विदर्भ क्रिकेट
संघाने माजी विजेत्या दिल्लीचा नऊ गडी राखून पराभव करत रणजी करंडकावर आपले नाव कोरले. विदर्भाचे हे विजेतेपद ऐतिहासिक
ठरले. साठ वर्षांच्या इतिहासात दोन वेळा उपांत्य फेरीपर्यंत मजल
मारणार्या विदर्भाने यावेळी प्रथमच अंतिम फेरी गाठताना विजेतेपदाचे
स्वप्न साकार केले. हा सामना इंदूरमध्ये झाला.
माशलेकर आणि आई
प्रसिद्ध शास्त्रज्ञ
डॉ. रघुनाथ माशलेकर यांनी आपल्या आईविषयी
आठवणी सांगितल्या आहेत. ते म्हणतात, आईमुळेच
मी आज तुमच्यासमोर उभा आहे. तिने काबाडकष्ट करून मला शिकवले.
उच्च शिक्षण घेतले. परदेशात गेलो. मात्र माझे गुरू आणि पत्नी यांनी म्हटले देश आपल्याला बोलावतोय. मी भारतात आलो. गोरगरीबांना मदत कर, असे सांगणारी माझी आई अंजली माशलेकर हिच्या नावाने फाउंडेशन सुरू केले आहे.
माझ्या आईने मला जिद्द, संघर्ष,मेहनत करायला शिकवली. आतापर्यंत मला 38 डॉक्टरेट मिळाल्या. पुढच्या महिन्यात 39 वी डॉक्टरेट मिळणार आहे. मी दररोज पहाटे साडेचार वाजता
उठतो. आणि दोन तास वाचन करतो. देश-विदेशातील 35 समित्यांवर कार्यरत असल्याने चोवीस तास
मी व्यग्र असतो. कारण देशात हजारो माशलेकर घडायला हवेत.
त्यासाठीच फाउंडेशनद्वारे मी स्वत:ला कामात झोकून
देणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत कर्तृत्व, खडतर परिश्रमातूनच डॉ. माशलेकर यांनी यश संपादन केले.
कष्टाशिवाय पर्याय नाही, हेच त्यांनी त्यांच्या
कार्यातून सिद्ध करून दाखवले.
2017 मध्ये महाराष्ट्रात
22 वाघांचा मृत्यू
देशात वाघाच्या
संवर्धनावर भर दिला जात असताना मागील वर्षात महाराष्ट्रात 22 वाघांचा,तर मध्य प्रदेशात 24 वाघांचा मृत्यू झाला. देशभरात 98 वाघांचे विविध कारणांनी प्राण गेले आहेत.2016
मध्ये 14,2015 मध्ये 13, 2014 मध्ये 6 आणि 2013 मध्ये
15 वाघांचा मृत्यू झाला आहे.
आजचा सुविचार- कार्यकर्त्याने शुद्ध अंत:करण व निष्काम सेवाभावाने काम केल्यास टीकेची पर्वा करण्याचे कारण नाही.-संत गाडगेबाबा
पुण्यात ऑनलाइन
उलाढाल सोळाशे कोटींची होत असून रोज 50 हजारांवर पार्सलांची आवक होत आहे. 1200 कोटी डॉलर इतकी देशातील ई-कॉमर्स बाजारपेठ आहे.
47 टक्के इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाटा आहे. तर
31 टक्के कपड्यांचा वाटा आहे.
गाढवांच्या बाजारात
लाखोंची उलाढाल
जेजुरी येथे पौष
पौर्णिमेनिमित्त भरलेल्या गाढवांच्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली. आठ हजारांपासून पस्तीस हजारांपर्यंत
गाढवांची विक्री झाली. गुजरात आणि राजस्थानमधून गाढवे विक्रीसाठी
येथे आनतात. ॠुमारे 75 टक्के गाढवे या भागातून
विक्रीसाठी आणली जातात. उंचेपुरे व दणकट आणि रुबाबदार गाढवांना
मागणी असते. अवघड ठिकाणी कामासाठी गाढवांचा आजही वापर केला जातो.
काही गाढवांना सुमारे पंचवीस ते पस्तीस हजारांपर्यंत बाजारात लिलाव मिळाले.दहा हजारांच्या वर गाढवे विक्रीला असतात.
No comments:
Post a Comment