खादाड कोळी
अनासी नावाचा कोळी गावाजवळच्या
एका बाओबाब वृक्षाच्या ढोलीत राहत होता. तो फार आळशी होता. स्वत:साठी अन्न
मिळवायलाही तो ढोलीच्या बाहेर फारसा पडायचा नाही. इमिनाथी नावाच्या मुलीला तो
दररोज जंगलात जाताना पाहायचा. परत येताना तिची टोपली रसाळ द्राक्षे, लाल बोरे, पिवळीधम्मक केळी व मधाने
काठोकाठ भरलेली असायची. तिच्याजवळून जंगल्यातील या मेव्याचे ठिकाण जाणून घेण्याचा
निश्चय आळशी अनासीने मनाशी केला. बाओबाब जवळून ती जात असताना अनासीने तिच्या
टोपलीत स्वत:ला जाणूनबुजून झोकून दिले. काही अंतर गेल्यावर तो इमिनाथीला हळूच
म्हणाला, इमिनाथी, सर्व गावाला माहीत
आहे. तू जशी सुमधुर फळे शोधतेस तसे कोणी करू शकत नाहीस. त्या सुमधुर फळांची जागा
मला दाखवशिल का? मी वचन देतो की ती जागा मी इतर कुणाला
दाखविणार नाही. इमिनाथी तर चिंतेत पडली कारण तिला अनासीचा लबाड स्वभाव माहीत होता.
ठीक आहे, पण केवळ एकदाच मी तुला ती जागा दाखवीन. ती कोळ्याला
म्हणाली. ते दोघे जंगलाच्या एका अतिशय घनदाट भागात गेले. तेथे फळांने लगडलेले अनेक
वृक्ष होते. जागा कळल्यावर अनासीने इमिनाथीची पर्वा न करता प्रथम संत्री व बोरांवर
ताव मारला. नंतर तो केळीच्या झाडावर चढला व सर्व केळी खाऊन टाकली. त्याचे पोट
तुडुंब भरले होते पण खादाड कोळ्याला अजून मधाचा स्वाद चाखायचा होता.
इमिनाथीने एका झाडाच्या ढोलीकडे
बोट दाखविले व ती म्हणाली, ह्लया ढोलीत मधाचे एक पोळे आहे.
अनासीने लगेच त्या ढोलीत जाऊन पोळ्यातील मधावर ताव मारला. मधाचा शेवटचा थेंबही
त्याने सोडला नाही.
.................................................................................................................................................................................
कोल्हा आणि कोंबडा
एका शेतकर्याने कोल्हय़ास
पकडण्यासाठी एक सापळा लावून ठेवला होता, त्यात
सकाळीच एक भला मोठा कोल्हा सापडला. ती मौज दुरून एका कोंबड्याने पाहिली, परंतु कोल्हय़ासारख्या लबाड व दुष्ट शत्रूवर एकाएकी विश्वास ठेवणे बरे
नव्हे, म्हणून तो हळूहळू भीत भीत सापळ्यापाशी आला आणि
कोल्हय़ाकडे पहात उभा राहिला. कोल्हय़ाने त्यास पाहिले, तेव्हा
तो मोठा संभावितपणाचा आव आणून त्यास म्हणतो, मुला, पहा मी कसा संकटात सापडलो आहे; आणि हे सगळे केवळ
तुझ्यामुळे झाले; मी सकाळीच पलीकडल्या कुंपणांतून घराकडे जात
असता, तुझा शब्द माझ्या कानी पडला, तेव्हा
तुझी कशी काय हालहवाल आहे, ते विचारून मग जावे, अशा विचाराने मी इकडे आलो, तो या चापात अडकलो.आता
कृपा करून तू जर मला एक बारीक काठी आणून देशील, तर ती या
सापळ्यात घालून, मी आपली सुटका करून घेईन. हे तुझे उपकार मी
कधीही विसरणार नाही. हे ऐकून कोंबडा घरी गेला आणि सापळ्यात कोल्हा अडकला आहे,
असे त्याने आपल्या धन्यास सांगितले. तो शेतकरी एक मोठा सोटा घेऊन
आला आणि त्याने त्या त्या कोल्ह्याची पाठ अशी मऊ केली की, त्या
माराने तो कोल्हा ताबडतोब मरण पावला.
.................................................................................................................................................................................
राक्षस चोर आणि पुजारी
एके दिवशी एका यजमानने त्या
गरीब पुजार्याला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या. दानात मिळालेल्या त्या
दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्याचं दैन्य पळाले. एके काळी
शिळी पोळी भाजी खाणार तो ब्राह्मण! गावात दूध, दही,
लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला.
द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी
बघायची अन् ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या, असा
त्या चोराचा डाव होता. एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी
येत असताना वाटेतच त्या चोरीचा गाठ एका राक्षसाबरोबर पडली. परस्परांनी एकमेकांना 'तू कुठे अन् का जातोस,' ते विचारले.चोर म्हणाला,
मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे. पण तू कुठे चालला
आहेस? अरे, मी तर प्रत्यक्ष त्या
ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. हय़ा
ब्राह्मणाने मंत्र-तंत्र करून माला दूर घालवायचे, माझे
अन्न-पाणी तोडले, पण आज मी त्यालाच खाणार आहे. झाले!
दोघांचही लक्ष एक निघाले. दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला. तो चोर अन् राक्षस हे
दोघे त्या ब्राह्मणाच्या दारांत आले. दोघांनीही घरात डोकावून पाहिले, तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता. राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार,
तोच चोर म्हणाला, अरे थांब! मी आधी दोन्ही
गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा. त्यावर राक्षस म्हणाला,
वा रे वा! मोठा शहाणाच आहेस की तू! तू गायींना नेताना त्या हंबरल्या,
तर तो जागा होणार नाही का ! मग मी काय करू? राक्षसाचे
हे म्हणणे चोराला पटेना अन् चोर आपली घाई सोडेना. असे करता-करता हळूहळू त्यांचे
एकमेकांचे आवाज तापू लागले. परस्परांतला संवाद संपू लागला. अन् वाद-विवाद भांडणं
चालू झाली. त्यात त्या दोघांनी आपल्या मोठय़ा आवाजचे भान राहिले नाही.
No comments:
Post a Comment