घरबसल्या सगळी कामे होत असतील तर कोणाला नको आहे. ग्राहकांच्या मनातील हेच भाव जाणून घेऊन काही कंपन्यांनी त्यांना
घरबसल्या वस्तू देण्याचा फंडा अलिकडच्या काही वर्षात अवलंबला आहे. आणि याला अपेक्षेप्रमाणे भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने यात अन्य कंपन्याही
उतरल्या आहेत. ग्राहक आपल्याला हवी ती वस्तू ऑनलाईन नोंदवू लागला
आहे. आणि त्या वस्तू पोस्टाच्या,कुरिअरच्यामाध्यमातून
लोकांना घरपोच मिळू लागल्या आहेत. लोकांनी ऑनलाईन आपला चॉईस निवडायचा
आहे. बाजारातल्या दुकानातील पोर्या जशा
वस्तू आपल्यासमोर ठेवतो, तशा वस्तू ऑनलाईन आपल्याला पाहायला मिळतात.
त्याचे आकार,वजन,किंमत,त्यातले नमुने अशा अनेक वस्तूंची व्हरायटी आपल्याला ऑनलाईन पाहायला मिळतात.
साड्या,अन्य कपडे,घड्याळ,मिक्सर,ग्राईंडर,इस्त्री,हेअर ड्रायर,मोबाईल,टीव्ही,लॅपटॅप अशा कितीतरी वस्तू आपल्याला ऑनलाईन मिळू लागल्या आहेत. इतकेच नव्हे तर काही कंपन्यांनी 2 हजार रुपयांचे सुट्टे
देण्याचीही व्यवस्था केली होती. लोकांच्या दिमतीला अगदी गोवर्या, गोमूत्र अशाही काही आश्चर्यकारक
वस्तूही विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. इतका हा ऑनलाईन बाजार
भरला-फुलला आहे.
इलेक्टॉनिक वस्तूंना या ऑनलाईन खरेदीच्या बाजारात अधिक मागणी
असल्याचे सध्यातरी दिसते आहे. हा व्यवहार लोकांना आवडला आहे,
मात्र यात काही धोकेही आहेत. फसवणुकीचे धोके वाढले
आहेत. घरापर्यंत येणारी वस्तू ही आपण मागितलेलीच आहे का,
याची खात्रीही देता येत नाही. शिवाय आपल्या बँकेतले
पैसेही आता सुरक्षित राहिनासे झाले आहेत.
त्यामुळे ऑनलाईन खरेदीतील धोके लक्षात घेऊन व्यवहार करणे, योग्य आहे.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण
ज्या वेबसाईटवरून खरेदी करणार आहे,ती सुरक्षित आहे का,याची खात्री करून घ्यावी लागेल. सुरक्षित वेबसाईटवर सुरक्षिततेचे
चिन्ह दिलेले असते. अशा वेबसाईटवरून खरेदी करणे,उत्तम. ऑनलाइन खरेदीच्या ज्या चांगल्या साइटस् उपलब्ध
आहेत त्यावर खरेदीच्या मूल्यमापनाचे अहवालही उपलब्ध असतात. खरेदीसाठी
क्लिक करण्याआधी पूर्ण वेबसाइटवर फिरून यावं. अनेक वेबसाइटवर
ग्राहकांची तक्रार नोंदवण्याची-निवारणाची सोयही उपलब्ध असते.
आपण जिथून खरेदी करू तिथे ही व्यवस्था आहे का? हे आधी तपासायला हवं.वस्तूची ऑर्डर देण्याअगोदर या गोष्टीची
काळजी करायला हवी.दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण ज्या वस्तूची
ऑनलाईन खरेदी करणार आहे.त्या वस्तूची संपूर्ण माहिती जाणून घ्यायला
हवी.
नेहमीची
खरेदी करताना जसं चार दुकानं फिरून आल्याशिवाय आपण साधा झाडूसुद्धा घेत नाही तसंच एखाद्या
साइटवरची वस्तू जरी आपल्याला आवडली असली तरी त्यासंबंधीच्या आणखी दोन चार साइटसची माहिती
काढून तिथे फेरफटका मारून येणे आवश्यक आहे. कपडे,
ज्वेलरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅझेटस् यांची
मागणी ऑनलाइन करण्याआधी जवळच्या दुकानात जाऊन त्या हाताळून पाहिल्या पाहिजेत.
ऑनलाईन
खरेदी करताना आपण पैसेदेखील ऑनलाईन चुकते करणार असतो.
आपल्याकडे डेबिट,क्रेडिट कार्ड उपलब्ध असतात,यातून आपण पैसे पाठवण्याची व्यवस्था करतो. मात्र अलिकडे
यात धोके वाढले आहेत. त्यामुळे खरेदीचं पेमेंट जर आपल्या क्रेडिट
कार्डवरून होणार असेल तर पेमेंटची माहिती स्वत:च्या हाताने भरायला
हवी. इतरांना ती भरू देऊ नये. यामुळे आपल्या
क्रेडिट कार्डची सुरक्षा धोक्यात येते. क्रेडिट कार्डच्या मागे
बारा अंकी नंबर असतो. शेवटचे तीन नंबर म्हणजे क्रेडिट कार्डची
चावी असतात. ते इतरांना समजू देवू नये आपण ऊठसूट जरी ऑनलाइन खरेदी
करत नसलो तरी आपलं इंटरनेट बँकिंगचं अकाउंट ऊठसूट चेक करावं. नेट चालू केल्यावर एकदा आणि बंद करण्याआधी एकदा अकाउंट चेक करणं हे सुरक्षिततेच्या
दृष्टीनं उचित असतं. क्रेडिट कार्डने खरेदीचे पेमेंट करताना पुरेशी
काळजी घेतली नाही तर तुमचे ऑनलाइन खरेदीचे अकाउंट हँग होऊ शकते.त्यातले पैसे दुसराच कुणीतरी परस्पर काढून मोकळा होतो.
सगळ्यात
महत्त्वाचं म्हणजे ऑनलाइन खरेदी ही शक्यतो स्वत:च्या
कॉम्प्युटरवरून स्वत:च्या नेटवरून करावी. सायबर कॅफेचा पर्याय सुरक्षित नाही. अगदीच नाईलाज असल्यास
आपण वापरत असलेल्या कॉम्प्युटरवर अँटीव्हायरस अँक्टिव्ह आहे की नाही हे आधी पाहायला
हवे.सायबर कॅफेमधील कॉम्प्युटर अनेक जण हाताळतात. आणि आपण इंटरनेटवर केलेले व्यवहार हे गोपनीय राहात नाही. ब्राऊजरमध्ये खरेदीसाठी निवडलेल्या साइटसची नोंद झालेलीच असते. त्यामुळे हे व्यवहार इतरांना माहीत होण्याची शक्यता जास्त बळावते. आपण इंटरनेटद्वारे केलेले व्यवहार कितीही गोपनीय ठेवण्याचे प्रयत्न केले तरी
इंटरनेटवर आपल्या व्यवहाराचे ठसे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उमटलेलेच असतात.
त्यामुळे खरेदीसाठी आपलाच कॉम्प्युटर आणि आपलेच नेट वापरायला हवे.
आपण
वर्तमानपत्रात वाचलेच आहे की, मोबाईल मागितला आणि दगड
मिळाला. एका व्यक्तीला तर इस्त्रीऐवजी शेणाच्या गोवर्या ऑनलाईन पॅकिंगमध्ये आढळून आल्या. अशा फसवणुकीच्या
अनेक घटना घडल्या आहेत.त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना असे संभाव्य
धोके लक्षात घेऊन पुढे काय करायचे,याही गोष्टी जाणून घेतल्या
पाहिजेत. कारण आपली फसवनूक झाल्यावर पुन्हा आपल्याला पैसे परत
मिळत नाहीत. या व्यवहारात अजून सक्षम असे कायदे आपल्याकडे झालेले
नाहीत. ग्राहक पंचायतीशी संपर्क साधून संभाव्य धोक्यांवरही तोडगा
काढून ठेवायला हवा. कंपन्या आपली विश्वासाहर्ता
अशाप्रकारे गमावणार नाहीत.मधल्यामधे अशा भानगडी होत असतात.
या कंपन्यांशी संपर्क साधून त्यांची हमी घेतल्यास उत्तम आहे.
ऑनलाईन खरेदी आपल्याला फार सोयीस्कर वाटत असली तरी त्यातले धोके लक्षात
घेऊन व्यवहार करायला हवा.
No comments:
Post a Comment