आपल्या वापरात
गॅजेट्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणि ही गॅजेट्सं सोबत घेऊन जाणं, ही आपली
मजबुरी बनत चालली आहे. अशा परिस्थितीत वियरेबल गॅजेट्सचा(
पेहराव योग्य गॅजेट्स) आपल्यासाठी चांगला पर्याय
उभा राहत आहे. भविष्यात ही गॅजेट्संच आपलं विश्व व्यापून टाकतील, असं दिसतं आहे. भविष्याची गरज लक्षात घेऊन गॅजेट्स निर्माता कंपन्यांनी अशा प्रकारच्या वस्तूंची
निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. तंत्रज्ञानाशीसंबंधित तज्ज्ञांच्या
मतानुसार येणारा काळ हा वियरेबल गॅजेट्सचाच असणार आहे.

गॅजेट्स निर्माता
कंपनी जियोमीनेदेखील आपले स्मार्ट शूज बाजारात आणले आहे,जे आपल्या फिटनेसवर लक्ष ठेवतील.शूज घातल्यानंतर आपल्या हेल्थ मॉनीटरचे काम सुरू होईल.हे आपल्या कॅलरी बर्न,स्टेप्स काऊंडसारख्या काही गोष्टींचा
फिटनेस डाटा नोंदवतील.जियोमी कंपनीने याला नाव दिलं आहे,90
मिनट अल्ट्रा स्मार्ट रनिंग शूज. जियोमी टेक्नॉलॉजीच्या
जियोमी स्मार्ट शूजमध्ये इंटेल क्युरी चीप ( बटनाच्या आकाराचे
चीप,जे रीअल टाइम फिटनेस डाटा स्टोर करेल) लावण्यात आलेली आहे.
अशाच प्रकारे जर्मनीच्या
शास्त्रज्ञांनी एक असा इलेक्ट्रॉनिक टॅटू विकसित केला आहे,जो त्वचेवरील डागाचा किंवा खुणेचा
उपयोग स्मार्टफोन नियंत्रित करणार्या टच सेंसेबल बटण म्हणून करता येतो. हा ई-टॅटू अगदीच पातळ आणि अस्थायी स्वरुपाचा असणार आहे.
जर्मनीच्या सारलँड युनिवर्सिटीचे संशोधक सुचालक यांनी शाईद्वारा एका
टॅटू पेपरवर वायर आणि इलेक्ट्रोड प्रिंट करण्यात यशस्वी झाले आहेत.त्यांनी या टॅटूला स्कीनमार्क असे नाव दिले आहे. याची
जाडी माणसाच्या केसाच्या जाडीपेक्षाही कमी आहे. न्यू सायंस्टिस्टच्यानुसार
या टॅटूला पाण्याच्यासहाय्याने त्वचेवर चिटकवलं जाऊ शकतं. या
टॅटूला काढण्याचीही आवश्यकता नाही. हा टॅटू त्वचेवरून काढला नाहीतरी
आपल्या त्वचेचं काहीही नुकसान होणार नाही. संशोधक मार्टिन यांच्यामतानुसार
लोकांना आपल्या त्वचेवरील खूण किंवा डाग सहजरित्या लक्षात राहत असतात. याचा ते आपल्या स्मार्टफोनच्या टच बटण सारखा उपयोग करू शकतात.हा टॅटू त्वचेवर चिकटवल्यानंतर आपण आपल्या बोटांनी त्याला स्पर्श करून आपल्या
स्मार्टफोनचा आवाज कमी-जास्त किंवा बंद-चालू करू शकतो. या टॅटूसाठी त्वचेच्या लवचिकपणाचा वापर
करण्यात आला आहे. त्वचेच्या संकुचित होण्याच्या स्थितीने टॅटू
स्मार्टफोनला जो आदेश देईल, त्याच्या उलट त्वचेच्या विस्तारण्याने
आदेश देईल.त्वचा लवचिक असल्यामुळे एका ठिकाणच्या त्वचेद्वाराच
स्मार्टफोनला एकापेक्षा अधिक आदेश दिले जाऊ शकतात. अशा प्रकारे
नव्या जमान्यातील कपडेदेखील तयार आहेत. देश-विदेशातल्या कित्येक कंपन्या यादिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. लवकरच बाजारात इलेक्टॉनिक टी-शर्ट येणार आहेत,
जे फॅशनमध्ये तर आघाडी घेतीलच शिवाय तुमचे मनोरंजनदेखील करतील.
सध्याला त्याच्याबाबतीत खुलासे आले आहेत, त्यानुसार
टी-शर्टाच्या समोरच्याबाजूला लाईंटिंग लावलेली आहे,जी आजूबाजूच्या आवाजानुसार डान्स करताना दिसून येतील. यामध्ये सात स्पॉट दिलेले आहेत.त्यांना स्पर्श केला की,
त्यातून आवाज येईल आणि तुम्हाला आलेला कंटाळा दूर पळून जाईल.

No comments:
Post a Comment