इंजिनीअरिंगला जाणार्या
विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स
अँण्ड टेलिकम्युनिकेशन्स (ईएक्सटीसी), कॉम्प्युटर आणि आयटी
या शाखांकडे अधिक ओढा असतो. या शाखांमध्ये नेमका फरक काय आहे, नेमका किती वाव आहे, याबद्दल मात्र फारशी माहिती
नसते.
इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग
इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग
आज ही मूळ शाखा काहीशी मागे पडली असली, तरी रेल्वे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, विविध राज्यांमधली ऊर्जा महामंडळे, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबईतले बेस्ट आणि महानगरपालिका या सरकारी नोकर्यांमध्ये अजूनही इलेक्ट्रिकल इंजिनीअर्सना नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय टाटा इलेक्ट्रिक कंपनी, रिलायन्स यासारख्या खासगी वीज वितरण कंपन्यांमध्येही इलेक्ट्रिकल इंजिनीअर्सना वाव असतो.
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग
विजेचे नियंत्रण आणि प्रवाह याबाबतचे तंत्रज्ञान असलेल्या या शाखेत जसे झपाट्याने बदल होत गेलेत, तशा नोकरीच्या संधीही बदलत गेल्या. सुरुवातीला सॉलिड स्टेट टेक्नॉलॉजी अर्थात सेमी कंडक्टर म्हणजे मध्यम वीजवाहक असलेल्या ट्रान्झिस्टर्सचा वापर करून तयार केलेल्या इलेक्ट्रिकल सर्किट्सवर अनेक उपकरणे आणि यंत्रे चालायची. आता त्याची जागा इंटिग्रेटेड सद्गकट्सनी घेतली आहे. म्हणजे अनेक गोष्टी एका छोट्याशा चिपवर बसवून मायक्रोकॉम्प्युटरच्या सहायाने बरीच कामे करणारी लहानमोठी यंत्रे अस्तित्वात आलीत. उदा, पटकन दिसू न शकणार्या कानाच्या यंत्रापासून ते व्हॅक्युम क्लीनपयर्ंत रोजच्या जगण्यातल्या अनेक यंत्राचं उत्पादन करणार्या कंपन्यांमधून नोकर्या उपलब्ध आहेत. घरगुती उपकरणेच नव्हेत, तर रेल्वेची तिकिटे देणारी यंत्रे, एटीएम्स, चहा आणि कॉफी देणारी यंत्र अशा व्यापारी कारणांसाठी वापरल्या जाणार्या यंत्रांचेही डिझाइन, उत्पादन, दुरुस्ती आणि देखभाल करणार्या इंजिनीअर्सच्या पदांसाठी त्या तयार करणार्या आणि विक्रीपश्चात सेवा देणार्या कंपन्यांमधून या नोकर्यांच्या संधी आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स
दूरसंवाद क्षेत्राशी संबंधित असलेल्या या शाखेत बर्यापैकी वाव आहे. पण यात येणार्या उपकरणांची निर्मिती आणि प्रत्यक्ष सेवा यातही पुसटशी सीमारेषा आहे. उदा. दूरध्वनी किंवा मोबाइल संच तयार करायचे काम हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरगच्या अखत्यारीत येते, तर प्रत्यक्ष मोबाइल सेवा म्हणजेच सिग्नल प्रोसेसिंगचे काम हे ईएक्सटीसीच्या अखत्यारीत येतं. नेटवर्किंग इंजिनीअर, अँटेनासाठीचे डिझाइन इंजिनीअर, जगाच्या कुठल्याही कोपर्यात घडणारी घटना उपग्रहांच्या माध्यमातून आपल्यापयर्ंत तत्क्षणी पोहोचविणार्या टीव्ही चॅनल्सच्या ओबी म्हणजे आऊटडोअर ब्रॉडकािस्टग व्हॅनचे इंजिनीअर, हवामानाशी संबंधित उपग्रहांशी संवाद साधून हवामानविषयक अंदाज वर्तवणार्या यंत्रणेचे नियंत्रण करणारे इंजिनीअर्स, अशा अनेक इंजिनीअर्सना या क्षेत्रात मागणी आहे. त्यामुळे मोबाइल सेवा पुरवणार्या कंपन्या, दूरसंवाद क्षेत्रातल्या कंपन्या, इंटरनेट आणि एखाद्या कंपनीपुरते अंतर्गत माहितीजाल जोडणार्या इंटरनेट सेवा पुरवणार्या कंपन्या, हवामान खाते, उपग्रहांचे प्रक्षेपण करणारे इस्रो अशा खासगी आणि सरकारी नोकर्या उपलब्ध आहेत.
इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स
ही इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातली अवजड तसेच मध्यम उद्योगांशी निगडित आणखी एक शाखा. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि डिक्रीट इलेक्ट्रॉनिक्स असे या शाखेचे प्रामुख्याने दोन भाग असतात. पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात ऊर्जेचे नियंत्रण करणार्या उपकरणांचे उत्पादन, दुरुस्ती आणि देखभाल करण्यासंबंधीच्या नोकरीच्या संधी इंजिनीअर्सना उपलब्ध असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास लहान पर्सनल कॉम्युटर्सपासून ते बँका, विविध वित्तीय आणि इतरही कंपन्यांच्या भल्या मोठय़ा आकाराच्या अखंड सुरू राहणार्या सर्व्हर्सपयर्ंत सर्वांना ऊर्जेचा अखंडित प्रवाह सुरू ठेवणार्या यूपीएस तसेच कॉम्प्युटरच्या प्रोसेसर्सना आणि मदरबोर्डना इलेक्ट्रॉनिक ऊर्जेचा पुरवठा करणार्या एसएमपीएस अर्थात स्वीच मोड पॉवर सप्लाय यंत्रणा अशा गोष्टी इंडस्ट्रिअल इंजिनीअिरगच्या पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या उपशाखेत येतात. त्यामुळे या यंत्रणांशी संबंधित नोकर्या या क्षेत्रात उपलब्ध असतात. दुसरी उपशाखा म्हणजे डिक्रीट इलेक्ट्रॉनिक्स या शाखेत तकार्धारित निर्णय घेऊन काम करणार्या कॉम्प्युटरच्या लॉजिक सर्किट, प्रोसेसर्स आणि मेमरीज यांचे उत्पादन करणार्या कंपन्यांमध्ये इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्सना नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
कॉम्प्युटर इंजिनीअिरग
या शाखेमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर प्रणालीबाबतच्या नोकरीच्या संधी आहेत.
इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी
माहितीचे विेषण आणि व्यवस्थापन करणार्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टिम्स, सिग्नल प्रोसेसिंग आणि सिग्नल्समधून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या माहितीचा कुठे आणि कशाप्रकारे वापर करायचा याबाबतचे इन्फम्रेशन प्रोसेसिंग, थोडासा टेलिकम्युनिकेशन्स अर्थात, दूरसंवादाचा भाग असे या इंजिनीअरिंगचे उपयोग असून त्याच्याशी निगडित कामांच्या नोकर्या या क्षेत्रात उपलब्ध असतात, म्हणूनच काही वेळा आयटी इंजिनीअर्स ऑफिसमध्ये न जाता घरूनही काम करू शकतात.
वर दिलेल्या इंजिनीअिरगच्या सर्वच शाखांमध्ये लागणार्या यंत्रणांचे डिझाइन करणे, त्यांची उभारणी करून त्या सुरू करणं, त्यांची चाचणी घेणे, परीक्षण करणे, देखभाल आणि दुरुस्ती करणे आणि त्या विकण्यासाठीचे विपणन करणे अशा प्रकारच्या नोकर्या या क्षेत्रांमध्ये मिळू शकतात. सुरुवातीला वार्षिक तीन लाखांपासूनची पॅकेजेस मिळू शकतात. शिवाय सल्लागारी, सुट्या भागांची जोडणी, देखभाल, दुरुस्ती असे स्वयंरोजगारही आहेतच.
No comments:
Post a Comment