(विदेशी कथा: स्लोवाक)
पहाटेचा
जोराचा गार वारा सुटला होता.छपाराखाली शेळीची तीन पिल्लं आपसात बोलत होती."किती मस्त ना, आपले छोटे मालक उशिरापर्यंत झोपालेत ते. नाही तर असल्या गारव्यात आपल्याला
चरायला घेऊन गेले असते." त्यांची नावं होती-व्रादा,कपुस्ता
आणि यामा.
थोड्या
वेळानं ऊन्हं पडली. सूर्याने गवताळ रानाकडं, शेताकडं आणि बागेच्या
चोहोबाजूला पाहिलं.पण शेळीचं पिल्लं त्याला कुठंच दृष्टीस पडली नाहीत.
" शेळीच्या हुशार कोकरानों,कुठं आहात तुम्ही? मी तुम्हाला कुठं कुठं पाहिलं नाही? तुम्ही कुठंच
दिसत नाहीए...?"सूर्याने आवाज दिला.
हळूहळू
दुपार झाली. छोटे मालक न आल्याने शेळीची पिल्लं दु:खी-कष्टी झाली. आपापसात बोलू
लागली." आज आपले मालक का आले नाहीत? खरं ते इतका उशीर झोपतच नाहीत.कदाचित आज त्यांचे डोळे उघडले नसतील. आम्हाला विसरले तर नसतील? का आजारी-बिजारी पडले?"
गप्पा
मारता मारता त्यांना झोप यायला लागली. पण काही घडलं नाही. संध्याकाळपर्यंत कोणीच
आलं नाही. मग एका अनोळख्या माणसानं दार उघडलं. त्यानं ना त्यांच्याशी संवाद साधला, ना
त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्याशी तो खेळलादेखील नाही. थोड्या वेळानं
तो निघून गेला. मोका साधून तिघांनीही तेथून पळ काढला.पळता-पळता ते फार दूर आले.अंधार पडायला लागला होता. अचानक एका चिमणीनं त्यांना थांबवलं."तुम्ही तिघं
कुठं पळून चालला आहात?काय भानगड आहे,घरी
का जात नाही आहात...?"
शेळीची
पिल्लं म्हणाली,"
आम्हाला तर घरीच जायचं आहे, पण आमचे छोटे मालक
अचानक कुठे निघून गेले आहेत.ते आमच्यावर खूप प्रेम करतात. वाईट मालक आम्हाला नको आहे. आता तूच सांग,
आम्ही काय करावं, कुठं जावं?"
चिमणी
म्हणाली,"काल संध्याकाळी त्यांच्या आईसोबत जाताना मी पाहिलं आहे.ते रडत होते.त्यांना जायचं नव्हतं. त्यांच्या बोलण्यावरून ते कदाचित अमेरिकेला गेले असावेत.त्यांचे बाबा अमेरिकेत राहतात."
शेळीची
पिल्लं घाबरली.ती सकाळ होण्याची प्रतीक्षा करू लागली. सकाळ उजेडताच त्यांना एक कोंबडी भेटली.त्यांनी तिला अमेरिकेचा रस्ता विचारला. त्यावर कोंबडी म्हणाली," हीच अमेरिका आहे."
" आमचे छोटे मालक कुठे आहेत?"तिघांनी विचारलं.
"हे तर माहीत नाही."कोंबडी उत्तरली
" तुम्हाला माहीत नाही, म्हणजे ही अमेरिका नाही."
असे म्हणत कोंबडीची पिल्लं पुढच्या गावाच्या दिशेनं निघाली.
इथे
त्यांना एक मांजर भेटले. शेळीच्या पिल्लांनी त्याला अमेरिकेविषयी विचारले. पण मांजराला
त्या गावाचं नावदेखील माहित नव्हतं.मग तो अमेरिकेविषयी काय सांगणार. तेवढ्यात त्यांना वाटेत एक पोपट भेटला.त्यांनी त्याला तोच प्रश्न केला.
पोपट
म्हणाला,"मला अमेरिकेविषयी काही माहित नाही. पण अमेरिकेविषयी जाणून घ्यायचं असेल तर
तुम्हाला शाळेत जावं लागेल. तिथं सगळं काही शिकवलं जातं."
शाळेचे
नाव ऐकून त्यांना जरादेखील आश्चर्य वाटलं नाही. भीतीसुद्धा वाटली नाही.त्यांचे छोटे मालक रोज शाळेला जायचे. ते नेहमी त्यांच्या शाळेवरून परतण्याची वाट पाहायचे.मग ते चौघे खेळायचे.धमाल करायचे. तिघेही मोठ्या आनंदानं शाळेच्या दिशेने निघाले.वाटेत त्यांनी विचार केला,कदाचित आपल्याला गणवेश नाही
म्हणून शाळेत प्रवेश दिला जाणार नाही.त्यांना एका घराच्या बाहेर खूप सारी कापडे टांगलेली दिसली.
शेळीच्या
पिल्लांनी घरमालकाला विचारलं," आम्हाला शिकायचं आहे.शाळेत जायचं आहे.पण आमच्याकडे कपडे नाहीत. आम्हाला यातले काही कपडे द्याल का?"
" तुम्हाला कुठली छान वाटतील, ती बिनधास्त घेऊन
जा." घरमालक म्हणाला.शेळीच्या पिल्लांना पँट, शर्ट आणि टाय घातल्यावर फार आनंद झाला.मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन ते वर्गात विद्यार्थ्यांसोबत बसले. त्यांना खूप भारी वाटलं.अमेरिका खूप लांब आहे, हे त्यांना कळून चुकलं. तिथे पोहचायला
पहिल्यांदा रेल्वे पकडावी लागेल.मग जहाज. त्यांना अख्खा आठवडा जहाजात काढावा लागणार होता. कारण समुद्र पार
करावा लागणार होता.
तिघेही
रेल्वे स्टेशनवर पोहचले.तिथे त्यांना बहुतांश प्रवाशी पिशव्या, सुटकेस घेऊन
फिरताना दिसत होते.त्यांना वाटलं, आपल्यादेखील पिशव्या, सुटकेसशिवाय
रेल्वे प्रवास करायला दिला जाणार नाही.त्यांनी मग खूप विचार केला आणि कोणा माळ्याकडे काम करायचं ठरवलं.
योगायोगानं
त्यांना एका माळ्याकडे नोकरी मिळाली. तिघे मिळून रोपांची, झाडांची
निगा राखू लागले. त्यांना खत-पाणी घालू लागले.नवीन रोपं लावायसाठी खड्डे खोदू लागले. त्यांच्या कामावर माळी जाम खूश झाला.त्याने त्यांना चांगला पगार दिला.त्यांनी त्यातून सुटकेस आणि पिशव्या विकत घेतल्या. आता
ते सहज अमेरिकेला जाऊ शकत होते.
शेळीच्या
पिल्लांना पहिल्या श्रेणीच्या डब्यात माणसं कमी असल्याचे दिसले.ते लगेच धावत धावत गेले आणि पहिल्या श्रेणीच्या डब्यात चढले. म्हणाले,"
माणसं तर किती विचित्र! कुणास ठाऊक,इतक्या
आरामशीर आणि मऊमऊ सिटांवर का बसले नाहीत?"
आपलं
सामान त्यांनी एका बाजूला ठेवून दिलं. आरामात हसत हसत सिटांवर बसले. मग आपल्या
छोट्या मालकांच्या गोष्टी करण्यात तिघे व्यस्त झाले.
अचानक
टीसीने दरवाजा उघडला. "कृपया, आपापली तिकिटे दाखवा."टीसी
म्हणाला.
त्यांनी
आपल्या सुटकेस खोलून दाखवल्या.पण त्यात कोबी, गाजर आणि अन्य काही साहित्य होतं.
तिकिटं नव्हती. टीसीने त्यांना पुढच्या स्टेशनवर उतरवलं.
" आता आपण कधीच आपल्या छोट्या मलकांना भेटू शकणार नाही."यामा आणि
कपुस्ता रडत रडतच म्हणाले.
"तुम्ही काळजी करू नका. ती रेल्वे चांगली नव्हती. आपण आपल्या छोट्या
मालकांना नक्की भेटू. आपण दुसर्या गाडीने जाऊ."व्रादा त्यांना समजावत
म्हणाला. ते स्टेशनवरच इकडे-तिकडे फिरू लागले.तेवढ्यात त्यांना एक रेल्वे दिसली. त्यात कुणीच नव्हतं.डब्यात कोळसा, लाकडे आणि वाळू भरलेली होती. त्यांना खूप
आनंद झाला."हीच आपली रेल्वेगाडी. आपण यातून प्रवास करायचा." तिघेही
उड्या मारून डब्यात जाऊन बसले.
"बाबानों, आता आपण सगळे झोपून टाकू या." व्रादा
म्हणाला. रेल्वे तेवढ्यात एका बोगद्यातून निघाली.अंधारामुळे त्यांना लगेच झोप लागली.सकाळी समुद्राजवळ पोहचल्यावर त्यांना जाग आली.
समुद्रात
खूप मोठमोठी जहाजं उभी होती. ती जहाजं पाहून तिघंही चकीत झाली.त्याचवेळी एका वृद्ध नाविकांनं येऊन विचारलं,"तुम्ही कोण
आहात? कोठून आलात आणि इथं काय करता आहात?"
"आम्हीदेखील नाविक आहोत. आम्ही या अगोदरही
जहाजावर काम केलं आहे." यामा आणि व्रादा म्हणाले.
"असं का, मग चला. आमच्या कॅप्टनला भेटा."वृद्ध
नाविक म्हणाला.
"तुम्हाला काय काय कामं करता येतात?" कॅप्टनने
भेटल्यावर विचारलं.
" मला स्वयंपाक करता येतो.मस्त असं शॅलेड बनवता येतं." कपुस्ता म्हणाला. त्याला लगेच किचनमध्ये
पाठवलं गेलं.यामाने वर्तमानपत्रे वाटण्याचं काम घेतलं. आणि व्रादाने केस कापण्याचे!
दुसर्या
दिवशी सगळे प्रवाशी जहाजावर आले.यामा,
व्रादा आणि कपुस्ता आपापली कामं सावधपणे करू लागले.सगळेच प्रवाशी त्यांच्या कामावर जाम खुश होते. ते गाऊन,नाचून
आणि वाद्ये वाजवून सगळ्यांची करमणूकही करत होते.
एकदा
व्रादाने पीटर नावाच्या प्रवाशाची दाढी केली.पीटर म्हणाला," तुला खूप छान शेव करता येतं. माझ्या
डाव्या बाजूची मिशी जरा बारीक कर. ही उजव्या मिशीपेक्षा मोठी दिसतेय."
व्रादाही
प्रशंसा ऐकून खूश झाला.मिशी बारीक करण्यासाठी त्याने कात्री हातात घेतली. कात्री मिशीला लावली आणि...
तेवढ्यात जहाज समुद्राच्या लाटांनी हिंदोळ्या खाऊ लागले. मिशी सगळीच कापली गेली.
ज्यावेळेला पीटरने आपला चेहरा आरशात पाहिला तेव्हा त्याला राग अनावर झाला. पण नंतर
हसूही फुटल. व्रादाने त्याची क्षमा मागितली.
जहाज
अमेरिकेत पोहचताच,
तिघांनाही मोठा आनंद झाला. अचानक कपुस्ता म्हणाला,"आपल्याजवळ छोट्या मालकांचा पत्ताच नाही, मग ते
आपल्याला कसे आणि कुठे भेटणार?"
यामा
म्हणाला,"आपण अमेरिकेत पोहोचलोच आहोत.मालकांचा पत्तादेखील लवकरच लागेल."
अंडरग्राऊंड
रेल्वेजवळ पोहचल्यावर यामा म्हणाला,"बंधुनों, आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत. आपले छोटे मालक जमिनीच्या खाली कसे बरं
राहतील? चला परत वर जाऊ." तिघे पुन्हा प्रवाशांच्या
मदतीने सिडीने वर आले.व्रादा म्हणाला, "आपले छोटे मालक आपल्याला शोधून
काढतील"
" कसे काय?" त्यांना आपण अमेरिकेत आल्याचे
माहितदेखील नाही. हे ऐकून व्रादा म्हणाला," जे स्लोवाक
गाणे छोटे मालक गात होते, ते आपण सगळ्या अमेरिकेला ऐकवू या.गाणे ऐकून ते आपल्याला नक्की ओळखतील."
दोन
दिवस ती शेळीची पिल्ले इकडे-तिकडे फिरत राहिली.वाद्ये वाजवत, गाणे गात राहिली. अचानक तिसर्या दिवशी कुणी
तरी येऊन त्यांना जोरात मिठी मारली. आवाज ऐकू आला," बाळानों,
हे गाणे तर माझे आहे. हे तुम्ही कोठून
शिकलात?" शेळीच्या पिलांना विश्वासच बसला नाही की,
त्यांचे छोटे मालक समोर उभे आहेत. एकमेकांना पाहून छोटे मालक आणि
शेळीच्या तिघा पिल्लांच्या डोळ्यांत आनंदाश्रू वाहू लागले. छोट्या मालकाने त्यांना
घरी आणले. त्यांच्या आई-बाबांना भेटून पिल्लांना फार
आनंद झाला. -मच्छिंद्र ऐनापुरे
(मूळ लेखक - योसेफ सिगर हरोसकी)
No comments:
Post a Comment