20 ऑगस्ट 2000 मध्ये जन्मलेल्या काव्या गुप्ता हिने केवळ 26 महिने वयाची असताना यंगेस्ट स्वीमर ऑफ इंडिया हा किताब पटकावला आहे. याशिवाय तिने अनेक ऍवार्ड पटकावले आहेत. इतक्या लहान वयात तिची इतकी मोठी झेप आपल्याला आश्चर्यात टाकल्याशिवाय राहत नाही. कानपूरच्या राष्ट्रीय जलतरण पटू रीनिका गुप्ता यांची ही मुलगी आहे. काव्या अग्दी दोन वर्षांची असल्यापासून जलतरण क्षेत्रात आपला हात आजमावत आहे.
काव्याने 2002 मध्ये केवळ 26 महिना वयाची असताना कानपूरच्या गंगा नदी काठावर असलेल्या प्रार्थना घाट ते काला घाट हे सुमारे अडीच किलोमीटरचे अंतर केवळ 18.24 मिनिटांत पूर्ण करून सगळ्यांच आश्चर्याचा धक्का दिला होता. यामुळे तिचे नाव यंगेस्ट स्वीमर ऑफ इंडियाच्या रुपाने लिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्ये कोरलं गेलं. 2004 मध्ये पोगो अमेझिंग किड्स ऍवार्ड पटकावले तर 2005 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने यश भारती या खास ऍवार्डने तिला सन्मानित केलं. 2007 मध्ये गाजियाबादमध्ये तिचा निराला पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय 2008 मध्ये राष्त्रीय खेळ ऍवार्ड, 2011 मध्ये जय जगत केसरी रत्न ऍवार्ड, 2012 मध्ये राष्ट्रीय महिला जलतरण चॅम्पियनशीपचा पुरस्कारदेखील तिने जिंकला.
जलतरणात राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेल्या काव्याला अगदी लहानपणापासूनच पोहण्याचे बलकडू मिळाले.काव्याची आई रीनिका गुप्ता सांगतात की, ती दीड वर्षांची होती तेव्हापासून तिला स्वीमिंग पूलमध्ये घेऊन जायची. साधारणत: लहान मुलं पाणी म्हटले की, रडायला लागतात. पण काव्याला पाण्याशी खेळायला आवडायचं. एकदा माझे वडील कानपूरला आले होते. गंगा नदीत स्नान गेले. जाताना त्यांनी काव्याला सोबत नेले. तिथे नदीत काव्या उड्या मारताना, खेळताना पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी काव्याच्या स्वीमिंग ट्रेनिंगची जबाबदारी घेतली. मग काय पावणे दोन वर्षाची काव्या रोज आपल्या आजोबांसोबत सायकलवर बसून यमुना नदीवर पोहायला जाऊ लगली. तिथे तिला सतीश राव कोचिंग देऊ लगले. ती ज्या ज्या वेळी कानपूरला यायची तेव्हा तिला ज्योती बाबा स्वीमिंग शिकवायचे.
काव्याचे आजोबा श्याम गुप्ता सांगतात की, काव्यामध्ये एक अद्भूत क्षमता आहे. तिची मेमरीदेखील शार्प आहे. ती हार्ड वर्कर आहे. इतकंच नव्हे तर तिच्यात काही ना काही नवीन शिकण्याची लालसा आहे. नाही तर दोन वर्षाची चिमुरडी चार-पाच दिवसाच्या सरावामध्येच यमुना नदी कशी पार करू शकली असती.
काव्या फक्त पोहण्यातच माहीर नाही तर शाळेमध्ये अभ्यासातदेखील अव्वल आहे. स्वीमिंगबरोबरच टेबल टेनिसचीदेखील प्रॅक्टीस करते. आठवी वर्षात शिकणारी काव्याने याच वर्षात टेबल टेनीसमध्ये ज्युनिअर गोल्ड आणि महिलांमध्ये सिल्वर मेडल पटकावले आहे. अष्टपैलू काव्या गेल्या चार वर्षांपासून शाळेत अभ्यास टॉपवर आहे. काव्याचे रोल मॉडेल तिचे आजोबा आहेत.

No comments:
Post a Comment