2016 च्या ऑलिम्पिकमध्ये अवघ्या सहा महिन्यांच्या सरावावर 24 व्या स्थानी समाधान मानावे लागलेल्या जागतिक रोईंगपटू दतू भोकलन याला आता टोकियो
ऑलिम्पिक स्पर्धेचे वेध लागले आहेत. 2020 च्या टोकियो येथे होणार्या स्पर्धेच्या
तयारीसाठी त्याला अजून तीन वर्षांचा अवधी आहे. त्या दृष्टीने
तो सध्या जोरदार तयारीला लागला आहे. दररोज चार तास सराव करत असून
देशासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारच, असा
त्याला आत्मविश्वास वाटत आहे.
10 वी झाल्यावर इतर कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्याची
फारसी संधी नाही. त्यामुळे पुढे शिक्षण घेत राहिलो.
2012 यावर्षी 12 वी शिक्षण पूर्ण झाल्यावर देशसेवा
करण्याची त्याच्यामध्ये प्रामाणिक भावना जागृत झाली. कठोर मेहनत
घेऊन तो भारतीय लष्करात दाखल झाला. येथे त्याची एक हजार सहभागींमधून
पहिल्या 20 मध्ये खेळासाठी निवड झाली. तेथील
शिस्तबद्धता, योग्य प्रशिक्षण, सराव यामुळे
रोईंग खेळात 2013 व
14 या वर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदक, 2014 च्या कोरिया आशियाई साऊथ स्पर्धेत पाचवा येण्याचा मान मिळाला. ही स्पर्धा त्याने दुहेरी रोईंग प्रकारात खेळळा. त्याच्यासोबत
हरियाणाचा ओमप्रकाश होता.
2015 मध्ये चायना येथे आशियाई चॅम्पियन स्पर्धेत सिल्व्हर पदक मिळाले.
2016 च्या ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत सुवर्णपदक, याचवर्षी अमेरिकन राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक तर 2016 च्या ऑगस्टमध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जागतिक 13व्या स्थानी तर आशिया खंडात पहिला येण्याचा मान मिळाला. परदेशी खेळाडूंना अनेक सुविधा मिळतात. रोईंगमध्ये सरावासाठी
तलाव, नद्या लागते, त्याचा आपल्याकडे अभाव
आहे.त्याचा फटका त्याला बसल्याचे त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले
आहे. त्याच्या मतानुसार या स्पर्धेदरम्यान शारीरिक तंदुरुस्ती
खालावते. ती संतुलन ठेवणे महत्वाचे असते. या खेळाला शारीरिक यष्टी, मानसिक ताकद आवशयक असते.त्यामुळे जिद्द, चिकाटी, प्रबळ
इच्छाशक्ती मनात बाळगल्यास कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हा त्याचा
नवोदित खेळाडूंना सल्ला आहे. संकटे येत राहणार; परंतु त्यात आनंद मानून ध्येयापर्यंत
पोहोचण्यासाठी आत्मविश्वास बाळगणे गरज आहे. त्यामुळे रोईंगसारख्या खेळातही चांगले यश मिळवू शकतो, असे त्याला वाटते. तब्येत तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्याला
महिन्याला पाच हजाराचा आहार व अन्य खर्च आहे. शिवाय 14 किलोची बोट उपलब्ध आहे.
ज्या
भागात पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य आहे, अशा
ठिकाणी तो वाढला. शिवया त्याला 18 वर्षापर्यंत
या खेळाचा गंध नव्हता. मात्र, भारतीय सेनेत
दाखल झाला आणि त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. भारतात
क्रिकेटसारख्या खेेळावर वारेमाप पैसा खर्ची केला जातो.
मात्र, जो खेळ देशाला वांरवार ऑलिम्पिक पदके मिळवून
देतो त्याकडे तितकेसे लक्ष देण्यास शासन, क्रीडा क्षेत्र टाळाटाळ
करते हीच मोठी खंत असल्याचे तो व्यक्त करतो. अमेरिकन कंट्रीत
क्रिकेट खेळ फार दुर्मीळ आहे किंबहुना तो परिचितच नाही; परंतु
अन्य खेळात त्यांचे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदके मिळवतात. आपल्याकडेही आता अन्य खेळांना महत्त्व दिले जात आहे, मात्र अजून ज्या वेगाने त्याकडे लक्ष द्यायला हवे,तेवढे
दिले जात नाही. जीवनात कष्टाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सतत
ध्येयाने प्रेरित व्हावा आणि स्वत:ला घडवा, असा सल्लाही त्याने नवोदित खेळाडूंना दिला आहे.
No comments:
Post a Comment