एक युवक महान बनू
इच्छित होता. त्याने त्याचे
शिक्षण पूर्ण झाल्यावर काही महान व्यक्तिंची चरित्रे वाचली. काहींनी
त्याला सांगितलं की, महान बनायचं असेल तर महान लोकांच्या संपर्कात
राहणं आवश्यक आहे. हे ऐकताच तो युवक महान साहित्यिक,कलाकार,विचारवंतांच्या संपर्कात राहू लागला,परंतु त्याला सगळ्यांमध्ये काही ना काही दोष दिसून आला. तो निराश झाला. कुठल्या तरी एका निर्जन अशा रस्त्यावर
जाऊन बसला. अचानक त्याला रस्त्यावर साधारण चाळीस-पन्नास वर्षाचा एक माणूस दिसला. त्या माणसाने त्याला
निराश होण्याचे कारण विचारले. त्याने माणसाला विचारले,
मला विद्वान आणि महान बनण्यासाठी काय करावं लागेल? ती व्यक्ती म्हणाली, महान बनण्यासाठी महान बनण्याची इच्छा
आणि विद्वान बनण्यासाठी विद्वान बनण्याची इच्छा या दोघांचा त्याग करावा लागेल.
युवक म्हणाला, तुम्हाला काय म्हणायचे आहे,
मी काही समजलो नाही.
ती व्यक्ती म्हणाली
की, महान बनण्यासाठी लहान आणि विद्वान
बनण्यासाठी विद्यार्थी व्हावं लागेल. युवकाच्या डोक्यात प्रकाश
पडला. तो नम्रपणे हात जोडून म्हणाला, तुम्ही
तर माझे डोळेच उघडले. आपण महापुरुष अणि विद्वान तर नाही?
ती व्यक्ती म्हणाली की, मी कोणी विद्वान नाही,पण कित्येक लोकांना घडवले आहे.युवक म्हणाला, मोठी विचित्र गोष्ट आहे. तुम्ही दुसर्यांना विद्वान बनवू शकता,तर मग स्वत: का विद्वान आणि महान बनू शकत नाही? ती व्यक्ती म्हणाली,
कारण मी एक शिक्षक आहे. सांगायचे तात्पर्य असे
की, माणसे महान बनण्याची इच्छा ठेवतात,पण
महान बनण्यासाठी जो मार्ग स्वीकारायला लागतो, त्या मार्गाने जाताना
दिसत नाहीत. ज्ञान संपादन करून त्याचा योग्य दिशेने वापर केल्यास
त्याचे भरपूर फायदे होतात.
आजचा सुविचार: सर्वात कमी खर्चात मनोरंजन होते,
ते चांगली पुस्तके वाचल्याने आणि ते चिरकाल असते.-जॉर्ज बनार्ड शॉ
No comments:
Post a Comment