आपल्यातले बरेच
लोक विचार करतात की, श्रीमंत बनल्यावर माणसे पैसा पाण्यासारखा खर्च करतात. वाट्टेल तशी चैनी करतात.कसंही वागतात. पण तसं नसतं. जगातले सगळ्यात श्रीमंत लोकदेखील अगदी विचार
करून पैसा खर्च करतात. त्यामुळे त्यांच्या अशा चांगल्या सवयी
आपणदेखील अंगी बाणगायला हव्यात. यातून आपणदेखील काही तरी घ्यायला
हवे.
1.ते साध्या घरात राहतात आणि सामान्य कार चालवतात
बहुतांश सुपर-रिच माणसे पैशाचे प्रदर्शन करत नाहीत.
आपल्याला लागेल तेवढेच खर्च करतात. साध्या घरात
राहतात. सामान्य कार चालवतात. इकॉनॉमी क्लासमधून
उड्डाण करतात. ऑरेन बफेट आणि ऑर्लोस स्लिम किती तरी वर्षांपासून
जुन्या घरात राहतात. अजीम प्रेमजी फोन एस्कॉर्ट गाडी चालवतात.
यातून आपल्याला
बर्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
जर तुम्ही ईएमआय अफोर्ड करू शकत नसाल तर कर्ज काढून घर घेऊ नका. हाऊसिंगसाठी 40 टक्क्यांपेक्षा अधिक खर्च करू नका.
मग ते कर्ज असो किंवा भाड्याने असेल. आपल्या उत्पन्नाच्या
5 टक्क्यापेक्षा अधिकचा हिस्सा कार लोनसाठी खर्च करू नये. आपले सोशल स्टेटस राखण्याच्या चक्करमध्ये वायफट खर्च करू नका.
2. ते कपडे,चपला आणि खाण्या-पिण्यावर
खर्च कमी करतात
नेहमी स्मार्ट
श्रीमंत लोक डिझाइनर कपडे, ब्रांडेड चपला-बूट आणि अक्सेसरीज खरेदी करण्यापासून दूर
राहतात. ते अशा गोष्टींवर अधिक खर्च करतात, ज्या गोष्टी भविष्यात श्रीमंतीपणा कायम राखण्यासाठी सहाय्यभूत ठरतात.
ते श्रीमंतीचा देखावा करत नाहीत.रजनीकांत ऑफ स्क्रीन
साधा धोती-कुर्ता नेसतात.
यातून आपणही काही
गोष्टी शिकायला हव्यात. कपड्यांवर 3 ते 5 टक्क्यांपर्यंत
खर्च करावेत. सुट्ट्यांवरदेखील 5 टक्के
आणि खाण्या-पिण्यावर 15 टक्के खर्च करावेत.
अशा एसेट्समध्ये गुंतवणूक करावी, ज्यामुळे तुमच्या
संपत्तीमध्ये वाढ व्हावी.संपत्तीचे मूल्य घटवणार्या वस्तू जशा की कपडे,वाहने आदींमध्ये गुंतवणूक करण्यापासून
स्वत:ला वाचवा. जीवनात दिखाऊपणा करण्यापासून
स्वत:ला दूर सारा. लक्ष्याप्रति समर्पित
राहण्याचा प्रयत्न करा.
3. ते बचत पहिल्यांदा करतात, मग खर्च करतात
तुम्हाला ज्या
वस्तूंची गरज नाही, त्या वस्तू तुम्ही खरेदी करत असाल तर मग तुम्हाला लवकरच अशा वस्तू विकाव्या
लागतील की, ज्यांची तुम्हाला खरोखरच खरी गरज आहे. जर तुमचे उत्पन्न कमी असतानाही बचतीची सवय असेल तर तुमचं सुरक्षित भविष्य बनू
शकतं.
यातून आपल्याला
बचतीची शिकवण मिळते. इमरजन्सीसाठी सहा महिन्याचा मासिक खर्च बचत करायला शिकले पाहिजे. आपल्या गुंतवणुकीचे प्लॅनिंग करायला हवे. दर महिन्याच्या
पहिल्या आठवड्यात बँक अकाउंटमधून एसआयपीसाठी रक्कम काढली जायला हवी.ते निश्चित करा.बचतीची सवय विकसित
झाल्याने तुमचे भविष्य सुरक्षित राहू शकते.
4. ते अधिक कॅश जवळ ठेवत नाहीत, क्रेडिट कार्डचा वापर करतात
अमेरिक्तील ऑईलकिंग
टी.बून पिकेन्स यांचा असा सल्ला आहे
की, तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, तेवढ्यासाठी कॅश कॅरी करा. बहुतांश श्रीमंत माणसे अधिक
कॅश स्वत:जवळ ठेवत नाहीत. त्यापेक्षा ते
क्रेडिट कार्डचा अधिक वापर करतात. ते क्रेडिट कार्डचा वापर फारच
संयमाने करतात.
यातून आपण क्रेडिट
कार्डचा नेहमी वापर करायला शिकले पाहिजे.यामुळे तुम्ही खर्चावर चांगल्याप्रकारे लक्ष ठेऊ शकता. यामुळे रिवार्डस आणि बेनिफिट्सच्या रुपाने फ्री मनी मिळून जातात.यामुळे चोरांपासून चांगली सुरक्षा मिळू शकते. अधिक रोखड
बाळगणे योग्य नव्हे.त्यापासून धोके आहेत.
5. ते डिस्काउंट शोधतात आणि किंमती कमी करून घेतात
श्रीमंत माणसे
पैशाचा योग्य वापर करतात. ते डिस्काउंट सेल,कूपन्स,रिवार्ड
आणि लॉयल्टी प्वॉइंट्सच्या मदतीने पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात. थोड्या थोड्या डिस्काउंटसमुळे वेळोवेळी बरीच बचत होऊन जाते.यूएस स्टार क्रिस्टन बेल असतील किंवा अजीम प्रेमजी, ते
आपल्या एम्प्लॉइजना ऑफिसची लाईटस बंद करायला सांगतात.
यातून आपण लाईट,फोन बील किंवा अन्य बिले भरताना
किंवा रेल्वे,विमान तिकिट बूक करताना पेटीएमसारख्या मोबाईल अॅप्सचा वापर करायला शिकले पाहिजे.कारण या गोष्टी कॅशबॅक
व डिस्काउंट ऑफर करतात. प्रवासाच्या दरम्यान डिस्काउंट मिळवण्यासाठी
nearbuy.com सारख्या डिस्काउंट साईट्स उपयोगात आणायला हव्यात.
6. ते क्वॉलिटीवर अधिक लक्ष देतात
श्रीमंत लोक वस्तू
स्वस्त आहेत, म्हणून त्या
खरेदी करत नाहीत, तर ते त्याची क्वॉलिटी पाहतात. ते चांगल्या क्वॉलिटीच्या वस्तू विकत घेतात, कारण यामुळे
प्रोडक्ट अधिक काळ टिकतात. स्वस्त होम अप्लायंस खरेदी करत असाल
तर तुम्हाला मेंटेनन्स व रिपेयर्सवर अधिक खर्च करावे लागेल.
ज्या ज्या वेळेला
तुम्ही एखादी वस्तू खरेदी कराल, त्या त्या वेळेला त्याचा उपयोग आणि किंमत यादरम्यान तुलना करा. जर तुम्ही एखादी वस्तू एक-दोन वेळाच वापरणार असाल तर
अशी वस्तू खरेदी करू नका.
7. ते चॅरिटी करायला पसंदी देतात
प्रेमजी, शिव नडार आणि बिल गेट्स सारख्या
अनेक व्यक्ती आपल्या उत्पन्नातला मोठा हिस्सा चॅरिटीमध्ये दान करतात. श्रीमंत व्यक्तींना माहित आहे की, दान केल्याने त्यांच्या
संपत्तीत मोठ्या वेगाने वाढ होते.त्यामुळे अशी माणसे जास्तीत
जास्त संपत्ती दान करण्यावर विश्वास ठेवतात.
दान करण्यावर पूर्ण
विश्वास ठेवा, पण आपले भविष्यदेखील सुरक्षित करा. ज्या ज्या वेळेला
तुम्ही चॅरिटीजना डोनेट करता, त्या त्या वेळेला सेक्शन
80 जीअंतर्गत आयकरमध्ये सूट घ्यायला विसरू नका.
वॉरेन बफेट, बर्कशायर हॅथवेचे
सीईओ आहेत.यांची एकूण संपत्ती
75.6 अब्ज डॉलर इतकी आहे. मात्र ते आजही सामान्य
घरातच राहतात, जे त्यांनी 1958 मध्ये
31 हजार 500 डॉलरला विकत घेतले होते. लग्जरी कार,कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनवर खर्च करत नाहीत.
एन.आर. नारायण
मूर्ती हे इन्फोसिसचे
सह-संस्थापक आहेत. यांची एकूण संपत्ती 1.8 अब्ज डॉलर इतकी आहे. मात्र आजही ते सामान्य जीवन जगतात. कपडे, खाण्या-पिण्यावर व वाहनांवर अधिक खर्च करत नाहीत.
आजदेखील बंगळुरूमध्ये सामान्य घरात राहतात.
फेसबूकचा सह-संस्थापक मार्क झुकरबर्ग
याची एकूण संपत्ती 56 अब्ज डॉलर आहे. वायफट
खर्च करत नाही. डिझायनर कपडे,चपला-बूट यावर खर्च करत नाही. साधारण असे टी-शर्ट आणि जीन्स वापरतो. 30 हजार डॉलर किंमतीची वॉक्सवॅगन
हॅचबॅक चालवतो.
कार्लोस स्लिम
हेलू ( मॅक्सिकन
बिझनेस टायकून) यांची एकूण संपत्ती 54.5 अब्ज डॉलर आहे. 40 वर्षांपासून एकाच घरात राहतात.
लग्जरी कार, कॉम्प्युटर यांचा छंद नाही.
घरचं जेवण आवडतं.
रजनीकांत या फिल्मस्टारची संपत्ती 50 लाख डॉलर आहे.डिझायनर कपड्यांचा छंद नाही. सामान्य जीवन जगतात.लग्जरी गाड्या त्यांच्याकडे नाहीत. होंडा सिविक,
शेवरलेट तवेरा किंवा टोयोटा इनोवा वापरात आणतात.
मिशेल ओबामा या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या
पत्नी आहेत. यांची संपत्ती
11 लाख डॉलर इतकी आहे. ज्या दुकानात अधिक डिस्काउंट
मिळते, तिथून वस्तूंची खरेदी करतात. सेल्स
आणि डिस्काउंटच्या मदतीने घरचा खर्च वाचवण्याचा प्रयत्न करतात.
अजीम प्रेमजी विप्रोचे अध्यक्ष आहेत. यांची संपत्ती 14.9 अब्ज डॉलर आहे. इकॉनॉमी क्लासमधून उड्डान करतात.
महागड्या हॉटेलमध्ये राहत नाहीत. फोर्ड एस्कॉर्ट
आणि टोयोटो कोरोला चालवतात. यांना याहीपेक्षा पायी चालायला किंवा
रिक्षातून प्रवास करायला आवडतं.
No comments:
Post a Comment