चित्रपटात काम करायला सुंदर चेहरा असला पाहिजे असे नाही तर त्याला अभिनय महत्त्वाचा आहे, हे अभिनयाचा नायक असलेल्या ओमपुरी यांनी दाखवून दिले होते. अनेक भाषा, सिनेमा-नाटकं अशा अनेक क्षेत्रात मुसाफिरी करणार्या ओमपुरी यांनी चित्रपट सृष्टीत आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर आपली अविस्मरणीय छाप सोडली आहे. सकस व सशक्त अभिनय हे ओम पुरी यांच्या चित्रपट व नाट्य कारकिर्दीचे वैशिट्य ठरले.विशेष म्हणजे हरियाणाच्या अंबाला येथे जन्मलेल्या ओम पुरी यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात महाराष्ट्रातून ’घाशीराम कोतवाल’या मराठी चित्रपटापासून झाली. या पहिल्या चित्रपटापासूनच ते चर्चेत आले. हिंदी सोबतच मराठी, कन्नड, मलयालम, पंजाबी आणि तेलगू चित्रपटांबरोबरच हॉलिवूडपटांमध्येही अभिनय केला. त्यांनी पाकिस्तानी चित्रपटातही भूमिका वठविली. त्यांची दमदार अभिनेता म्हणून ओळख ’आक्रोश’ चित्रपटामुळे निर्माण झाली. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना पहिला ’फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला होता. 1982 मधील ’आरोहण’ या चित्रपटाने ओम पुरी यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 1983 च्या ’अध्यसत्य’या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील एक सर्वोत्कृष्ठ भूमिका ठरली. भूमिकेसाठी त्यांना पुन्हा राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. स्पष्ट बोलणारे आणि कोणत्याही मुद्दयांवर आपली मते बेधडक मांडण्याच्या धाडसी वृत्तीमुळे काही वादही निष्कारण ओढवून घेतले होते. मात्र, चित्रपटात चेहरा नव्हे, अभिनयाकडेच नायकत्व येत असतं, हे दाखवून देणारा कलावंत होता.
Saturday, January 7, 2017
अभिनयाचा नायक

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment