एका छोट्याशा गावात चाओ येन नावाचा एक लहान मुलगा राहात होता. बालपणापासूनच
तो मोठा समजूतदार आणि गावातल्या सगळ्यांचा आवडता होता. तो ज्या गावात राहत
होता, त्या गावाच्या दक्षिणेला असलेल्या उंच पहाडावरील मंदिरात एक पवित्र
ग्रंथ ठेवण्यात आला होता, ज्यात लोकांचं भविष्य?लिहिलेलं होतं. देवळात
येणा-याला पुजारी ते वाचून दाखवत असे. जेव्हा चाओ येन अठरा वर्षाचा झाला,
तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला मंदिरात नेलं. वडिलांनी पुजा-याला चाओचे
भविष्य वाचून दाखवण्याविषयी विनंती केली. पुजा-याने पहिल्यांदा त्याला
त्याच्या शिक्षणाविषयी सांगितलं, नंतर कामाविषयी सांगितलं, पण पुढे तो
अचानक बोलायचा थांबला. चाओच्या वडिलांचं काळीज इवलसं झालं. त्यांनी
काळजीच्या स्वरात विचारलं, ‘‘काय झालं, असं अचानक का थांबलात?’’
पुजारी दु:खी स्वरात म्हणाला, ‘‘सांगताना मला फार दु:ख होतंय, पण..’’
‘‘काय झालं, महाराज?’’ चाओच्या वडिलांनी काळजीच्या आर्त स्वरात विचारलं.
‘‘या ग्रंथानुसार तुमच्या मुलाचे आयुष्य अवघं एकोणीस वर्षाचं आहे. त्यानंतर त्याचा मृत्यू अटळ आहे.’’
चाओ आणि त्याच्या वडिलांचा त्यावर विश्वासच बसला नाही. वडील पुन: पुन्हा म्हणाले, ‘‘नीट पहा, नक्कीच कुठे तरी चूक झाली असेल.’’
‘‘नाही, कुठेच चूक नाही. यात तर अगदी स्पष्ट दिसतं आहे.’’ पुजारी म्हणाला आणि त्याने ग्रंथ बंद करून ठेवला.
चिंतेत बुडालेले पिता-पुत्र घरी परत आले. त्यांनी मनाला समजावलं, जे काही घडायचं आहे, ते चुकणार नाही. आपण परमेश्वराची प्रार्थना करू. स्वत:चं भविष्य ऐकल्यापासून चाओ उदास राहू लागला, त्याचं मन कशातच रमेना. एकच चिंता त्याला सतावू लागली, ती म्हणजे आपल्या पश्चात आई-वडिलांचं कसं होणार? याच काळजीत असताना एक दिवस चाओ धनुष्य आणि बाणांनी भरलेला भाता घेऊन शिकारीला गेला. चालत चालतच तो उंच डोंगरावर पोहोचला. तो मनाने उदास झाला होता आणि चिंतेने त्याला घेरलं होतं. आपल्या आई-वडिलांचा सांभाळ कोण करणार? या एकाच प्रश्नाने तो अस्वस्थ होता. तो डोंगरावर चढतच राहिला. चढता चढता तो एका उंच छोटय़ा गवताळ प्रदेशात पोहोचला. तिथे चहुबाजूंनी रंगीबेरंगी टवटवीत फुले उमलली होती. तिथे छान ऊन पडलं होतं. थकलेला चाओ तिथल्या एका झाडाखाली बसला आणि त्याला झोप येऊ लागली आणि तो तिथेच झोपला. चाओचे डोळे उघडले, तेव्हा अंधार झाला होता. पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता, त्याचबरोबर कुणाच्या तरी बोलण्याचा आवाजही ऐकू येत होता. तो पटकन उठला आणि आवाजाच्या दिशेने पुढे सरकला. तिथे त्याला दोन माणसं समोरासमोर एका दगडावर बसलेली दिसली.
त्यांच्यात कवड्यांच्या खेळासारखा काहीतरी खेळ सुरू होता. या खेळातच मधे मधे ते कुठले कुठले तरी अंक उच्चारायचे.
चाओ झाडाआड उभा राहिला. तेव्हा दोघांमधला एकटा रुंद कपाळाचा आणि वयस्क माणूस त्याला दिसला, ज्याने हिरव्या रंगाचा गाऊन घातला होता. त्याची चप्पलसुद्धा हिरव्या रंगाची होती, तर त्याच्या समोर बसलेल्या माणसाचे कपडे आकाशी रंगाचे होते. त्यावरील चांदण्यांचे टिपके चकाकत होते. त्याचे केस कुरळे आणि खांद्यापर्यंत लोंबणारे होते. तो अंक उच्चारायचा, तेव्हा वृद्ध डोक्याला हात लावून विचार करत राहायचा. अंक वाढायचे, कमी व्हायचे, मग शेवटी दोघेही एका अंकावर येऊन थांबायचे.
आता चाओला राहवलं नाही. तो तडक त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिला. ते दोघेही अजूनही कुठल्या तरी अंकावर विचार करत होते. इतक्यात आकाशी निळ्या कपडय़ातल्या मनुष्य म्हणाला, ‘‘व्वा, काय नशीब मिळवलंय या माणसानं! फारच छान!’’ ?
इतक्यात त्या दोघांचे लक्ष चाओकडे गेले. ‘‘तू कोण आणि इथे कसा आलास?’’ निळ्या गाऊनवाल्याने विचारले.
चाओ म्हणाला,‘‘मी तर इथेच झोपलो होतो. मला आता जाग आली, तेव्हा तुम्हाला पाहिलं. कृपया, तुम्ही कोण आहात सांगाल का?‘‘
‘‘कोणी नाही, तू जा इथून..’’ ते म्हणाले.
‘‘मला ठाऊक आहे, तुम्ही कोणी सामान्य नाहीत. पण कृपा करून मला सांगा की तुम्ही कोण आहात?’’चाओ आदराने पुढे झुकत म्हणाला.
निळा गाऊनवाला म्हणाला,‘‘आकाशात ती ता-यांची झुंड दिसते का, ज्यांचा आकार अस्वलासारखा आहे?’’
‘‘हो, आजीने दाखवली होती. आजसुद्धा मी ओळखतो.’’ चाओ अगदी उत्साहित होऊन म्हणाला.
‘‘मी त्या ताऱ्यांचा राजा आहे, आणि हे दीर्घायुष्य देणारे देव, समजलं? आता जा घरी.’’
चाओ पटकन खाली बसला आणि त्याने दीर्घायुष्य देणा-या देवाचे पाय धरले, ‘‘मला तुम्हीच हवे होतात, आता तुम्हीच फक्त माझी मदत करू शकता.’’
’’ मदत? कसली मदत?’’ वृद्ध म्हणाला.
भाग्यग्रंथात माझे आयुष्य फक्त एकोणीस वर्षाचे आहे आणि मला एकोणीस वर्षे पूर्ण व्हायला केवळ काही दिवसच बाकी आहेत. मला मरणाची भीती नाही, पण माझ्या पश्चात माझ्या आईवडिलांचे कसे होणार, याचीच मला चिंता सतावत आहे. माझ्या हातून माझ्या वृद्ध आई-वडिलांची सेवा घडू द्या. कृपाकरून मला मदत करा.’’ चाओने अत्यंत कळवळून विनंती केली.
निळा रंगाचा अंगरखा परिधान केलेल्या देवतेने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला,‘‘ हे बघ, नशीब एकदाच लिहिलं जातं. ते पुन्हा बदलता येत नाही. ग्रंथात लिहिलेलं काही पुसता येत नाही. आता जे काही आयुष्य उरलं आहे, ते तू आई-वडिलांच्या सेवेसाठी घालव. जा, घरी जा उशीर करू नकोस.’’
पण चाओ तेथून हलला नाही, तो वृद्ध व्यक्तीचे पाय धरून रडत राहिला.
दोघांनीही एकमेकांकडे पाहिले. त्यांनाही काय करावं सुचत नव्हतं? काही वेळ विचार केल्यावर हिरव्या गाऊनमधला वृद्ध म्हणाला,‘‘आम्ही भाग्यग्रंथात लिहिलेले बदलू शकत नाही, पण अदलाबदली करू शकतो’’असे म्हणून वृद्ध देवता हसली. त्याचबरोबर निळ्या रंगाचा गाऊनवालादेखील हसला.
त्याच्या बोलण्याचा अर्थ न उमजल्याने चाओने आपली मान वर केली. पण तिथे कोणीच नव्हतं. त्याला रडू कोसळलं. आपल्या मदतीला आता कोणीच येणार नाही, याची त्याला खात्री झाली. आपला भाता आणि धनुष्य खांद्यावर घेऊन तो मोठय़ा जड अंत:करणाने डोंगर उतरू लागला.
चाओने या घटनेबद्दल कोणालाही सांगितलं नाही. आता तो दर आठवडय़ाला डोंगरावर जायचा आणि त्या दगडावर मेणबत्ती लावायचा. त्याचा हा नियम तो एक्याण्णव वर्षाचा होईपर्यंत चालत राहिला. शेवटी ती देवता कोणत्या अदलाबदलीविषयी बोलत होती, हे त्याच्या लक्षात आलं. दीर्घायुष्य देणा-या देवाने एकोणीस मधला सुरुवातीचा एक अंक काढून नऊच्या पुढे ठेवला होता. आजदेखील चीनच्या दक्षिण पर्वतावर एक मंदिर आहे, तिथे लोक आपल्याला दीर्घायुष्य लाभावं, यासाठी प्रार्थना करायला नियमित जातात. (चिनी लोककथा) (dainik prahaar.2013)

No comments:
Post a Comment