Friday, July 28, 2017

ज्योतिषशास्त्र आणि आपण

     माणसाला आपल्या पुढच्या आयुष्यात काय घडणार आहे,याची नेहमीच उत्सुकता असते. भविष्य जाणून घ्यायला माणूस तसा उतावीळ असतो. ते जाणून घेण्यासाठी त्याचा प्रयत्न असतो. यासाठी ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला जातो. मात्र काही लोक याच्या आहारी जातात. अपेक्षित परिणाम आला नाही तर मात्र निराश होतात. बरेच काही गमावून बसतातज्यांनी याचे दुकान मांडले आहे, ती मंडळी लोकांना लुबाडून आपले खिसे गरम करतात. अशा लोकांमुळे ज्योतिषशास्त्र बदनाम झाले आहे.पण तरीही भविष्य जाणून घ्यायची वृत्ती संपलेली नाही. त्याची उत्सुकता अबाधित आहेज्योतिष अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार  शनी, मंगळ, गुरु हे खगोलीय ग्रह असले तरीही यांचा मानवी जीवनमानावर परिणाम होत असतो. अशी धारणा असलेल्यांची लोकांची संख्याही मोठी आहे. कित्येक जण या ग्रहांच्या हालचालींचा दैनंदिन जीवनाशी संबध लावतात. त्यानुसार आपले जीवन व्यतीत करत असतात.

      ज्योतिष हे एक शास्त्र आहे.याला हळूहळू मान्यता मिळत आहे. हिंदू ज्योतिष पद्धती ही हिंदूचे प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारे ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीवर बेतलेले एक शास्त्र आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या मते, ज्योतिष या शब्दाचा स्त्रोत हा मूळ संस्कृत शब्दज्योतिमध्ये आहे. ‘ज्योतिम्हणजे प्रकाश देणारी वस्तू. माणसाच्या जन्मवेळेची आकाशातील ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात, असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र होय. ज्योतिषशास्त्र म्हणजे परिपूर्ण विज्ञान नाही,हेही कबूल करायला हवे.
      या शास्त्राचा काय फायद्याबाबत समाजात मतभिन्नत आहे. ज्योतिषशास्त्राबद्दल अनेक समज-गैरसमज आपल्या समाजात आहेत. ज्योतिषशास्त्रात वर्तविलेले भाकित जरी जसेच्या तसे नसले तरी 80 टक्के घटना जुळून येत असतात, असे अभ्यासकांचे मत आहे. हे शास्त्र भविष्यातील धोके सांगत असते. भविष्य जाणून हे धोके टाळण्याचा प्रयत्न माणूस करू शकतो. किंवा या धोक्यातील तीव्रता कमी करण्याचा प्रयत्नदेखील हे शास्त्र जाणून करू शकतो. मात्र, भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा आधार घ्या. पण, त्याच्या आहारी जाऊ नका. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, असाही सल्ला दिला जातो.
     ज्योतिष सांगण्याची पारंपरिक पद्धत म्हणजे कुंडली. त्यानंतर कृष्णमूर्ती, हात बघून, चेहरा बघून अशा अनेक भविष्य सांगण्याच्या पद्धती आहेत. कृष्णमूर्ती पद्धतीत गणिती भाग मोठया प्रमाणावर असतो. साडेसातीबाबत लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हा काळ माणसाच्यादृष्टीने मोठा कठीण काळ असतो. अभ्यासकांच्या मतानुसार साडेसातीच्या काळात शनि 3 राशींमध्ये भ्रमण करतो. सध्या शनी ज्या राशीत असतो, त्याच्या मागच्या आणि पुढच्या राशीत शनी काही काळ राहतो. राशीचे काही वाईट करत नाही. 20 ते 50 वयापर्यंतच्या व्यक्तींना साडेसाती लागते. साडेसातीत वाईटच होत किंवा फार त्रास होतो हा गैरसमज आहे. शनी ग्रहाइतका न्यायी ग्रह दुसरा कोणताही नाही. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट, मग समोर कोणीही असो, म्हणणारा हा एकमेव ग्रह आहे. साडेसातीच्या काळात अनेक लोक भरभराटीलाही आलेले आहेत.
      मंगळ दोषाबद्दलही लोकांमध्ये सारखी चर्चा होत राहते. अशा मुला-मुलींंची लग्ने लवकर होत नाहीत, असे म्हटले जाते.
जन्मकुंडलीतील हा  मंगळ दोष अनेक मुला-मुलींच्या लग्नात आडवा येतो. त्यामुळे अशा मुला-मुलींचे लग्न कारण नसताना रखडते. मात्र अभ्यासक सांगतात की, मुळात मंगळ अशुभ दोष नाही. आपल्या सर्वांच्याच पत्रिकेत इतर ग्रहांप्रमाणेच मंगळ हा ही एक ग्रह असतो. पण 1, 4, 7, 8 12 या स्थानात मंगळ असल्यास तो मंगळदोष मनाला जातो. मंगळी व्यक्तींची वागण्याची पद्धत खूप सरळ असते. मंगळ असलेल्या व्यक्तींमध्ये स्पष्टवक्तेपणा असतो. त्यामुळे त्यांचे इतर राशींसोबत जुळणे कठीण असते. त्यांचे प्रेम आणि राग, दोन्ही अतिशय तीव्र पण मनापासून असते. मंगळ दोष असलेल्या व्यक्तींचा स्वभाव नीट समजून घेतला तर या व्यक्ती पत्नी व नंतर कुटुंबीयांसाठी सकारात्मक ठरू शकतात.
 ज्योतिषशास्त्रात आणखी एका गोष्टीची भिती असते, ती म्हणजे कालसर्प योग . अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार कालसर्प नावाचा कोणताही योग नाही. अडलेल्या लोकांना लुटण्यासाठी काही लोकांनी या कालसर्प नावाच्या योगला जन्म दिला. लोक अंधश्रध्दाळू आहेत. काही लोकांना मोठमोठया पूजा सांगितल्या नाहीत तर उपाय झाला असे वाटत नाही. त्यामुळे भोंदू लोकांचे फावते.
लग्नाच्या वेळी गुण बघणे ही पद्धत आता कालबाह्य झाली आहे. सध्या प्रेमविवाह मोठया प्रमाणावर होतात. त्यांच्या पत्रिकाही बघितल्या जात नाहीत. तरीही त्यांची लग्न व्यवस्थित टिकतात. विवाह मोडतात,त्याला बर्याच प्रमाणात इगो महत्त्वाचा ठरतो.आजची पिढी शिक्षित आहे. बर्याच घरात दोघेही कमावते असतात. त्यामुळे एकमेकावरचे दडपण सहन करत नाहीत. एकमेकाला समजून घेतले तर विवाह टिकतात. त्यामुळे स्वभाव, मन, आरोग्य, सांपत्तिक स्थिती बघून लग्न करण्याचा सल्ला देतो.
      येणाऱया संकटावर मात करण्यासाठीच्या उपायाबाबत जाणकार सांगतात ते मात्र लक्षात ठेवले पाहिजे. ज्योतिषशास्त्र फक्त भविष्य सांगते. जे भविष्यात होणार आहे ते अटळ आहे. भविष्य जाणून घेतात. कारण, येणाऱया संकटावर मात करण्यासाठी आपण सावध राहावे. कोणतीही पूजा किंवा कोणताही उपाय भविष्यातील संकटे दूर करू शकत नाही.
      ग्रहांच्या खडयांबद्दल लोकांना उत्सुकता आहे.मात्र खडा हे आपल्या शरीरात व्हिटॅमिनचे काम करतो. खडा नेहमी अंगठीतच  घालावा, असे सांगितले जाते. कारण इतर इंद्रियांच्या तुलनेत आपला नेहमी सूर्याच्या संपर्कात येतो. कधी झाकला जात नाही. त्यामुळे कोणताही खडा अंगठीत घालण्याचा सल्ला दिला जातो. खडयांचा उपयोग हा धारण केल्यानंतर त्याचा परिणाम हा 1 ते 2 वर्ष एवढाच राहतो. तसेच हा खडा हातात घातल्यानंतर काढायचा नसतो. तसेच ज्या ग्रहासाठी आपण हा खडा घालणार आहे. त्याच्या वेळेनुसार, संबंधित ग्रहाचा मंत्र म्हटल्यानंतर खडा घालता येतो.
      ज्योतिषबाबत काहीही समज-गैरसमज असले तरी बहुतांश लोक भविष्य वाचतातच.काही लोक टाईमपास म्हणूनही वाचतातज्योतिषशास्त्राला नावे ठेवणारी अनेक लोक मागच्या दाराने भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषाकडे जातातबऱयाच क्षेत्रातील मंडळी भविष्य जाणून घेतल्या शिवाय कामाला हात घालत नाही. ज्या कामात स्थैर्य नाही अशा सर्वच क्षेत्रातील लोक ज्योतिषशास्त्राचा आधार घेतात. सेलिब्रेटी लोकांच्या ज्योतिषाबाबतच्या कहाण्या अधिक ऐकायला मिळतात. याशिवाय सर्वात आधी जातात ते राजकारणी मंडळी. निवडणूक ही त्यांच्यासाठी महत्त्वाची असते. याकाळात ज्योतिष सांगणार्यांना मोठा भाव येतो. मेहनतीवर विश्वास असलेली  उद्योजक, चित्रपट निर्मिती क्षेत्रातले लोकही करणारे  भविष्याचा आधार घेतात.
     राशीवरून भविष्याचा अंदाज पाहण्याची संख्या मोठी आहे. अलिकडे विविध कार्ड पाहूनही भविष्य सांगितले जात असले तरी पारंपारिक राशीवरूनच्या भविष्य सांगण्याला अधिक महत्त्व आहे. अभ्यासकांनुसार जन्मावेळी चंद्र ज्या राशीत असतो ती आपली राशी समजली जाते. कोणत्याही ग्रहाला प्राप्त झालेली राशी, स्थान म्हणजे घर किंवा भाव, नक्षत्र, भावेशत्व, ग्रहाच वय, ग्रहावर असलेली इतर ग्रहांची चांगली-वाईट दृष्टी व त्या विवक्षित ग्रहाचे इतर ग्रहांशी होणारे शुभ-अशुभ योग हे सर्व पाहिल्या शिवाय कोणतेही निदान करता येत नाही. कुंडलीतील प्रत्येक ग्रहाची तपासणी करून वर्तवलेले भविष्यविषयक अंदाज सहसा चुकीचे येत नाहीत. जन्मवेळ आणि जन्मस्थळी  दिसलेली ग्रह-राशींची स्थिती दाखवणारा सांकेतिक पद्धतीचा आराखडा म्हणजे जन्मकुंडली. जन्मकुंडली तयार करण्यासाठी जन्मवेळ, ठिकाण, दिनांक सारखे मुद्दे महत्त्वाचे असतात. जन्माच्या वेळेवरून अचूक जन्मकुंडली बनविणे सोपे पडते. जन्मकुंडलीमध्ये मुख्य 9 ग्रह त्यांच्या स्थानानुसार चौकटीत त्यांना स्थान दिलेले असते. तर त्या सोबत राशींची स्थाने दिली जातात. या दोन्हींच्या 12 घरांमधील भविष्यातील अंदाज आणि भुतकाळातील घटना भविष्यकार वर्तवू शकतो, असे ज्योतिष सांगतात.


No comments:

Post a Comment