बँकिंग
क्षेत्रात कर्ज वेळेत फेडणार्या एक प्रकारचा मान दिला
जातो. ठेकेदार काम वेळेत किंवा वेळेच्या आत काम पूर्ण केल्यावर
जसे तो दुसरे काम घेण्यास पात्र ठरतो अथवा काही बोनस रक्कम त्याच्या पदरात पडते.
त्याचप्रमाणे वेळेत कर्जफेड करणार्या कर्जदाराची
एक प्रतिमा तयार केली जाते. त्याचे क्रेडिट रेकॉर्ड बनवले जाते.त्यानुसार त्याला कर्ज देण्याचा बँका विचार करतात. आपल्या दूरदर्शी वित्तीय सवयींमध्ये
प्रामुख्याने दिसणारा मुद्दा म्हणजे कर्ज फेडण्याची जबाबदारी. अगदी तुमच्या बिलांपासून सुरुवात होऊन दरमहा कर्ज, कार
आणि पर्सनल लोनचे भलेमोठे हप्ते..असे सर्व काही तुमचा क्रेडिट
रिपोर्ट ठरवत असतात, आणि यातून तुमचा क्रेडिट स्कोअर तयार होतो.
या रेकॉर्डमुळे भविष्यात तुम्हाला मिळणारे कर्ज बर्याच प्रमाणात याच मुद्यांवर अवलंबून असते. यालाच क्रेडिट
रिपोर्ट म्हणतात. क्रेडिट रिपोर्ट म्हणजे तुमच्या आर्थिक व्यवहारांचा
इतिहास होय. यात तुमची बांधीलकी, हेतू आणि
कर्ज परतफेडीची क्षमता यांचा एकत्रित लेखाजोखा असतो. यापुढे तुम्ही
कर्ज देण्यास पात्र आहात की नाही, हे ठरवण्यासाठी बँका आणि एनबीएफसीजना
याच रिपोर्टचा संदर्भ उपयोगात येतो.
तुमचा
क्रेडिट स्कोअर जितका कमी तितकी तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता कमी होते.
तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यामुळे आपला क्रेडिट रिपोर्ट चांगला असावा,यासाठी आपण
प्रयत्न केले पाहिजेत. काही गोष्टींकडे ध्यान दिले पाहिजे. कर्जपुरवठादारही कर्जदारांच्या सकारात्मक
आणि सुधारित वागणुकीचे स्वागतच करतात. आपला क्रेडिट ट्रॅक रेकॉर्ड
अधिक चांगला असेल याची खातरजमा करण्यासाठी काही मुद्दे लक्षात ठेवावे, यात क्रेडिट रिपोर्ट तो कायम अपडेट रहावा यासाठी ब्युरोजना साह्य करा.
प्रत्येकाने ब्युरोशी संपर्क साधून सध्याचा क्रेडिट रिपोर्ट मिळवायला
हवा. यातील आधीच्या चुका आणि जुनी माहितीही बदलून घ्यायला हवी.
तुमच्या खात्यातून कोणत्याही प्रकारे उशिरा पेमेंट होणार नाही आणि प्रत्येक
खात्यांशी संबंधित आकडेवारी खरी असेल आणि अपटूडेट असेल याची काळजी घ्या. तुम्ही सहकर्जदार म्हणून इतर कोणासाठी आपले नाव दिले असले तर ते तुमच्या क्रेडिट
रिपोर्टमध्ये दिसेल. अशा दुसर्याच माणसाच्या
खात्यातील चुकाही तुमच्या क्रेडिट रिपोर्टचे नुकसान करू शकतात. त्यामुळे ठराविक काळाने सतत तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासणे आवश्यक आहे.
वेळेवर
कर्ज हवे असेल तर वेळेवर पेमेंट करा. आपण जसे घर
बांधतो तसेच क्रेडिट समरी उभारणे म्हणजे एकेक वीट रचणे. दरमहा
तुम्ही तुमची देणी देता, गहाण ठेवलेल्या वस्तूंवरचे कर्ज,
क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज आणि अगदी तुमचे मोबाईल
बिल्ससुद्धा, यातील प्रत्येक वेळी तुम्ही संभाव्य कर्जपुरवठादारांच्या
मनात तुमची सकारात्मक प्रतिमा निर्माण करत असता. थकबाकीच्या वेळेवर
केलेल्या पेमेंट्समुळे तुमचा क्रेे डिट स्कोर चांगला होईल. पण,
त्याचबरोबर भविष्यात तुम्हाला अधिक वेगाने कर्ज मिळू शकेल. बॅँका आणि एनबीएफसीजसमोर ’पात्र’ ठरण्यासाठी हा सर्वात उत्तम मार्ग आहे. नियामकांतर्फे
तुमचे हप्ते फेडण्यासाठी तीन दिवसांचा ग्रेस पिरिअड दिला जातो. मात्र, एकदा का तुम्ही हा कालावधीही घालवलात की क्रे
डिट ब्युरोजकडून तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये त्याची नोंद होते. क्रेडिट कार्डांच्या बाबतीत बॅँका पूर्ण पेमेंटच्या बदल्यात किमान थकबाकीचे
पेमेंट करण्याची सवलत देतात. त्यामुळे तुम्ही ’डिफॉल्टर’ ठरत नाही.
नेहमीच
कर्जांचे एक सकस मिश्रण करा. संभाव्य कर्जपुरवठादारासमोर
जबाबदार आणि संतुलित क्रेडिट हाताळण्याची तुमची उत्तम प्रतिमा तयार व्हावी यासाठी सकारात्मक
पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जांचे मिर्शण असून द्या. तुम्ही
वेगवेगळ्या प्रकारची कर्जे यशस्वीरीत्या हाताळल्यास एक चांगला
’क्रे डिट मिक्स’ तयार होतो. यातून तुम्ही विविध प्रकारची कर्जे हाताळू शकता, हे स्पष्ट
होऊन तुम्ही एक आर्थिकदृष्ट्या ’स्मार्ट’ आणि विश्वसनीय व्यक्ती आहात, अशी
प्रतिमा तयार होते.
No comments:
Post a Comment