Saturday, August 11, 2018

सुविचार संग्रह (भाग 4)


1)   टीका करणे, निंदानालस्ती करणे, तक्रार करणे कोणत्याही मूर्ख माणसाला सहज जमते आणि मूर्ख तेच करतात.-बेंजामिन फ्रँकलिन
2)   तुम्ही  जर यश मिळवणार  असाल तर तुम्हाला यशाच्या त्याच त्याच मळलेल्या वाटेवरून जाण्यापेक्षा नवी वाट शोधावी लागेल.-जॉन डी. राकेफेलर

3)   आशा तुम्हाला कधीच सोडून जात नाही,तुम्हीच तिला सोडता.- जॉर्ज वीनवर्ग
4)   समोरच्याला समजून घेण्यासाठी आणि क्षमा करण्यासाठी आत्मसंयमाची आणि विशेष गुणांची आवश्यकता असते.-बेंजामिन फ्रँकलिन
5)   कठोर मेहनतीशिवाय यशाचा प्रतीक्षा करणे म्हणजे तुम्ही जिथे पीक काढण्याचा प्रयत्न करत आहात,जिथे बियांची पेरणीच केली नाही.-डेव्हिड ब्लाए
6)   आपल्याला मोठेपणा मिळावा यासाठी तीव्र इच्छा मनी बाळगणे,हाच तर मानव आणि प्राणी यांच्यातील सर्वात मोठा फरक आहे.-डेल कार्नेगी
7)   काही वेळेस लोक इतरांची सहानुभूती मिळवण्याच्या आणि लक्ष वेधून घेण्याच्या नादात तारतम्य घालवतात आणि स्वत:चे महत्त्व वाढवण्यासाठी मूर्खासारखे वागतात.-डेल कार्नेगी
8)   क्रोधामुळे ज्ञानाचा प्रकाश विझून जातो आणि तुमच्याजवळ पश्चातापाशिवाय काही उरत नाही.- आर.जी. इंगरसोल
9)   घाव घालण्यासाठी लोखंड गरम होण्याची वाट पाहू नका, तर त्याला घाव घा घालून गरम करण्याचा प्रयत्न करा.-विलियम बी. स्प्रेंग
10) तुमच्यावर हल्ला करणार्या शत्रूला घाबरू नका. तुमची स्तुती करणार्या मित्रांपासून मात्र जपून राहा.-जनरल ओब्रेगॉन
11) कौतुक आणि स्तुती यामधील फरक काय? पहिले प्रामाणिक आहे आणि नंतरचे अप्रामाणिक आहे. कौतुक थेट तुमच्या हृदयातून येते,तर स्तुती म्हणजे निव्वळ तोंडाच्या वाफा दवडणे असते. कौतुक नि:स्वार्थी मनाने केलेले असते,तर स्तुती नेहमी स्वार्थी हेतूनेच केली जाते. कौतुक सर्वत्र वंद्य असते,तर स्तुती सर्वत्र निंद्य असते.
12) जगातील सर्वात मौल्यवान हिर्याहूनही ज्ञान अधिक मौल्यवान असते.-महात्मा गांधी
13) शहाणा माणूस संधी शोधण्यापेक्षा त्या स्वत:च निर्माण करतो.-फ्रॉन्सिस बेकन
14) ज्याला थोड्या गोष्टींबाबत सखोल ज्ञान असते त्यालाच तज्ज्ञ म्हणतात.- एन.एम. बटलर
15) एका माणसाच्या विनाशावर दुसर्याने आपल्या कीर्तीचा डोलारा उभा करण्याइतकेच पाप नाही.- जॉन प्रे
16) एक वेळ पेहराव जुना असला तरी चालेल,पण पुस्तके नवीन विकत घेऊन ज्ञानवृद्धी करा.- राल्फ इमर्सन
17) शिक्षण म्हणजे समाजोद्धाराचे प्रभावी साधन होय.- कर्मवीर भाऊ पाटील
18) माणसाची कृती त्याच्या विचारांचा आरसा असतो.-जॉन लॉक
19) चांगले काम शेवटास नेण्यासाठी वाईट उपाय योजू नयेत, नाही तर त्या कामाच्या चांगुलपणाचा बट्टा लागतो.-महात्मा फुले
20) वेळ व संधी येण्याची वाट बघण्यापेक्षा आपल्या कर्तबगारीने ती आणा.-लोकमान्य टिळक
21) जेथे कायदा संपुष्टात येतो,तेथे हुकुमशाही सुरू होते.-विल्यम एल्डर
22) कोठेही झालेला अन्याय सार्वजनिक न्यायास धोका निर्माण करणारा असतो.-मार्टिन ल्युथर
23) थोरांच्या मनात थोर ध्येये असतात तर इतरांच्या मनात केवळ इच्छा असते.- वॉशिंग्टन आयर्विन
24) उदात्त वृत्तीचा मनुष्यच व्यक्तींना आकर्षून घेतो.- जर्मन कवी गटे
25) कौशल्य आणि आत्मविश्वास हे अजिंक्य सैन्य आहे.-जो हर्बर्ट
26) सुप्त चैतन्य व निद्रिस्त शक्ती जागृत करण्याचे एक साधन म्हणजे शिक्षण होय.- विनोबा भावे
27) ज्ञानाची भूक ही माणसाची मूलभूत भूक असून ती मानवास पशुकोटीतून वर काढते.-दुर्गा भागवत
28) अर्धवट ज्ञानी हा दु:खाचा धनी असतो.- माधवनाथ
29) ज्याच्याजवळ धैर्यरुपी धन नाही त्याच्यासारखा निर्धन कुणीही नाही.-शेक्सपीअर
30) श्रद्धावान,बुद्धिमान, कर्तृत्ववान आणि ऐश्वर्यवान माणसाचे कोठेही गेले तरी स्वागतच होते.-गौतम बुद्ध
31) छापील पुस्तके वाचून खरे ज्ञान मिळत नाही तर ते अनुभवातूनच मिळते.-डॉ. राजेंद्रप्रसाद
32) जगानं तुम्हाला भलं म्हणावं असं वाटत असेल तर तुम्ही स्वत:बद्दल भलं बोलू नका.-पास्कल
33) स्वत:च्या अज्ञानाची जाणीव असणे,हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे.-स्वामी शिवानंद
34) विज्ञानाखेरीज आपल्याला भविष्य नाही,मात्र त्याला अध्यात्माचा लगाम हवा.-पं.जवाहरलाल नेहरू
(मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या संग्रहातून)

No comments:

Post a Comment