ही गोष्ट आहे, ब्रम्हदेवाने विश्व निर्मिती केली तेव्हाची! ब्रम्हदेवाने प्राण्या-पक्ष्यांच्या निवार्यासाठी जंगलाची उत्पत्ती केली. जंगलात लहान-मोठे सगळे प्राणी-पक्षी राहत होते. परंतु, जमिनीवरून संचार करणारे छोटे-छोटे जीव हत्तीच्या पायाखाली येऊन आपला जीव गमावत. त्याच्या पायाखाली चिरडल्या जाणार्या छोट्या जीवांमध्ये मुंग्यांची संख्या अधिक होती. आतापर्यंत अगणित मुंग्यांना आपला हकनाक जीव गमवावा लागला होता. शिवाय तो जाता-येता आपल्या सोंडेने आजू-बाजूच्या झाडांवरची घरटीदेखील उखडून टाकत असे. त्याला आपल्या बळाचा मोठा गर्व चढला होता. त्यामुळे जंगलवासी भयभयीत झाले होते. वैतागून गेले होते.
एकदा हत्ती जंगलातून बाहेर पडला आणि एका गावात शिरला. गावाच्या मध्यातूनच एक नदी वाहत होती. नदीच्या किनार्याला एक डेरेदार व हिरवेगार वडाचे झाड होते. त्याला एक शिवभक्त रोज नित्यनेमाने जलाभिषेक घालत असे. त्याची देखभाल करत असे. त्या झाडाखालीच मुंग्या आपले घर करून मोठ्या आनंदाने राहत होत्या. त्यांनी शिवभक्ताला कधीच त्रास दिला नव्हता.ते हिरवेगार वडाचे झाड उन्मत हत्तीच्या नजरेस पडले. मऊ लुसलुशीत हिरवी -कोवळी पाने पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने सोंडेने त्याला वेटोळे घातले आणि झाड मुळासह उखडून टाकले. आणि त्या मऊ लुसलुशीत पानांवर मोठ्या मजेने ताव मारू लागला.
तेवढ्यात तिथे शिवभक्त आला. झाडाची ती अवस्था पाहून त्याच्या मनाल फार वेदना झाल्या. झाडाच्या आश्रयाखाली असलेल्या छोट्या मुंग्याही बेघर झाल्या होत्या. त्याला प्रचंड क्रोध आला. त्याने हत्तीला शाप दिला, ए उन्मत हत्ती, यापुढे या छोट्या मुंग्याच तुला सळो की पळो करून सोडतील आणि त्यांना पाहून तू पळ काढशील. मग त्याने मुंग्यांकडे पाहात आदेश दिला, तुम्हाला बेघर करणार्या हत्तीवर तुटून पडा. मुंग्या क्रोधाने फणफणत होत्याच. आदेश मिळताच त्या हत्तीवर चाल करून गेल्या. त्याच्या सोंडेत शिरल्या. आणि कडकडून चावा घेऊ लागल्या. हत्ती मात्र वेदना सहन न झाल्याने पडत-झडत, आरडत-ओरडत जंगलाच्या दिशेने पळाला. म्हणतात की, तेव्हापासून हत्ती फक्त मुंग्यांना घाबरतो. म्हणूनच तो सोंडेने जमिनीवर सारखा-सारखा फुत्कार मारत असतो.

No comments:
Post a Comment