सिमेंटच्या जंगलात खेळाची मैदाने नष्ट हो ऊ लागली, तशी मुलांची मैदानी खेळ खेळण्याची इच्छाही संपली. त्याची जागा साहजिकच टीव्हीवरच्या कार्टूनने घेतली. टीव्हीवरल्या शिनचॅन, डोरेमॉन, कितरेत्सु, बेनटेन,निंजा हाट्टोरी या त्यांच्या कार्टून मित्रांनी त्यांचे बालविश्व व्यापून टाकले आहे. मैदानी खेळ, बैठे खेळ यांना तोबा करत मुले टीव्हीसमोर चिकटलेली असतात. चांदोबा, किशोर, छावा किंवा कॉमिक्ससारखी मुलांची पुस्तके आता क्वचित घरांमध्येच दिसतात. मुले शाळेतल्या अभ्यासालाच कंटाळा करतात, तेव्हा या पुस्तकांमधल्या साहसी, परी, जादूटोणा याबरोबरच संस्कार कथादेखील वाचायचा कंटाळा करतात. संस्कार देणारी, बुद्धीला चालना देणारी पुस्तके, खेळ घराघरांमध्ये नसली तरी टीव्ही आणि त्यांवरचे कार्टून वाहिन्या मात्र सतत चालू असतात. कार्टूनच्या प्रेमात बच्चेकंपनी तहान-भूक हरवून बसतात, असे चित्र घराघरांमध्ये पाहायला मिळते. ग्रामीण भागात तर त्यांच्याशिवाय निर्वाहच नाही, अशी परिस्थिती आहे.
अलिकडच्या काही वर्षांत टीव्ही वाहिन्यांनी मुलांसाठी अनेक चॅनेल्स सुरू केली आहेत. हंगामा, पोगो, निक, डिस्ने, कार्टून नेटवर्क या वाहिन्यांनी आपली अनेक किड्स चेनेल सुरू केली आहेत. त्यात आता डिसकव्हरी किड्सचीदेखील भर पडली आहे. यातल्या शिनचॅन, डोरेमॉन, कितरेत्सुसारख्या करामती बच्चे कंपनींचे आकर्षण मुलांमध्ये वाढले आहे. मि. बीन,टॉम अँड जेरी, बेनटेन,किमोन ऍचे, मोटू-पतलू अशीही काही कार्टून व्यक्तिमत्त्वे मुलांच्या पसंदीची आहेत. त्यांच्या करामती पाहण्यात तासन तास मुले दंग असतात. यात छोटा भीम, हनुमान, माय फ्रेंड गणेशा आदी इंडियन कार्टून्सनीही मुलांच्या मनात जागा मिळवली आहे. साहजिकच कुठल्याही घरात जा, कुठले ना कुठले कार्टून चॅनेल लावून मुले पाहत असलेली दिसतील, इतके त्याचे प्रचंद वेड मुलांना लागले आहे.
डोनाल्ड डक पासून कार्टून जगताची सुरुवात झाली. त्याच्या नंतर मिकी माऊसचा काळ आला. त्यात काही भारतीय कार्टूननेही मोठी धमाल केली. त्यानंतर सुपरमॅन, स्पायडरमॅन,बॅटमॅन, आयर्नमॅन, हल्क यासारख्या सुपर हिरोंनी धुमाकूळ घातला. यातल्या काही हिरोंचे चित्रपटदेखील निघाले. आणि त्यांना प्रतिसादही मिळाला. त्यांच्या सिरीज लोकांसह बच्चेकंपनींनादेखील पसंद पडल्या. मुलांचे सुपर हिरोंविषयींचे आकर्षण लक्षात घेऊन भारतात क्रिश, रोबोट, रा-वन चित्रपटांची निर्मिती झाली. मुलांना सुपरहिरो पसम्द असल्याने या देशी सुपरहिरोंना मुलांनी डोक्यावर घेतले. भारतात मुलांसाठी चित्रपट कमी प्रमाणात निर्माण होत असले तरी त्यांचे आकर्षण कमी झालेले नाही. ते आपली भूक परदेशी चित्रपटांवरून, मालिकांमधल्या पात्रांवरून भागवून घेतात.
कार्टूनच्या विश्वात रमणार्या 10 ते 12 वर्षांच्या मुलांबरोबरच मोठ्यांनाही रुची आहे. त्यामुळे काही वेळा कंपल्शन म्हनून तर काही वेळा टाईमपास म्हणून अनेक मोठेही कार्टूनच्या प्रेमात पडले आहेत. त्यात युवतींचे प्रमाणदेखील अधिक आहे. केवळ कार्टून मालिका बच्चे कंपनीला भुरळ घालत नाही तर महाविद्यालयीन मुलेही त्याच्या प्रेमात पडली आहेत. याशिवाय मुलांची दृष्टी आपल्याच चॅनेलवर खिळवून ठेवण्यासाठी वाहिन्या रा-वन, माय फ्रेंड गणेशा, हनुमान, क्रिश सारखे चित्रपट सतत दाखवत असतात. आणि मुले ती वारंवार पाहात असतात. त्यांना त्याचा कंटाळा येत नाही. काही मुलांना शाळेतील कविता पाठ नाही, पाढे पाठ नाहीत पण कार्टूनमधले संवाद पाठ आहेत. इतका इम्पॅक्ट मुलांवर झाला आहे.
साधारणत: दहा-पंधरा वर्षांपूर्वी चाचा चौधरी, विक्रम वेताळ, पंचतंत्र यांच्या कॉमिक्सचा जमाना होता. मुलं ती आवडीने वाचायची. पुढे त्याच पात्रांना मोठ्या-छोट्या पडद्यांवर जिवंत करण्यात आले. मध्यंतरीच्या काळात दूरदर्शनवरच्या शक्तीमाननेदेखील मुलांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. त्याचे अनुकरण करून काही मुलांनी आपला जीवही गमावला होता. त्यामुळे प्रत्येक मालिकेच्या शेवटी शक्तीमानची भूमिका साकारणार्याला आपले अनुकरण न करण्याविषयी सांगावे लागायचे. टीव्हीवर कार्टूनचे प्रस्थ वाढू लागले तसे कॉमिक्स पुस्तकांच्या मागणीला अधोगती येऊ लागली. वाचन कमी झाले. वाचनाबरोबरच खेळण्याऐवजी आणि मित्रांमध्ये रमण्याऐवजी मुले तासनतास कार्टून पाहण्यात वेळ दवडू लागली. सुरुवातीला पालकांनाही मुलगा बाहेर जाऊन भांडण-हाणामारी करण्यापेक्षा घरात बसतोय, याचे कौतुक वाटू लागले. मुले मात्र कार्टूनमध्ये चांगलीच रमली. टीव्हीवरचा हिरो जसा करतो, तसे करण्याचा प्रयत्न झालाच शिवाय त्याच्या वागण्या-बोलण्याच्या नकलाही हो ऊ लागल्या. याच्याने मुले टीव्हीसमोरून हटेनात. टीव्हीसमोर बसूनच खाणं-पिणं हो ऊ लागलं. मग मात्र स्थूलपणा, शारीरिक व्याधी, उत्साहाचा अभाव, आळशीपणा मुलांमध्ये वाढायला लागला तसा पालकांना अक्कल यायला लागली. खेळाला, मितांमध्ये रमण्यात किती मज्जा आहे, भावनिक, बौद्धिक आणि शारीरिक विकास कशात आहे, याची कल्पना त्यांना आली होती. परंतु, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. कार्टूनने मुलांवर कब्जा केलेला होता. आता तो सुटणेही अशक्य आहे. आज पालक नाना तर्हा करून पाहत आहेत, पण त्यांच्या या प्रयत्नांवर पाणी पडत आहे. आता तर पालकांना मुलांकदे लक्ष द्यायलादेखील फुरसत नाही, असा हा प्रवाह चालूच राहिला आहे. वहिन्यांनी मुलांना टीव्हीसमोर खिळवून ठेवण्याची सारी व्यवस्था केली आहे. त्यातून मुले सुटू शकत नाहीत, अशी अवस्था आहे.
प्रारंभी कार्टून नेटवर्कवर विसंबून असणार्या बच्चेकंपनीला आता हंगामा, पोगो, निक, डिस्ने,डिसकव्हरी किड्स या चॅनेल्सवरील कार्टूनचा पर्याय उपलब्ध झाला आहे. कार्टूनसाठी जॅपनीज, चायनीज कार्टून कार्यक्रमांचा रतीब घातला जात आहे. त्याचबरोबर या परदेशी कार्टूनसोबत आता देशी कार्टूनही धमाल उडवताना दिसतात. छोटा भीम, हनुमान, घटोत्कचसारख्या कार्टून मालिका देशी रंगत आणत आहेत आनि त्याचा स्वाद बच्चे कंपनी मनमुराद घेत आहे. मात्र पालकांची गोची झाली आहे. त्यांना कार्टूनपासून मुलांची सुटकाही करू द्यायची नाही, आणि अभ्यास तर झाला पाहिजे. पण या दोन्ही गोष्टीत समन्वय साधण्यात काही पालकांना यश आले असले तरी बहुतांश पालकांना त्यात अपयशच आले आहे. कारण कार्टून मोठ्यांच्याही आकर्षणाचा भाग झाला आहे. -

No comments:
Post a Comment