मुबलक नैसर्गिक साधने असलेले
ओडिशा हे आता विदेशी गुंतवणूकदारांसाठी आकर्षण केंद्र ठरत आहे. सिंटेल व विप्रोसारख्या कंपन्या येथे आल्या
आहेत. नॅशनल अॅल्युमिनियम, रुरकेला स्टील, महिंद्र सत्यम असे मोठ-मोठे उद्योग राज्यात स्थापित आहेत. 1994 नंतर संस्थात्मक
विस्तार व विकास करून ओडिशा प्रगतीची हनुमान उडी घेतल्याच्या पवित्र्यात आहे.
उद्योगांची नव्याने स्थापना व भांडवल गुंतवणूक यांच्या आघाडीवर बघितल्यास
ओडिशाने सर्वांत अधिक सामंजस्य करार करण्यात यश मिळविले आहे.
सांस्कृतिक काही सहस्र वर्षांचा
वारसा लाभलेले आणि ऐतिहासिकष्ट्या राष्ट्राच्या इतिहासावर दीर्घकालीन प्रभाव पाडणार्या घटनांचे साक्षीदार असलेले राज्य म्हणून ओडिशाकडे
निर्देश करावा लागेल. हिंसाचारातिरेकामुळे दु:खी झालेल्या विश्वप्रसिद्ध सम्राट अशोक यास कलिंग युद्धामुळे
शांती व अहिंसेच्या विचारांकडे वळविले. सम्राट अशोकांनीच बुद्ध
विचारांचा प्रभाव जगभर पसरविला आणि शांततेची पताका सर्वत्र फडकविली. बुद्ध धर्मानुयायी चीन व जपान, तसेच अन्य देश आज सांस्कृतिकदृष्ट्याच
नव्हे तर ज्ञानविषयक क्रांती आणि उद्योगीकरणाच्या दृष्टीनेही आघाडीवर आहेत.
बिहारप्रमाणेच बुद्ध धर्माचा सांस्कृतिक प्रभाव ओडिशावरसुद्धा जाणवतो.
बुद्ध धर्माचे वैचारिक उगमस्थान म्हणून बिहार सारखेच महत्त्व ओडिशालाही
आहे. तथागत हे बुद्धाचे नाव ओडिशात लोकप्रिय आहे.
ओडिशा हे भारताच्या पूर्व किनार्यावर असून, राज्याच्या
उत्तर पूर्वेस प. बंगाल, उत्तरेस झारखंड,
पश्चिमेस छत्तीसगड, दक्षिणेस
आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत. इ. स.
पूर्व 261 मध्ये मौर्य सम्राट अशोकाच्या अंकित
होण्याअगोदर येथे कलिंग राजवट होती. आजचे ओडिशा राज्य हे ब्रिटिश
राजवटीतच तयार झाले ते 1 एप्रिल 1936 रोजी.
त्यामुळे 1 एप्रिल हा दिवस ‘उत्कल’ स्थापन दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या राष्ट्रगीतातही ओडिशाचा उल्लेख ‘उत्कल’
म्हणूनच करण्यात आला आहे. पूर्व कटक ही ओडिशाची
राजधानी होती. 13 एप्रिल 1948 पासून भुवनेश्वर हे शहर राजधानीचे ठिकाण झाले. ओडिशाचा किनारा
480 कि. मी. एवढा विस्तीर्ण
व लांब असला तरी सरळसोट असल्याने यावर पारदीप हे एकमेव बंदर आहे. अलिकडे धामरा बंदराचा विकासही झाला आहे. ओडिशा हे राज्याचे
नाव पाली ओद्रा व देशा या शब्दांच्या संयोगातून तयार झाले आहे. ओद्रास याबरोबरच पौंड्क, द्रविड, कंबोज, यवन, साक, पारडास, पल्लव, चिनास वगैरे नावांनीही
येथील लोक इतिहासात ओळखले जात. ग्रीक इतिहासातील ‘ओरेट्स’ हा उल्लेख संस्कृतमधील ‘ओद्रा’शी साधर्म्य दाखविणारा आहे.
चिनी प्रवासी झुआन जंग, मुसलमानी भूगोल अभ्यासक खुर्दाबिन, पर्शियन भूगोल साहित्य इत्यादींमध्ये ओडिशाचा उल्लेख आढळून येतो. मध्य युगातील तबकुत-ए-निशरी,
तबकुत-एअकबरी, रियादुस सल्तेन,
तारख-ए- फिरुझशी मध्ये ओडिशाचा
(ओद्रा) उल्लेख जैनगर म्हणून केला आहे.
ज्ञात इतिहासाच्या आधीपासूनच ओडिशाच्या भूमीवर मानवी वस्ती असल्याच्या
खुणा सापडतात. कलिंग राजवटी अगोदरपासूनच ‘ओद्रा’ हा शब्द प्रचलित होता. पूर्वी
फक्त महानदीच्या खोर्याचा प्रदेशच ‘ओद्रा’मध्य समाविष्ट होता. पुढे विविध राजवटींच्या काळात प्रादेशिक
विस्तार होत गेला आणि आजचे ओडिशा राज्य साकार झाले. जगन्नाथाचा
उल्लेख उपनिषदामध्ये आहे. समुद्र किनारे, विशाल जलशय, कोणार्कचे सुप्रसिद्ध सूर्य मंदिर,
सर्वांनी मिळून ओढण्याचा जगन्नाथ रथ महोत्सव, ओडिशा
नृत्य शैली अशा अनेक कारणांमुळे ओडिशा राज्य भारतीय व विदेशी पर्यटकांना आकर्षित करते
यात नवल नाही. संबळपूर जवळ असलेले हिराकुड धरण भारतातील मोठ्या
धरणांपैकी एक आहे. छोटा नागपूर पश्चिम
व उत्तर ओडिशाचा भाग व्यापून आहे. ‘ऑलिव्ह दिडली’ म्हणून प्रसिद्ध कासवे येथे मुबलक प्रमाणात आढळतात. वनसंपदाही
भरपूर आहे. मात्र, वृक्षतोडीचे संकट अन्य
प्रदेशांप्रमाणेच ओडिशालाही भेडसावत आहे. ओडिशात अनेक राष्ट्रीय
नैसर्गिक प्राणिसंग्रह असून, त्यामध्येही सिमलीपाल नॅशनल पार्क
सर्वांत प्रसिद्ध आहे. येथील विशाल जलाशय चिस्का नैसर्गिक आश्चर्य सदरात गणले जाते. राष्ट्रीय पातळीवर जनता दलाचे
विघटन झाल्यानंतर ओडिशाचे महानायक बिजू पटनायक यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव नवीन पटनायक
यांच्या बिजू जनता दलाच्या नेतृत्वाखाली राज्यात स्थिर सरकार सत्तारूढ आहे.
राष्ट्रीय सरासरीपेक्षा ओडिशाचा विकासदर
अधिक आहे. सकल गृह उत्पन्नामध्येही सातत्याने वाढ होत आहे.
आज सर्वात वेगाने विकास करणार्या राज्यात ओडिशाची
गणना केली जाते. मुबलक नैसर्गिक साधने असलेले ओडिशा हे आता विदेशी
गुंतवणूकदारांसाठी आकर्षण केंद्र ठरत आहे. सिंटेल व विप्रोसारख्या
कंपन्या येथे आल्या आहेत. नॅशनल अॅल्युमिनियम,
रुरकेला स्टील, महिंद्र सत्यम असे मोठ-मोठे उद्योग राज्यात स्थापित आहेत. 1994 नंतर संस्थात्मक
विस्तार व विकास करून ओडिशा प्रगतीची हनुमान उडी घेतल्याच्या पवित्र्यात आहे.
उद्योगांची नव्याने स्थापना व भांडवल गुंतवणूक यांच्या आघाडीवर बघितल्यास
ओडिशाने सर्वांत अधिक सामंजस्य करार करण्यात यश मिळविले आहे. बरेचदा येणारे महापूर आणि वादळे अशा नैसर्गिक संकटांवर राज्याला मात करावी
लागते. तरीही राज्य प्रगतिपथावर आहे, ही
बाब कौतुकास्पद मानली जाते. राज्यातील पायाभूत सुविधांचा विकासही
झपाट्याने होत आहे. एका सर्वेक्षणानुसार आगामी काही वर्षांमध्ये
ओडिशामध्ये औद्योगिक क्षेत्रात प्रचंड भांडवल गुंतवणूक होण्याची शक्यता वर्तविली जात
आहे. जलमार्ग, रेल-मार्ग, रस्ते यांचा विकासही जोरकसपणे होताना दिसत आहे.
स्थापना: इंग्रज राजवटीत 1 एप्रिल
1936 राजधानी भुवनेश्वर, (जिल्हे 30) राज्यपाल एस. सी.
जमिर मुख्यमंत्री नवीन पटनायक (बिजू जनता दल)
विधानसभा सदस्य संख्या 147 लोकसभा सदस्य संख्या
21 क्षेत्रफळ 60,160 चौ.मी.
लोकसंख्या 41,947,358 (2011) साक्षरता
73.45 टक्के
No comments:
Post a Comment