Monday, March 6, 2017

वन्यजीव संवर्धनाची गरज


     भारतातील ठराविक वन्यजीवांकडेच अधिक लक्ष दिले जाते.त्यांच्यासाठी आरण्ये आरक्षित करण्यात आली आहेत. मात्र अन्य वन्यजीवही जगण्यासाठी सतत संघर्ष करत आहेत. हा संघर्ष चिंतनीय आहे. त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.यासाठी वन्यजीव संवर्धनासाठी जंगले समृद्ध असण्याची गरज आहे. वने हिच प्रत्येक वन्यजीवाची गरज आहे. जंगले समृद्ध असणे वन्यजीवासाठी चांगली गोष्ट आहे. जंगलेच तर प्राण्यांचे घर असते. जंगलातील प्रत्येक घटक प्राण्यांना पोषक असते. राज्यातील वनांबाबत चिंता निर्माण होत आहे. कोकण, नागपूरसारख्या ठिकाणांतील जंगले समृद्ध आहेत. मात्र उर्वरीत ठिकाणांमधील जंगले समृद्ध नाहीत. त्यामुळेच प्राणी जंगलांमधून बाहेर पडण्याचे प्रमाण वाढत आहे. जंगल तोड थांबली पाहिजे. पर्यावरण जपला पाहिजे. पर्यावरण साखळीतील जंगले आणि प्राणीच मुख्य घटक आहेत. यातूनच वन्यजीव संवर्धन जपले जाईल.
      दोन जंगलांच्या काही टप्प्यांवर प्राण्यांना स्थलांतरासाठी अभयारण्याची गरज आहे. शिवाय एका अभयारण्यातून दुसऱया अभयारण्यात जाण्यासाठी विरळ पट्टा ठेवावा लागतो. यालाच कॉरीडोअर म्हणतात. या कॉरीडोअरमध्ये घनदाट जंगल नसते. मैदानी प्रदेश, मुबलक सूर्यप्रकाश आणि मोकळे रान सदृश्य असा हा भाग असतो. निसर्गतःच हे पट्टे वनांमध्ये असतातही. मात्र या पट्टयांवर मानव कधी कधी अतिक्रमण करतोआपल्यालाआजोबाबिबटया माळशेजच्या घाटातून प्रवास करत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आलेली घटना आठवते आहे का पहा ? ही घटना प्रसिद्ध आहे. प्राणी सतत स्थलांतर करत असल्याची ही घटना प्रमुख साक्ष देते. बिबटयाच नव्हे तर सर्व प्राणी सतत स्थलांतर करत असतात. प्राण्यांमध्ये कधी कधी हे असुरक्षिततेतून येते. मात्र प्राण्यांना स्थलांतर करणे आवडते. हे स्थलांतरण उपजीविकेसोबत पुनरुत्पादनासाठी असते. मोनार्क नावाचे फुलपाखरू पॅनडाहून मेक्सिकोला हजारो किमीचे अंतर पार करून प्रवास करत जात असते. अर्थात मेक्सिकोला पोहचणारे त्या फुलपाखराची ती तिसरी पिढी असते. कारण फुलपाखरांची आयुष्य आठ दिवसांपासून एक वर्षापर्यंत कितीही असू शकते आणि त्यांच्या स्थलांतरणाचे अंतर हजारो किमी लांबीचे असते.
      मानव-वन्यजीव संघर्ष सध्या  सुरू आहे. प्राण्यांच्या संचारावर मानवच अडथळे निर्माण करत आहे. त्यामुळे वन्यजीव मानवी वस्तीत आले की मात्र तो वस्तीत आल्याची ओरड सुरू होते. संजय गांधी नॅशनल पार्कच्या परिसरातील मानवी वस्तींमधून हा संघर्ष ऐकायला अधिक मिळतो. यात बिबटयाचे मोठया प्रमाणात उदाहरण दिले जाते. सध्या मात्र बिबटयांचे मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण फार कमी झाले आहे. प्राण्यांसोबत मानवाने कसे वागावे याबाबत जागरुकता निर्माण करावयाची आवश्यकता आहे. वनविभागाने जागरुकतेचे उपक्रम राबविले पाहिजेत.
     अलिकडे वन्यजीवांच्या तस्करींचे प्रमाण वाढले आहे. वन्यजीवांच्या अवैध तस्करीला चाप लावण्यात यश मिळण्यासाठी विविध उपाययोजनांची गरज आहे. वनविभागाच्या कारवाईमुळे जंगलातील विविध स्त्राीतांच्या तस्करीला काही प्रमाणात अंकुश लागला असला तरीही त्यावर पूर्णपणे रोख लावणे अद्याप शक्य झालेले नाही. लाकडांसाठी जंगले कापली जातात. प्राण्यांच्या कातडीसाठी, सापांच्या दुर्मिळ त्वचेसाठी तस्करी सुरू आहे. मध्यंतरी कोकणात दापोलीजवळ वनविभागाने छापा टाकून काही जणांना पकडले होते. खवल्या मांजरांच्या त्वचेसाठी त्यांची कत्तल केली जात होती. ही त्वचा विदेशामध्ये पाठवण्यात येत होती. अशी कित्येक खवली मांजरे मारण्यात आली आहेत.वन्य विभागाने याकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे.
      मानव विरुद्ध वन्यजीव संघर्ष संपवता आला पाहिजे. पर्यावरण म्हणजे जंगले, वन्यप्राणी, दिसणाऱया-न दिसणाऱया अनेक घटकांपासून निर्माण झाले आहे. वनस्पती, झाडे यांना बोलता-हलता येत नाही. मात्र वन्यजीवांना मात्र हलताही येते आणि बोलताही येते. त्यांचे भाव त्यांच्या आवाजावरून ओळखता येतात. वन्यजीवांवरील प्रेमाची जपणूक घरापासूनच सुरू व्हायला हवी. जंगले आणि माणूस एकत्रच वाढणार आहे. आज हे दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. मात्र संघर्ष दूर करण्यासाठी वने जपायला हवीत. म्हणजे आपोआप वन्यजीव जपली जातील.

No comments:

Post a Comment