मही,पृथ्वी,वसुधा,देवी, धरा, वसुंधरा, धरणी, अवनी, भूमी, क्षमा,क्षीति अशी किती तरी नावं आहेत आपल्या पृथ्वीची! संस्कृत, मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये या वसुंधरेला तब्बल 32 हून अधिक नावं आहेत. तिच्या प्रत्येक नावांमध्ये तिच्या विशिष्ट विशेषता दडल्या आहेत. आपल्या सूर्यमालेतला एकमेव असा गृह आहे, ज्यावर जीवन विद्यमान आहे.त्यामुळे या गृहाला जिवंत गृह (लिविंग प्लॅनेट) देखील म्हणतात. या प्राणवंत गृहाचे इको सिस्टीम म्हणजे इथले सगळे जीव-जंतू आणि झाडं -वेली इथे उगवतात, जन्माला येतात. वाढतात आणि जिवंत राहू शकतात. ही पृथ्वी आपल्याला जन्म देते, सांभाळते,पोसते. इतकेच नव्हे तर शारिरीक आणि मानसिक विकासाबरोबरच आपल्याला आध्यात्मिक उत्कर्षाची भाव-भूमीदेखील प्रदान करते. आपल्या सभ्यतेची, आपल्या संस्कृतीची आधारवडदेखील हीच आहे. आपल्या ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञानाच्या विकासाचा पायादेखील हीच आहे. आपली निरंतर वाढणारी लोकसंख्येलादेखील आधार देण्याचं काम हीच देते. विशेष म्हणजे आपल्या वाईट-साईट कृत्यांचा भारदेखील हीच सोसते. अशा मंगलमय पृथ्वीला आपल्या भारतीय ऋषींनी माता म्हणून सन्मान दिला आहे. हिच्या सगळ्या रुपांची स्तुती, प्रार्थना या आदरणीय मंडळींनी केली आहे.
वसुंधरा दिवस मानण्याची गरज
संयुक्त राष्ट्र संघाने 1970 मध्ये पहिल्यांदा वसुंधरा दिवस जाहीर केला. मात्र प्रारंभी 20 मार्च रोजी हा दिवस मानण्यत आला. कारण या दिवशी दिवस रात्र समान असतात. पण नंतर 22 एप्रिल दिवस निवडला गेला. शेवटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की, वसुंधरा दिवस साजरा करण्याचे कारण काय? वास्तविक या भूमीवर किंवा पृथ्वीवर मानवाचं अस्तित्व जवळजवळ 10 लाख वर्षांपासून आहे. मात्र आपण आपल्या हुशारीमुळे, तंत्रज्ञानामुळे केवळ 4-5 हजार वर्षांपूर्वीचा अभ्यास करू शकलो आहे. पण या कालावधीत मानवाने जैवमंडळाच्या वातावरणात अनेक प्रतिकूल गोष्टी केल्या आहेत. अर्थात मानवाने स्वत:च्या प्रगतीसाठी या गोष्टी केल्या, मात्र त्याची सजा मात्र वसुंधरेला भोगावी लागत आहे. आपल्याला आवश्यक असणार्या जल, वायू, मृदा या सगळ्यांना आपण प्रदूषित करून टाकले आहे. त्यामुळे जगभरातल्या लोकांमध्ये जागृती पोहचवण्यासाठी वसुंधरा वाचवा अर्थात सेव अर्थ ची घोषणा द्यावी लागली. भारतातले बरेचशी माणसं, संस्था संयुक्त राष्ट्र संघाच्या या हेल्प, सेव, प्रोटेक्ट अर्थ घोषणेनुसार काम करताना दिसतात. 2014 ची थीम आहे- झाडं लावा,आपलं घर स्वच्छ ठेवा, जलवायू परिवर्तन समजून घ्या आणि भविष्यात पृथ्वी वाचेल, अशा तंत्रज्ञानाचा शोध घ्या, विचार करा. केरकचरा कसा नष्ट करता ये ईल, असे तंत्रज्ञान विकसित होण्याच्या दृष्टीने पावले उचला. जेणेकरून पृथ्वीचे संरक्षण होईल.
मगच सुरक्षित राहील वसुंधरा
आता विचार करण्याजोगाप्रश्न म्हणजे केवळ एक दिवस वसुंधरा दिवस साजरा करून किंवा सप्ताह साजरा करून आपण काय विशेष मिळवणार आहोत? केवळ ङ्क झाडे लावा, झाडे जगवा. एक मूल एक झाड.हिरवीगार भूमी, ग्रीन धरतीङ्ख अशा घोषणा देऊन काय उपयोग होणार आहे? आपल्या फक्त एक दिवस नव्हे तर दररोज, वर्षभर वसुंधरा दिवस साजरा करावा लागणार आहे.प्रत्येक दिवस पृथ्वी दिवस असावा, हेच सांगून, हेच ऐकून आणि याचसाठी जागरूक राहून काम करावम लागणार आहे. पृथ्वी वाचवा, असं म्हणण्याचं हे आधुनिक रुप असलं तरी आपल्या ऋषीमंडळींनी, संतमंतांनी आपल्या दूरदृष्टीने अगोदरच याबाबत लिहून ठेवलं आहे. त्यांना याचा धोका कळला होता.
पृथ्वीवरील जीव-जंतू, झाडं-लता,वेली एकमेकाला पूरक आहेत. झाडं-वेली जसं आपल्याला जगवतात, तसं आपणदेखील त्यांना जगवलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर म्हणतात- जो खांडावया घावो घाली। कां लावणी जयानें केली। दोघां एकचि सावली। वृक्ष दे जैसा॥तर संत एकनाथ म्हणतात- अतिथी आलिया वृक्षापासी। पत्र पुष फळ मूळ छायेसी। त्वचा काष्टासी देतसे॥तैसा वृक्ष समूळ सगळा। आर्थिया लागी सार्थक झाला॥
जे वृक्ष लावतात, त्यांच्यावर कायमस्वरुपी निसर्गाचे छत्र लाभते असा संदेश देणारे संत एकनाथ जे वृक्ष लाविती सर्वकाळ। तयावरी छत्राचे झल्लाळ ॥असे म्हणतात.संत तुकाराम वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें। म्हणतात.इतकेच नव्हे तर संत रामदासांनी नाना वल्लीमध्ये जीवन। नाना फळीं-फुलीं जीवन॥ म्हटले आहे.
आपण मात्र पार उलटे वागत आहोत. पाश्चात उपभोगक्तावादाच्या दलदलीत सापडून आपण आपल्या कर्तव्यापासून दूर जात आपण आपल्या धरती मातेला विसरून गेलो आहोत. प्रसिद्ध हिंदी कवी रमेश रंजक यांच्या धरती का गीत कवितेतल्या काही ओळी अशा आहेत- हे म्हारी धरती परी है बीमार/ दवाई-दारू कौन करें/ जो आवै/ सो रोग बतावै/ करै न कछू निदान।
खरोखरच आपली धरती रोगग्रस्त बनली आहे. तिच्या रोगाचे निदान करण्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्याला जर स्वत:चा जीव वाचवायचा असेल तर पहिल्यांदा आपल्या धरतीचा जीव वाचवला पाहिजे. कारण जसं धर्म रक्षति रक्षित:। धर्माची रक्षण केले तर तो आपली रक्षा करेल, तसं पृथ्वीचे रक्षण केले तरच ती आपलं रक्षण करेल.
वैदिक संस्कृतीपासून घ्या प्रेरणा
पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला प्राचीन उदात्त परंपरांचा, ग्रंथांचा आधार घ्यावा लागेल. यातूनच आपल्याला सतत जागृतीचा मंत्र मिळतो. आठवा तो आवतार युग- ज्यावेळेला धरती दानवांच्या त्रासाला-जाचाला कंटाळून गो-रुप धारण करून मला वाचवा अशी आर्त विनंती करणारं पत्र ब्रम्ह लोकांत पाठवते.तेव्हा ब्रम्हदेव विष्णूदेवाला कधी राम रुपात तर कधी कृष्ण रुपात धरतीवर पाठवतो. आजच्या युगातली आव्हानं तर विचित्रच आहेत. आज प्रदुषणाच्या महाराक्षसाने आपल्या आक्टोपसीय क्षृंखलेने धरतीला पार जखडून ठेवलं आहे. ती सुटकेसाठी धडपडते आहे. पर्यावरणाचे संरक्षण करून आवताराने अरण्य संस्क्रती वाचवली. कालिया नागाला मारून जलप्रदूषणापासून दूर केलं. गोसंस्कृतीचे रक्षण केलं. तसे भगिरथ प्रयत्न आज कोठे दिसून येत नाही. आज गरज आहे ती, प्रत्येक माणसाच्या मनात अंगी रामावतार, कृष्णावतार प्रकट होण्याची. तरच वसुंधरा प्रदूषणमुक्त होईल. राम आणि कृष्ण की ज्यांची प्रेरणा म्हणजे वैदिक ज्ञान होतं. त्यातून त्यांना धरतीच्या कल्याणाच्या जागृतीचा मूलमंत्र मिळत होता. आपण ज्या मंत्रा-मंत्रांमध्ये आध्यात्मिक्तेबरोबरच आपल्या वसुंधरेला वाचवण्याचे संकेत सूत्र प्राप्त होतात, त्या वेदमंत्रांकडे परतायला हवं. ही सूत्रं आजदेखील तितकीच प्रासंगिक आहेत, जितकी त्यावेळी होती. त्यांची सार्वभौमिकता हीच त्यांची विशेषता आहे. आणि त्या मंत्रांचे अभिप्राय आपल्या दैंनदिन जीवनातल्या अगदी बारीक-सारीक प्रक्रियांमध्ये , छोट्या-छोट्या कार्यांमध्ये व्यक्त हो ऊन आपल्या जीवनात अशाप्रकारे सामावले आहेत की, त्यांना विसरणं कठीण हो ऊन जातं. आजही कही माणसं अशी आहेत की, आपल्या जीवनाचा आधार असलेल्या क्षमाशील वसुंधरेची धरतीवरती पाय ठेवण्या अगोदर क्षमा मागतात. समुद्र वसने देवि। पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नि। नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्वमे।
मनुष्य स्वत: इतका नम्र हो ऊन धरतीवर पाय ठेवण्यासाठीदेखील तिची क्षमा मागतो. जगातल्या कुठल्याच संस्कृतीत अशी संवेदनशीलता सापडणार नाही. हीच संवेदनशीलता आपल्याला वैदिक काळापासून धरती किंवा तिजवरील विद्यमान कोणत्याही तत्त्व, वृक्ष, जल, वनस्पती आदींची हिंसा करण्यापासून परावृत्त करते. कोणत्या ना कोणत्या रुपात आजदेखील पृथ्वीप्रती सन्मान , आदरभाव, तिला देवी मानण्याची भावना जागृत आहे. म्हणूनच प्रत्येक घराच्या, दुकानाच्या किंवा अन्य कुठल्या प्रतिष्ठानचा पाया खोदताना भूमिपुजनाची उदात्त परंपरा आजही सांभाळली जाते.
वसुधैव कुटुंबकम
अथर्वेदाचं पृथ्वी सूक्त तर एकप्रकारे पर्यावरण संरक्षण किंवा पृथ्वी वाचवा मोहिमेचा दस्तावेजच आहे.याच्या 63 मंत्रांमधे जे स्तवन आहे,ते विलक्षण म्हणावे लागेल. यातले आणखी एक वर्णित तथ्य भूशास्त्रज्ञांच्या संशोधनाशी मेळ खातं, तर दुसर्या बाजूला या प्राणवंत भूमातेची अनंत अनंत अशा विशेषता अधोरेखित केल्या आहेत. संपूर्ण भौगोलिक, राजनैतिक, आणि राष्ट्रीय सीमांपलिकडे आणि पर्वत, समुद्र, वनप्रदेश आणि काळमर्यादा यापलिकडेही भूमीची वंदना, प्रेमपूर्ण स्तुती आणि तिच्या सतत रक्षणाच्या मौलिक सूत्रांचे विधान करणं हेच या संपूर्ण सुक्ताचं विशेष आहे. वास्तविक वैदिक संस्कृतीच्या दृष्टीने संपूर्ण पृथ्वी एक आहे. त्यावर निवास करणारा संपूर्ण प्राणी एक आहे. त्यातलेच आपण मनुष्य लोक सर्वश्रेष्ठ आणि विवेकशील प्राणी आहोत. त्यामुळे या धरेच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर येते. याचाच अर्थ असा की, या पृथ्वीतलावरील अन्य प्राणी, जीव-जंतू आणि झाडं-वेली यांनादेखील इथे राहण्याचा अधिकार आहे. आमचा लोभ, आमचा मूड, आमचा अविवेक अनेक जाती-प्रजाती लुप्त करत आहे. म्हणजेच आपल्या धरतीचे सर्वांग सौंदर्य आपण नष्ट करत चाललो आहोत. या धरतीचे सौंदर्य पुन्हा खुलवण्याची जबाबदारी आपली आहे. हे केव्हा करू तर आपण वैदिक ऋषी अथर्वा यांच्या सुरात सूर मिसळू पाहू तेव्हा!
माता भूमि: पुत्रो अहं पृथिव्या: अर्थात माता भूमी आहे, आणि मी तिचा पुत्र आहे. एक अनुभूत सत्य असे की, आईचे आपल्या मुलाशी एक अतूट नाते असते. परंतु, अथर्ववेदाचा ऋषी राष्ट्रीय प्रेमापुरता मर्यादित राहत नाही. तो वसुधैव कुटुंबकम च्या सिद्धांताला मान्यता देतो. पुत्राची जबाबदारी आपल्या धरतीला कोणताच त्रास होता कामा नये, यासाठी प्रयत्नशील राहणे. पण आज आपण कुपुत्राच्या श्रेणीत जाऊन पोहोचलो आहोत. तिचा विध्वंस करायला टपलो आहोत. तिला कुरुप करतो आहोत. स्नेह-भाव हो ऊन आणि संवेदनशीलता कायम ठेवूनच पृथ्वीला वाचवू शकू. छर्यावरणाची कोठली समस्या असो किंवा जैवमंडल असंतुलन कारण असो सगळ्या मुळाशी मनुष्याच्या मनातल्या इच्छा, त्याच्या आकांक्षा, त्याचा लोभ, त्याचा मोह आहे.
तरच सुरक्षित राहील पृथ्वी
आधुनिक काळात प्राचीन परंपरांच्या उदात्त रुपांची स्वीकृती करताना आम्हाला आधुनिक संशोधनाच्या निष्कर्षांच्या आधारावर पृथ्वीवर व्यापलेले सर्वप्रकारचे प्रदूषण दूर करण्याचा संकल्प सोडला पाहिजे. कचर्याचा निपटारा ही आजच्या युगातली सर्वात मोठी समस्या आहे. त्यातल्या त्यात ई-कचरा मोठा धोकादायक आहे. आपल्या गरजेसाठी आपण वनाच्या चादरीचे तुकडे करतो आहोत. वृक्षारोपणाला धर्माचे अंग मानत चाललो तरच हिरव्यागार पृथ्वीचे स्वप्न साकार होईल. ऊर्जेचे नवे-नवे पर्याय शोधावे लागतील. तरच अणु ऊर्जेच्या विस्फोटाच्या दुष्परिणामापासून आपण वाचू शकू. वास्तूकला असेल किंवा नगर रचना विधी यांमध्ये पर्यावरण मित्र (इकोफ्रेंडली)तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला हवा.तरच आपण येणार्या पिढीच्या हातात सुरक्षित रुपात वसुंधरा सोपवू शकू.

No comments:
Post a Comment