ग्रीष्म ऋतुतला
सुंदर दिवस होता. पश्चिमी युरोपातल्या बंदरावर एक गरीब मासेमार,ज्याने फाटके कपडे घातलेले होते,आपल्या नावेत झोपला होता.इतक्यात तिथे एक पर्यटक आला.त्याने मासेमाराला असा झोपलेला
पाहून आपल्या कॅमेर्याने त्याचे फोटो टिपू लागला.तो फोटो काढत असताना त्याच्या कॅमेर्याच्या क्लिक...क्लिक अशा होणार्या आवाजाने मासेमार जागा झाला.त्याने पाहिले की,कुणीतरी आपले फोटो काढत आहे.त्याची फिकीर न करता त्याने आपल्या खिशात हात घातला आणि सिगरेट काढून ती आगकाडीने
शिलगावू लागला, तोच पर्यटकाने त्याचा लायटर पेटवून पुढे केला. पर्यटक बोलायला सुरुवात करत म्हणाला, आज मोसम किती छान
आहे.मला वाटतं, आज तुला खूप मासे सापडतील.
पण मी तर आज एका
फेरीतच नेहमीच्या माशांशिवाय चार लॉबस्टर,दोन माइकलाइन पकडून आणले आहेत.हे मासे खूप
महाग आहेत,त्यामुळे मला आता दोन-तीन दिवस
मासे पकडायची आवश्यकता नाही,मासेमार उत्तरला.
तुझ्या खाजगी जीवनात
डोकावण्याचा मला अधिकार नाही,परंतु तरीही मला तुला सल्ला द्यावासा वाटतो. आजच्यासारखं
आणखी एकाद्या दिवशी एका फेरीत तुला
भरपूर महागडे मासे सापडले तर आणखी फेर्या मारत जा.त्यामुळे तुला आणखी पुष्कळ लॉबस्टर,माइकलाइन मासे सापडतील.ते विकून तू वर्षभरातच लाँंच विकत
घेऊ शकशील. आणि मग समुद्रात दूरवर जाऊन याहीपेक्षा कितीतरी पटीने
मासे पकडू शकशील.तू हे मासे दुसर्या शहरांमध्येदेखील
सप्लाय करू शकशील. असे केल्याने तू पुष्कळ पैसा कमावू शकशील.
मग तू एक रेस्टारंट खोलशील.तुझे खूप नोकर असतील.अशा प्रकारे तुझी एक फर्म बनून जाईल. असे म्हणून पर्यटक
बोलायचा थांबला.
मासेमार भाबडेपणाने
म्हणाला, पुढे काय होईल?
पर्यटक म्हणाला,तुझ्याजवळ खूप नोकर असतील,जे तुझे काम करतील. मग तू तुझ्या मोटरबोटमध्ये असाच आरामात
झोपत जा. यावर मासेमार म्हणाला, आताही मी
हेच करत होतो.फक्त तुझ्या कॅमेर्याच्या
क्लिक क्लिक आवाजाने मला जाग आली. मासेमार्याचे बोलणे ऐकून पर्यटकाची मान शरमेने खाली गेली. अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे,जत (मूळ कथा-
हायनिश बोइल)
No comments:
Post a Comment