यश मिळवायचं असेल
तर बहिरे व्हा.कुणाचं काही
ऐकू नका, असं सांगितलं जातं. यासाठी एक
गोष्ट सांगितली जाते. ती आहे, एका बेडकाची.
एक बेडूक झाड चढण्याचा प्रयत्न करत असतो. पण तो
सारखा खाली पडत असतो. आपल्याला झाड चढायचंच आहे, असा विचार करून तो पुन्हा
नव्या नेटाने पुढे सरकत असतो. तो पुढे सरकला की, तिथे जमलेले सगळे बेडूक दंगा करायचे. सगळे जोरात ओरडायचे.
जाऊ दे रे,तुझ्याच्याने होणार नाही. तू पोहचणार नाहीस, अशक्य आहे,तू
पडशील, असे ते मोठमोठ्याने ओरडायचे. पण
बेडूक मात्र आपल्याच मस्तीत होता. शेवटी तो झाडावर चढण्यात यशस्वी
झाला.
तुम्हाला माहित
आहे,तो का यशस्वी झाला ते? कारण तो बहिरा होता. ज्यावेळेला सगळे बेडूक त्याला झाडावर
चढायला मनाई करत होते,
तेव्हा त्याला ते सगळे आपल्याला प्रोत्साहन देत आहेत, असे वाटायचे.त्यामुळे तो पुन्हा नव्या नेटाने पुढे जायचा.
त्यामुळे तो आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचला. आपल्याला
यश मिळवायचे असेल तर नकारात्मक माणसांसाठी बहिरे व्हा, हाच संदेश
आपल्याला या गोष्टीतून मिळतो.
No comments:
Post a Comment