कल्पना चावला यांचा जन्म १ जुलै १९६२ रोजी झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता
चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या
धांगडधिंगाण्यात आवड होती. नटणे, घरकाम यापेक्षा त्यांना मित्र
मैत्रिणींबरोबर सायकलने ट्रीप ला जाण्यात रस वाटे. त्यांना बाहेर च्या जगात
फिरण्यास खूप आवडे. त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व
सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण लाडाने 'मोट'
असे म्हणत. त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता.
त्याच्याबरोबर दंगामस्ती करण्यात लहान कल्पना पटाईत होत्या. कल्पना चावला यांचे
शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले.
कल्पना चावला हुशार असल्याने त्या नेहमी त्या
पहिल्या पाच नंबरात असत. शिक्षकांच्या ही त्या लाडक्या झाल्या होत्या. त्यांचा
स्वभाव अतिशय साहसी होता. त्या कराटे शिकल्या.भरतनाट्यम या कला प्रकारातही त्यांनी
नैपुण्य प्राप्त केले.संजय हा त्यांचा भाऊ कर्नालच्या फ्लाईंग क्लबमध्ये जात होता.
तेव्हा कल्पना यांनाही तेथे जावे असे वाटत. पण जेव्हा वडिलांनी नोंदणी अर्ज दिला
तेव्हा अधिकार्यांनी कल्पना स्त्री आहे, ती वैमानिक होणे योग्य वाटत
नाही असे सांगितले. तसेच त्यांनी कल्पना यांना या वेडापासून परावृत्त करण्यास
सांगितले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी
घेतली. पुढे १९८४मध्ये अर्लिंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च
अभियांत्रिकी शिक्षण घेऊन,त्यांनी कॉलोरॅडो विदयापीठांतून
एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८मध्ये डॉक्टरेट मिळवली.
शैक्षणिक काळात कल्पना यांची जीन पियरे टॅरिसन
(जेपी) या युवकाशी ओळख झाली. जेपी यांचा विमानाचे प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय होता.
त्यांच्याकडून त्यांना विमान शिकता आले. तसेच स्कूबा डायव्हिंग हा रोमांचक खेळ
प्रकारही त्यांना जेपी यांच्याकडून शिकता आला. लहानपणापासून विमान शिकण्याचे
स्वप्न अमेरिकेत काही दिवसातच पूर्ण झाले. जेपी हे मुळचे फ्रेंच होते. त्यांचे
मैत्रीचे नाते प्रेमात बदलले व १९८४ साली जेपी व कल्पना यांचा विवाह झाला.
लग्नानंतर त्यांना विमान नीट उडवण्यास येऊ लागले. त्यांची संगीतातील आवड वाढू
लागली. डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर
समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात
त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला. १ फेब्रुवारी २00३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्या कोलंबिया अवकाशयानाचा
स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये
असलेल्या कल्पना चावला यांचा आणि अन्य अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment