिल्या खेळीत हरेक अभिनेत्यासाठी किशोरकुमार
गाऊ शकले नव्हते.कारण त्यावेळी ते अभिनेता म्हणून कार्यरत होते.
तरीही अशोककुमार(खिलाडी),करण दिवाण ( बहार), सज्जन
( मालकिन),भगवान (सिंदबाद
द सेलर), किशोर साहू (रिमझिम),गोप (एक नजर)साठीही किशोरकुमार
यांनी आवाज दिला होता.मात्र एसडींच्या संगीतांतर्गत किशोरकुमार
यांनी देव आनंद यांची सगळीच गाणी गायली होती.
जीवन के सफर में
राही.. गीतकार-साहिर
(चित्रपट- मुनीमजी), चाहे
कोई खुश रह.. गीतकार-साहिर (टॅक्सी ड्रायव्हर),हम है राही प्यार के.. गीतकार-मजरुह (नौ दो ग्यारह),दुखी मन मेरे..साहिर (फंटूश),
माना जनाब ने पुकारा नहीं..मजरुह (पेइंग गेस्ट), गाता रहे मेरा दिल..शैलेंद्र (गाईड), ये दिल ना होता
बेचारा.. मजरुह (ज्वेल थीफ), शोखियों में धोला जाये आणि फुलों के रंग से.. नीरज
( प्रेमपुजारी), गोरी गोरी गांव की गोरी रे..
आनंद बक्षी( ये गुलिस्तां हमारा) धीरे से जाना..नीरज(छुपा रुस्तुम)
या सर्वच गीतांमध्ये किशोरने देव आनंदच्या अभिनयानुरुप कंठ दिला.
प्रथम किशोरने जिद्दी चित्रपटामध्ये आवाज दिला तेव्हा त्याच्यावर सायगलचा
जबरदस्त प्रभाव जाणवत होता. मात्र एसडी बर्मन यांच्या संगीतांतर्गत
गाताना किशोरकुमार व देव आनंद सायगलच्या प्रभावातून मुक्त झाले. देव आनंदच्या अभिनयाला आनंदोल्हासाचे वलय प्राप्त झाले. दुखी मन मोरे.. व्यतिरिक्त बरीच गीते उल्हासित मन स्थितीतील
आहेत. मुनीमजीमधील जीवन के सफर में राही मिलते है बिछड जाने को..
दोन भागात आहे. लता मंगेशकरने गायलेल्या गीतात
विरहाची भावना आहे. मात्र किशोरकुमारने गायलेल्या भागात आनंदी
भावनाच आहे.
फिल्मीस्तानच्या
शिकारी (1946) मध्ये एसडी बर्मन यांनी प्रथमच
संगीत दिले. तेव्हा किशोर कुमार गायक बनले नव्हते. परंतु, मेहमूदबरोबर त्याची लहानशी भूमिका होती.
नंतर दोन वर्षानंतर ते पार्श्वगायक बनले आणि
1950 साली सचिनदांनी प्यार चित्रपटात किशोरकुमार यांच्या आवाजाचा वापर
करून घेतला. बाजी (1951) नम्तर देव आनंदचा
किशोर पार्श्वगायक बनले. प्यार मध्ये राजकपूरला
किशोरकुमार यांनी आवाज दिला. गोप( एक नजर),
प्रेमनाथ (नौजवान) आणि करण
दिवाण ( बहार) यांना त्यांनी आवाज दिला.
बहार मधील सर्वात लोकप्रिय गीत कसूर आपका न मेरे बाप का.. हे कमालच आहे. टॅक्सी ड्रायव्हर मधील चाहे कोई खुश रहो
पण धम्माल गीत आहे. या गाण्यात किशोरकुमार यांच्याबरोबर जॉनी
वॉकरच्या आवाजाची कमालही ऐकायला मिळते.
गाण्यातील बारकावे
अगदी अचूक टिपण्यात किशोरकुमार माहिर होते. चलती का नाम गाडी मध्ये हे वैशिष्ट्य प्रथमच दिसले. धीरे से आना रे बगियन में.. मध्ये किशोरकुमार अगदी खुललेच
होते.पांच रुपैया बारा आना.. गाण्यात तर
त्यांनी जीव ओतला. छुपा रुस्तुम मधील एसडी बर्मन यांनी धीरे से
जानान खऋइयन में.. हे गीत किशोरच्या तोंडी घालून अगदी धम्माल
केली.
एसडी बर्मन यांच्या
संगीतांतर्गत किशोर यांच्या पार्श्वगायनाचे पर्व 1950 ते 1956 इतके म्हणजे सहा वर्षे चालले. 1969 पासून बर्मनदांच्या
संगीत दिग्दर्शनाखाली आराधना नंतर किशोरकुमारची दुसरी बाजू सुरू झाली. यापूर्वी केवळ देव आनंदलाच आवाज देणार्या किशोरकुमार
यांचा विचार या दुसर्या खेळीत संगीतकार राजेश खन्ना बरोबरच दुसर्या हिरोंबरोबरही किशोरच्या आवाजाचा वापर करू लागले. त्यामुळे
किशोरकुमार यांच्या दुसर्या खेळीचे श्रेय बर्मनदांना द्यायला
हवे.
1961 नंतर अभिनेता
म्हणून किशोरकुमार यांचा घसरता काळा आला आणि ते राजेश खन्नाचा आवाजच बनला. सुपरस्टारपदानंतर राजेश खन्नाच्या यशात किशोरकुमार यांच्या आवाजाची मोठी भागिदारी
होती. मेरे सपनों की रानी कब आयेगी तू, रुप तेरा मस्ताना ( आराधना), बाय
बाय मिस गुडनाईट, ये लाल रंग ( प्रेमनगर)
ही गाणी लोकप्रिय ठरली. नंतर किशोरकुमार यांचा
आवाज शशीकपूर,धर्मेंद्र, अमिताभ बच्चन यांनाही
वापरण्यात येऊ लागला. खिलते है गुल यहां (शशी-शर्मिली),दुनिया ओ दुनिया..
(धर्मेंद्र-नया जमाना), तेरा
पिछा ना छोडेगें, गिर गया झुमका.. (धर्मेंद्र-जुगनू), मीत ना मिले रे मन का.., तेरे मेरे मिलन की ये रैना ( अमिताभ- अभिमान), बडी सुनी सुनी है.., आये
तुम याद मुझे..( अमिताभ-मिली), साला मैं तो साहब बन गया..(दिलीपकुमार-सगीना) अशा गाण्यांना किशोरकुमार यांचा आवाज आहे.
किशोरकुमार यांनी
अन्य कित्येक संगीतकारांच्या हाताखाली गाणी गायली मात्र सचिनदांच्या संगीतांतर्गत गायलेल्या
किशोरच्या गाण्यांची खुमारी काही वेगळीच. ॠचिनदांना याचे कारण कुणी तरी विचारले होते, तेव्हा ते म्हणाले होते, माझ्याकडे गायचे असेल तेव्हा
किशोर आदल्यादिवशी कुणाकडेही गात नाही. तो संपूर्ण आराम करतो.
त्यामुळे मी त्याचा आवाज पूर्णतया: खुलवू शकतो.
1950 च्या प्यार
पासून सुरू झालेल्या एसडी बर्मन यांच्याबरोबर गायला सुरुवात करणार्या किशोरकुमार यांची ही सचिनदांबरोबरची स्वरयात्रा 1975 सालच्या मिली बरोबर संपली. ॠचिनदांच्या संगीतांतर्गत
गायलेले किशोरकुमार यांचे शेवटचे गीत बडी सुनी सुनी है.. हे होते.
या गाण्याची रिहर्सल सचिनदांनी किशोरकुमार यांच्याकडून करवून घेतली होती.
मात्र ते गाणे ध्वनिमुद्रित करण्यापूर्वी सचिनदा निर्वतले आणि त्यांचा
संगीतकार मुलगा आर.डी. बर्मन यांनी ते गाणे
ध्वनिमुद्रित केले. आज हे तिन्ही अग्रणी या जगात नाहीत.
मात्र आपल्या सुरेल यात्रेतील एकेक चीज ते कर्णमधूर गाण्यांच्या रुपात
आपल्यासाठी ठेऊन गेलेत.
No comments:
Post a Comment