Tuesday, January 2, 2018

(चित्रपट) 2018 मधले 18 खास आकर्षण

     2017 मध्ये बाहुबली 2 किंवा दंगल या चित्रपटांनी उत्पन्नाचे नवे विक्रम प्रस्थापित केले. सलमान खानचे चित्रपट चालले, अक्षय कुमारचे सध्या चांगले चालले आहे. त्याला 2018 ए सालदेखील चांगले जाणार असे चित्र दिसत आहे. बॉलीवूडचा बादशहा संबधले जाते,तो शाहरुख खानसाठी मात्र 2017 चांगले गेले नाही. पण कमी बजेटचे चित्रपटदेखील चांगली कमाई करून गेले. आता 2018 मध्येसुद्धा जबरदस्त चित्रपट येणार आहेत. यांची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. यातले बरेच चित्रपट वेगळ्या धाटणीचे आहेत. त्यामुळे या वर्षात प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होणार आहे. यावर थोडा दृष्टीक्षेप टाकू या.

     दक्षिण राज्यातला सुपरस्टार रजनीकांत याचा बहुचर्चित 2.0 हा सायन्स फिक्शनवरचा चित्रपट 27 एप्रिलला प्रदर्शित होतोय. एस. शंकर दिग्दर्शित 2.0 मध्ये डॉ. वसीगरण यांना एका राक्षसाला रोखण्यासाठी पुन्हा चिट्टीला असेम्बल करण्यासाठी फोर्स केले जाते. यात अक्षय कुमार, आदिल हुसैन, एमी जॅक्सन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे.
संजय लीला भन्साळी म्हटले की, वादविवाद आलाच! त्यांनासुद्धा त्याची सवयच झाली आहे. काही लोक असे म्हणतात की, चित्रपट हिट होण्यासाठी संजय भन्साळी असे काही वाद स्वत:च निर्माण करतात आणि त्याचा चित्रपटांना फायदा होतो. सध्याही पद्मावती या चित्रपटावरून जोरदार वाद सुरू आहे. यात पदमावतीची भूमिका केलेल्या दीपिका पादुकोणचे नाक छाटण्याचा इशारा काही संघटनांनी दिला आहे. काहींनी चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा विढा उचलला आहे. म्हणजे या चित्रपटाचा वाद भलताच विकोपाला गेला आहे. आता या चित्रपटाच्या नावातही बदल करण्यात आला आहे. पद्मावतीचे पद्मावत असे नामकरण करण्यात आले आहे. चितोडची महाराणी असलेल्या पद्मिनीच्या जौहरवर आधारित असलेला हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपट रणवीरसिंह, शाहिद कपूर, अदिती राव हैदरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या तरी या चित्रपटाची प्रदर्शित तारीख निश्चित झाली नाही.

     रेस फ्रेंचाइजीचा रेस 3 हा बहुचर्चित तिसरा चित्रपट 5 जूनला प्रदर्शित होतोय. रेमो डिसुझा दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटात सलमान खान, जॅकलिन फर्नांडीस, बॉबी देओल, अनिल कपूर, डेजी शाह यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आहे. टायगर जिंदा है, या चित्रपटाने चांगला बिझनेस केला. त्यामुळे सलमानचे नशीब जोरावर आहे. हा चित्रपटही त्याला सहाय्यभूतच ठरणार, हे निश्चित आहे.
दोन भारतीय लष्करातल्या अधिकार्यांवर आधारित सत्य घटनांवरील अय्यारी हा चित्रपट 26 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अनुपम खेर, सिद्धार्थ मल्होत्रा, नसरुद्दीन शहा, रकुल प्रीत सिंह, मनोज वाजपेयी, पूजा चोप्रा, आदिल हुसैन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.नीरज पांडे दिग्दर्शित अय्यारी चित्रपटाबाबत मोठ्या आशा आहेत. सत्य घटनावर आधारित आणखी एक चित्रपट म्हणजे सुपर 30. सुपर 30 कार्यक्रम चालवणार्या पटनातल्या मॅथमेटिशियन आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट 23 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. विकास बहल दिग्दर्शित सुपर 30 मध्ये ऋत्विक रोशन, मोहम्मद जीशान अय्युब, मृणाल ठाकुर यांच्या भूमिका आहेत.
     अक्षय कुमार याचा पॅडमन नावाचा चित्रपट 26 जानेवारीलाच प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक आर बाल्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून अक्षय कुमारसह राधिका आपटे, सोनम कपूर यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. अरुणाचलम मुरुगनांथम यांची ही बायोफिक आहे. हा चित्रपट महिलांच्या पिरियड्सच्या समस्यांवर आधारित हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना च्या प्रोडक्शन हाऊसद्वारा हा चित्रपट बनवला जात आहे. अतुल मांजरेकर दिग्दर्शित फन्ने खां या चित्रपटात अनिल कपूर, ऐश्वर्या रॉय बच्चन, राजकुमार राव, दिव्या दत्ता  यांच्या भूमिका असलेल्या चित्रपटात न्यूटन स्टार राजकुमार राव हिच्यासोबत पहिल्यांदाच 15 जूनला पडद्यावर येत आहे.
     ठग्स ऑफ हिंदोस्तान नावाचा अमिताभ बच्चन, अमिर खान, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्या अभिनयाने नटलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 7 नोव्हेंबर अशी आहे. अमिताभ बच्चन आणि अमिरखान हे दोघे दिग्गज कलाकार पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. 30 मार्चला प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त यांच्या जीवनातल्या संघर्षावर आधारित संजय दत्त बायोफिक हा चित्रपट येऊ घातला आहे. राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
   
 कमल हसनचा अप्पू राजा तुम्ही पाहिला असाल. कमल हसन नेहमी नवनवे प्रयोग करण्यात माहीर आहे. अप्पूराजामध्ये कमलने डबल रोल केले होते. यातला अप्पू बुटका होता. हा चित्रपट दक्षिणमध्ये तर सुपरहिट ठरला. आता याच धर्तीवर दिग्दर्शक आनंद एल रॉय यांचा नेक्स्ट येतो आहे. यात शाहरुख खानदेखील आपल्याला बुटक्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.शाहरुखसोबत कटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा दिसणार आहेत. हिचकी नावाचा एक चित्रपट 23 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. यात एका तरुणीची कथा आहे, जी आपल्या कमजोरीलाच ताकद बनवते. सिद्धार्थ पी. मल्होत्रा या चित्रपटाचे डायरेक्शन करीत असून राणी मुखर्जी, सुप्रिया पिळगावकर, नीरज कवी यांच्या भूमिका आहेत.
सध्या अगदीच फार्ममध्ये असलेल्या दिग्दर्शक रोहीत शेट्टीचा सिम्बा नावाचा चित्रपट 2018 च्या अखेरीस म्हणजे 28 डिसेंबरला येणार आहे. या चित्रपटात रणवीरसिंह पोलिस अधिकारी संग्राम भालेरावची भूमिका साकारणार आहे. अक्षयकुमारचा गोल्ड हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. रीमा कागती यांचे डायरेक्शन असलेला हा चित्रपट 1948 सालच्या लंडन ऑलिम्पिकवर आधारित स्पोर्ट ड्रामा चित्रपट आहे. अक्षय यात बलबीरसिंह यांची भूमिका साकारत आहे. यात अक्षयसोबत फरहान अख्तर, मौनी रॉय, गौहर खान, कियारा आडवाणी, कुणाल कपूर यांच्या भूमिका आहेत.
     बागी 2 हा दिग्दर्शक अहमद खान यांचा चित्रपट 27 एप्रिलला येतोय.2016 च्या बागी चित्रपटाचा हा सिक्वल असणार आहे. टायगर श्रॉफ, दिशा पटाणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी हा राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित चित्रपट असून तो 27 एप्रिललाच प्रदर्शित होणार आहे. यात कंगना राणावत,सोनू सूद, डॅनी डेंजोग्पा आणि अंकिता लोखंडे यांच्या भूमिका आहेत. कंगना राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
     चार तरुणींची कथा घेऊन दिग्दर्शक शशांक घोष 18 मेला येणार आहेत. खर्या प्रेमाच्या शोधात असलेल्या चार तरुणीच्या भूमिका करिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर यांच्या वाट्याला आल्या आहेतसुमित व्यास, जावेद शेख यांच्याही भूमिका आहेत. हेट स्टोरी या सिरीजमधील हॅट स्टोरी 4 हा चित्रपट दिग्दर्शक विशाल पांड्या घेऊन येत आहेत. उर्वशी रौतेला, डेनियल एगन, रीता सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 2 मार्चला प्रदर्शित होणार आहे. शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कांदबरीवर आधारित दास देव नावाचा चित्रपट 16 फेब्रुवारीला येतोय. सुधीर मिश्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून ऋचा चढ्ढा,अदिती राव हैदरी, राहूल भट्ट यांच्या भूमिका आहेत.
बादशाहो नंतर अजय आणि इलियाना डिकूज यांची जोडी आता आपल्याला रेड मध्ये दिसणार आहे. 16 मार्चला रिलीज होणारा हा चित्रपट राजकुमार गुप्ता दिग्दर्शित असून 1980 च्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. यात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हाय प्रोफाईल इन्कम टॅक्स छाप्याचे चित्रीकरण यात असणार असून अजय इन्कम टॅक्स अधिकार्याच्या भूमिकत दिसणार आहे. अजयचा दुसरा एक चित्रपट अनटायटल अर्बन लव स्टोरी 19 ऑक्टोबरला म्हणजे ऐन दसर्यात रिलीज होणार आहे. यात गोलमाल अगेन नंतर पुन्हा एकदा अजय आणि तब्बू एकत्र दिसणार आहेत. 7 डिसेंबरला त्याचा आणखी एक धमाल चित्रपट टोटल धमाल हा चित्रपट येत आहे. हा संपूर्ण कॉमेडी चित्रपट आहे. यात माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरदेखील दिसणार आहे. हा चित्रपट इंद्रकुमार दिग्दर्शित करत आहेत. मागच्या दोन भागात संजय दत्त होता,पण यात तो दिसणार नाही.

No comments:

Post a Comment