Monday, January 15, 2018

कामाचा कंटाळा आला?

दोस्तांनो, कधी कधी आपण जमके काम करतो. कामात प्रचंड उत्साह वाटतो. कामं कशी अगदी भराभर होतात. पण कधी कधी प्रचंड वैताग येतो. बस्स झालं आता हे काम, असंही वाटून जातं. काम करता करता ठेऊन द्यावी फाईल बाजूला असं येऊन जातं मनात. जाऊया का घरी, मित्रांसोबत थोडं रिलॅक्स होऊया, असं वाटून जातं. पण त्याक्षणी तरी ते शक्य नसतं. पण काही गोष्टी करून तुम्ही तुमचा मूड बदलू शकता. ताण हलका करू शकता. 

* ऑफिसमध्ये प्रचंड ताण असतो. आवडीची गाणी ऐकून ताण हलका करता येईल. थोडा वेळ ऑफिस कँटिनमध्ये बसून मस्तपैकी गाणी ऐका. शक्य असल्यास मोठय़ाने गाणी लावा. मस्त एंजॉय करा आणि कामाला लागा. 
* हसल्याने ताण कमी होतो. त्यामुळे गंमतीशीर व्हिडिओ बघा. जोक्स वाचा. जुन्या आठवणींना उजाळा द्या.
* मित्रमैत्रिणी, भाऊबहिणींशी बोला. ज्यांच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं त्यांना फोन करा. व्हॉट्स अँप केलं तरी चालेल. भरपूर गप्पा मारा. यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हाल. 
* ऑफिसातल्या सहकार्‍यांसोबत थोडावेळ बाहेर भटकायला जा. टपरीवर एखादा चहा प्या. थोडावेळ मैफल जमवा. 
* आजच्या कामांच्या यादीवर नजर टाका. काही करायचं राहिलं आहे का ते आठवा. यामुळे छान वेळ जाईल. 
* दुसर्‍या दिवसाचं नियोजन करा. दोस्तांनो, कामाचा कंटाळा आलेला आहे हे खरं. पण आत्ताच्या कामाला तुम्ही कंटाळला आहात. त्यामुळे दुसरं काम करा. 
* गोष्ट, लेख किंवा पुस्तक वाचा. ऑनलाईन गेम्स खेळा.

No comments:

Post a Comment