'ऐ मेरे वतन के
लोगों...' 55 वर्षांपासून देशातल्या नसानसांमध्ये
सळसळतो आहे. या गाण्याने राजा आणि रंक दोघांच्याही डोळ्यांत पाणी
आणले आहे. शहिदांचा सन्मान करताना सरकारे आपल्या पद्धतीने मदत
करतात. सैन्य दल तोफांची किंवा बदुकांच्या फैर्यांची सलामी देऊन शहिदांना शेवटचा निरोप देतात. जनता
शहिदांचा सन्मान करताना डोळ्यांत अश्रू आणून त्यांना आपल्या हृदयात जागा देतात.
चित्रपटसृष्टीने शहिदांच्या सन्मानाच्या रुपात 'ऐ मेरे वतन के लोगों...' सारखे गाणे दिले.
ऐ मेरे वतन के
लोगों... सरकारच्या प्रेरणेवर चित्रपटसृष्टीची
सुरुवात होती. हे गाणे शहिदांच्या हौत्माम्याचे स्मरण करण्यासाठी
रचले गेले होते. पण या गाण्याचा उद्देश होता, 1962 मध्ये मिळालेल्या पराभवाने खचून न जाता त्यांचे मनोबल वाढवण्याचे! गाण्याचा शेवट आहे, 'जय हिंद,जय
हिंद की सेना... ' गाण्याच्या काही अंतर्यांमध्ये सैन्याच्या रेजिमेंटांचा हवाला होता आणि सांगितले गेले होते की,
आमच्या एका एका वीर जवानांनी दहा-दहा शत्रू सैन्यांना
मारले.
ज्यावेळेला सरकारने
चित्रपटसृष्टीकडे मदतीची अपेक्षा केली, त्यावेळेला महबूब खान एक दिवस कवी प्रदीप यांच्या घरी पोहचले.
आणि त्यांना आपल्या देशाच्या सैनिकांच्या मदतीसाठी एक गाणे लिहिण्याची
विनंती केली. हे गाणे
सरकारच्या विनंतीनुसार लिहिले गेले असल्यामुळे यासाठी कवी प्रदीप यांना कसलाही मोबदला
मिळाला नाही. प्रदीप यांची इच्छा होती की, हे गाणे लता मंगेशकर यांनी गावावे. त्यावेळेला लता मंगेशकर
आपल्या कामात व्यस्त होत्या, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा नकार
दिला. अधिक विनंती केल्यावर या गाण्याचे दोन भाग करण्याचे ठरले.
एक भाग लता मंगेशकर आणि दुसरा भाग आशा भोसले यांच्या आवाजात
27 जानेवारी 1963 रोजी दिल्लीच्या नॅशनल स्टेडिअमवर
पहिल्यांदा गायले जाणार होते. वर्तमानपत्रांमधल्या जाहिरातींमध्ये
आशा भोसले यांच्याही नावाचा या गाण्याची एक गायिका म्हणून उल्लेख केला जात होता.
आशा भोसले यांनी या गाण्याच्या रिहर्सलमध्येही भाग घेतला होता.
या गाण्याच्या
संगीताची जबाबदारी सी. रामचंद्र यांच्याकडे सोपवण्यात आली होती. संगीतकार सी.
रामचंद्र यांच्या दिग्दर्शनाखाली लता मंगेशकर यांनी अनेक गाणी गायली
होती आणि त्यांच्यातला ताळमेळ चांगला जुळला होता. पण काही कारणांमुळे
1958 पासून लता मंगेशकर आणि सी. रामचंद्र यांच्यातील
बोलणेच बंद होते. अण्णा म्हणजेच सी. रामचंद्र
यांनी 26 जानेवारी 1963 रोजी लता मंगेशकर
यांना या गाण्याची टेप दिली. पण शेवटच्या वेळी आशांनी लता यांना
आपण दिल्लीला जाणार नसल्याचे सांगितले.लता मंगेशकर यांच्यासह
अनेक संगीतकारांनी आशा यांची खूप मनधरणी केली.पण त्या आपल्या
निर्णयावर ठाम राहिल्या. शेवटी 26 जानेवारी
1963 रोजी मुंबईतून एक फ्लााइट पकडून लता, दिलीप
कुमार, महबूब खान, राजकपूर, शंकर जयकिशन, सी. रामचंद्र यांचे
सहाय्यक मदन मोहन आदी मंडळी दिल्लीला रवाना झाली. फ्लाइटमध्ये लता मंगेशकर यांनी ते गाणे ऐकले,
जे सी.रामचंद्र यांनी टेपमध्ये दिले होते.
27 जानेवारी रोजी ते गाणे त्यांनी नॅशनल स्टेडिअमवर गायले. गाणे संपल्यावर स्टेजच्या पाठिमागे असलेल्या लता यांना महबूब खान यांनी त्यांना
पंतप्रधान पंडित नेहरू बोलावत असल्याचा निरोप दिला. नेहरू यांनी लता मंगेशकर यांचे कौतुक
केले आणि तुमच्या गाण्याने माझ्या डोळ्यांत पाणी आणले, असे सांगितले.
के हाणे दिल्लीत
ज्यावेळेला गायले गेले, त्यावेळेला तिथे ना या गाण्याचे संगीतकार सी. रामचंद्र
होते, ना कवी प्रदीप! नंतर ज्यावेळेला नेहरूंना
मुंबईला जाण्याची संधी मिळाली, त्यावेळेला त्यांनी आवर्जून कवी
प्रदीप यांची भेट घेतली. मात्र अण्णा शेवटपर्यंत उपेक्षितच राहिले.
ऐ मेरे वतन के लोगों... या गाण्याने इतिहास रचला.
या गाण्याने भारतरत्न लता मंगेशकर यांच्या करिअरला नवी उंची दिली.
या गाण्याचे गीतकार प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला.
या गाण्याची एक ओळ आहे, तुम भूल न जाओ इनको...
इसलिए कही ये कहानी. पण दुर्दैवाने या गाण्याचे
संगीतकार सी. रामचंद्र मात्र शेवटपर्यंत उपेक्षित राहिले.
त्यांचा आज दि. 5 जानेवारी रोजी स्मृतिदिन आहे.
तर 12 जानेवारी रोजी जन्मदिवस आहे.
अण्णा यांनी शास्त्रीय
संगीत यांनी लोकसंगीत यांचा मेळ घालत जी गाणी रचली होती, ती खूपच लोकप्रिय ठरली.
ऐ मेरे वतन... पूर्वीही अण्णा यांनी आना मेरी जान
संडे के संडे... (शहनाई, 1947), मेरे पिया गये रंगून... (पतंगा,1949) सारखी लोकप्रिय गाणी दिली होती.
No comments:
Post a Comment