ही गोष्ट फार फार वर्षांपूर्वीची आहे. त्यावेळी मांजरे उंदरांच्या पाठीशी हात धुवून लागल्याने उंदरांची पुरती झोप उडाली होती. मांजरांनी त्यांना सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे देवाने आपल्याला उंदरांच्या जन्माला घालून अन्याय केला आहे, अशी त्यांची भावना झाली होती.
यावर उपाय शोधण्यासाठी सगळ्या उंदरांची बैठक बसली. सगळ्यांनीच मांजरांच्या अत्याचाराचे रडगाणे गायला सुरुवात केली. शेवटी देवापुढे गार्हाणे घालण्याबाबत सगळ्यांचे एकमत झाले. आम्हाला जमिनीवरचा प्राणी का बनवले? आम्हाला पाण्यातला किंवा आकाशात उडाणारा प्राणी का बनवले नाही? याची विचारणा करण्याबरोबरच आम्हाला जमिनीवरचे जिणे नको, असा अट्टाहास मांडण्याचे ठरले. देवापर्यंत संदेश पोहचवण्यासाठी सगळ्यांनी श्री गणेशाचे वाहन असलेल्या मूषकाची निवड केली.
मूषक त्यांचा संदेश घेऊन देवाकडे गेला. सगळी कथा आणि व्यथा ऐकल्यावर देव हसले. खरे तर त्यांनी संपूर्ण विश्वाची निर्मिती अगदी विचारपूर्वक केली होती. सगळ्यांना अन्न, संरक्षणाची तजवीज केली होती. पण तरीही त्यांनी विचार केला की, उंदीर म्हणतात, तसे करू! पाहू तरी काय घडतं ते! त्यांनी मूषकाला विचारले, “ सांग, तुझी काय इच्छा आहे? ”
मूषक म्हणाला, “ देवा, आम्हाला पाण्यातला प्राणी बनवा. देव हात वर करून वरदान देत म्हणाले, “ तथास्तू. ”
त्यांनी ‘तथास्तू’ म्हटल्या म्हटल्या इकडे सर्व उंदरांना माशांसारखी शेपटी आणि पर आले. सगळ्यांनी अत्यानंदाने नदीत, समुद्रात उड्या घेतल्या.
उंदरांनी काही दिवस पाण्यात खूपच मौजमज्जा केली. ते पहिल्यांदाच पाण्यात पोहत होते. त्यांनी पाण्यात मनसोक्त विहार केला. पाण्यातले मोठे प्राणीही त्यांच्याकडे कुतुहलाने व काहीशा भितीने पाहात होते. पण नंतर त्यांना ज्यावेळी कळले की, आपल्यासाठी हा स्वादिष्ट आहार आहे, त्यावेळी त्यांना फारच आनंद झाला. ते त्यांच्यावर तुटूनच पडले. आणि हळूहळू उंदरांची संख्या कमी होऊ लागली.
पुन्हा सगळे मूषकाकडे गेले. आम्हाला उडण्याची शक्ती द्यावी, असे साकडे देवाकडे घालण्याविषयी विनंती केली. उंदीर भीत-भीतच देवाकडे गेला. देव म्हणाले, “ मला माहित होतं, तू पुन्हा माघारी येशील. बोल, या वेळेला उंदरांचा काय संदेश घेऊन आला आहेस? ”
मूषक म्हणाला, “पाण्यात राहणार्या प्राण्याचे वरदान मागून सगळ्यांनाच पश्चाताप झाला आहे. आता त्यांची इच्छा आहे की, त्यांना आकाशात उडण्याचा वर मिळावा. ”
देव हसले आणि म्हणाले, “ तथास्तू! ”
तसे इकडे सगळ्या उंदरांना पंख फुटले. त्यांनी आकाशात झेप घेतली. आकाशात विहार करताना गंमत वाटू लागली. पण काही दिवसांतच त्यांना आकाशात किती मोठा धोका आहे, याची कल्पना येऊ लागली. इथेसुद्धा शत्रूंची कमतरता नव्हती. गिधाडे, गरुड, घारी अशा अनेक पक्षांना त्यांच्या आगमनामुळे फारच आनंद झाला होता. आयते स्वादिष्ट खाद्य दिल्याबद्दल त्यांनी मनोमन देवाचे आभार मानले.
आता पुन्हा सगळे उंदीर चिंतेत! ते ज्यावेळेला जमिनीवर राहत होते, त्यावेळेला निदान त्यांना लपायला झाडे-झुडपे, वृक्ष, बिळ किंवा मोठमोठ्या दगडांसारख्या वस्तू होत्या, पण इथे काय? सगळेच मोकळे! उंदरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली होती.
पुन्हा एकदा उंदरांची बैठक बसली. सगळ्याच उंदरांनी आपल्या माना खाली घातल्या होत्या. त्यांच्यातला एक प्रौढ उंदीर म्हणाला, “ देवाने जे काही बनवले आहे, ते फारच विचार करून बनवले आहे. आपण आपले दैव बदलायला निघालो होतो. पण शेवटी आपल्या पदरी हालअपेष्टा आणि दु:खच पडले. ”
मूषक म्हणाला, “या खेपेला मात्र मी देवाकडे जाणार नाही. दरवेळेला तुम्ही तुमचे मन बदलता आणि मला पाठवून देता. देव माझ्यावर हसताहेत. त्यांच्याकडे जायला आता मला लाज वाटू लागली आहे. ”
तेवढ्यात सगळ्यांनीच पाहिलं की, देवच खुद्द त्यांच्याकडे येत आहे.ते म्हणाले, “ तुला माझ्याकडे येण्याची गरज नाही, मी स्वत:च तुमच्याकडे आलो आहे. मी सुरुवातीलाचं जाणलं होतं की, तुम्ही पुन्हा आपले पूर्वायुष्य मागणार. पण म्हटलं, मी जे जीवन दिलं आहे, ते किती सुरक्षित आणि लाभाचे आहे , याची जाणीव तुम्हाला व्हावी, म्हणून तुमच्या म्हणण्यप्रमाणे होऊ दिले. म्हणतात ना, जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे! आता तुम्हाला तुमची चूक उमगली आहे. जा, आता खूश राहा. तुम्हाला तुमचे पुर्वायुष्य पुन्हा बहाल करतो आहे. ”
देव अंतर्धान पावताच सगळे उंदीर आपल्या पुर्वायुष्याच्या रुपात परत आले. पण आता त्यांना आपल्या या रुपाचा तिटकारा नव्हे तर अभिमान वाटत होता.
राहिला प्रश्न मांजरांचा! त्यांच्यापासून स्वत: ची सुटका करून घेण्यासाठी व त्यावर उपाय शोधण्यासाठी पुन्हा एकदा बैठक घेण्याचे ठरले.

No comments:
Post a Comment