Monday, January 15, 2018

देशातील पहिली बिकिनी गर्ल

आजच्या काळात बिकिनी किंवा स्वीमसूट परिधान करणे ही अगदी सर्वसामान्य बाब आहे. पण ६0 ते ८0 च्या दशकांमध्ये फार कमी अभिनेत्री त्यासाठी तयार असायच्या. ६0 च्या दशकात शर्मिला टागोर प्रथमच बिकिनी परिधान करून दर्शकांसमोर आल्या होत्या. शर्मिला यांचा हा अवतार त्या काळातील दर्शकांना मात्र आवडला नव्हता. त्यामुळे या मुद्यावरून चांगलेच वाद झाले होते. 

१९६६ मध्ये फिल्मफेयर मॅगझिनच्या ऑगस्ट महिन्याच्या कव्हरवर शर्मिला बिकिनी परिधान करून झळकल्या होत्या. भारतीय प्रेक्षकांनी प्रथमच अभिनेत्रीला बिकिनीमध्ये पोज देताना पाहिल्याने एकच खळबळ माजली होती. वाद एवढा वाढला की, संसदेतही या मुद्यावरून रणकंदन झाले. शर्मिला त्या काळातील पहिल्यात अशा अभिनेत्री होत्या, ज्यांनी एखाद्या मॅगझिनसाठी बिकिनी परिधान करून फोटोशूट केले होते. एवढेच नाही, तर फिल्मफेयर मॅगझिनसाठी बिकिनी पोज देणार्‍या त्या पहिल्या अँक्ट्रेस बनल्या.
असे सांगितले जाते की, शर्मिला जेव्हा फोटोशूटसाठी स्टुडिओमध्ये आल्या तेव्हा फोटोग्राफर धीरेन चावलाने त्यांना शूटसाठी काय परिधान करणार असे विचारले होते. त्यावेळी शर्मिला यांनी त्यांच्या पर्समधून टू पीस स्वीमसूट काढला आणि यात फोटोशूट करणार असल्याचे सांगितले. टू पीस बिकिनीत मॅगझिनमध्ये कलर फोटो आलेल्या शर्मिला या पहिल्या अँक्ट्रेस होत्या. काही दिवसातच हे कव्हर व्हायरल झाले आणि त्याच्याशी संबंधित वाद वाढत गेले.
१९६६ हे वर्ष शर्मिला टागोर यांच्या करिअरसाठी मैलाचा दगड ठरले. यावर्षीच्या त्यांचे पाच चित्रपट (अनुपमा, देवर, सावन की घटा, नायक, ये रात फिर न आएगी) प्रदर्शित झाले होते. पाचही चित्रपटांना चांगले यश मिळाले होते. काही वर्षांनी जेव्हा या फोटोशूटशी संबंधित प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावेळी त्या म्हणाल्या. आपला समाज तेव्हा पार रुढीवादी होता. अनेकांनी माझ्यावर प्रसिद्धीसाठी असे केल्याचा आरोप केला. अनेकांनी टोमणे दिले. पण मी असे का केले हे मलाही माहिती नाही.आजच्या काळात बिकिनी किंवा स्वीमसूट परिधान करणे ही अगदी सर्वसामान्य बाब आहे. पण ६0 ते ८0 च्या दशकांमध्ये फार कमी अभिनेत्री त्यासाठी तयार असायच्या. ६0 च्या दशकात शर्मिला टागोर प्रथमच बिकिनी परिधान करून दर्शकांसमोर आल्या होत्या. शर्मिला यांचा हा अवतार त्या काळातील दर्शकांना मात्र आवडला नव्हता. त्यामुळे या मुद्यावरून चांगलेच वाद झाले होते. 
१९६६ मध्ये फिल्मफेयर मॅगझिनच्या ऑगस्ट महिन्याच्या कव्हरवर शर्मिला बिकिनी परिधान करून झळकल्या होत्या. भारतीय प्रेक्षकांनी प्रथमच अभिनेत्रीला बिकिनीमध्ये पोज देताना पाहिल्याने एकच खळबळ माजली होती. वाद एवढा वाढला की, संसदेतही या मुद्यावरून रणकंदन झाले. शर्मिला त्या काळातील पहिल्यात अशा अभिनेत्री होत्या, ज्यांनी एखाद्या मॅगझिनसाठी बिकिनी परिधान करून फोटोशूट केले होते. एवढेच नाही, तर फिल्मफेयर मॅगझिनसाठी बिकिनी पोज देणार्‍या त्या पहिल्या अँक्ट्रेस बनल्या.
असे सांगितले जाते की, शर्मिला जेव्हा फोटोशूटसाठी स्टुडिओमध्ये आल्या तेव्हा फोटोग्राफर धीरेन चावलाने त्यांना शूटसाठी काय परिधान करणार असे विचारले होते. त्यावेळी शर्मिला यांनी त्यांच्या पर्समधून टू पीस स्वीमसूट काढला आणि यात फोटोशूट करणार असल्याचे सांगितले. टू पीस बिकिनीत मॅगझिनमध्ये कलर फोटो आलेल्या शर्मिला या पहिल्या अँक्ट्रेस होत्या. काही दिवसातच हे कव्हर व्हायरल झाले आणि त्याच्याशी संबंधित वाद वाढत गेले.
१९६६ हे वर्ष शर्मिला टागोर यांच्या करिअरसाठी मैलाचा दगड ठरले. यावर्षीच्या त्यांचे पाच चित्रपट (अनुपमा, देवर, सावन की घटा, नायक, ये रात फिर न आएगी) प्रदर्शित झाले होते. पाचही चित्रपटांना चांगले यश मिळाले होते. काही वर्षांनी जेव्हा या फोटोशूटशी संबंधित प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावेळी त्या म्हणाल्या. आपला समाज तेव्हा पार रुढीवादी होता. अनेकांनी माझ्यावर प्रसिद्धीसाठी असे केल्याचा आरोप केला. अनेकांनी टोमणे दिले. पण मी असे का केले हे मलाही माहिती नाही.

No comments:

Post a Comment