आदिल पाचवीत होता,त्यावेळेला त्याच्या बाबा- रईसने
त्याला पहिल्यांदा फुटबॉल आणून दिला. आदिलला फुटबॉल खेळण्यात
आनंद वाटू लागला. हळूहळू स्टेट टीमच्या कोचने आदिलला स्पोर्टस
अकादमीमध्ये समावेश करून घेतला. आदिलची प्रॅक्टीस चुकू नये,याची रईस खास करून काळजी घ्यायचा. आदिलला तयारी करायला
जवळपास पाच वर्षे लागली. पण त्याचा कधी टीममध्ये खेळण्याची संधी
मिळाली नाही. कमकुवत खेळाडू म्हणून त्याची सदानकदा राखीव खेळाडूंमध्येच
समावेश व्हायचा. दरवेळेला रईस त्याला विचारायचा,पण आदिल काहीच बोलायचा नाही. पण रईसला समजायचं.
मुलाचे मनोबल वाढवण्यासाठी तो नेहमी समजावण्याच्या सुरात म्हणायचा,
मला खात्री आहे की,एक दिवस तू असा खेळ खेळशील की,
संपूर्ण स्टेडियम फॅन होऊन जाईल.
दुर्दैवाने एक दिवस घरी परतत असताना
रईसचा एका अपघातात मृत्यू झाला. कोचने आदिलला एका
आठवड्याची सुट्टी दिली. पण आदिल दुसर्याच
दिवशी स्टेडिअमवर पोहचला. त्या दिवशी दुसर्या स्टेटच्या टीमसोबत मैत्रीपूर्ण लढत होती. आदिलचा संघ
पराभवाच्या छायेत होता. आदिलने कोचला त्याला खेळवण्याची विनंती
केली. कोचला माहित होतं की, त्याच्या संघाचा
पराभव होणार आहे. दुसरी टीम दोन गोलने पुढे होती. का कुणास ठाऊक,पण कोचने आदिलला खेळण्यासाठी मैदानात पाठवले.
सर्वच खेळाडू आदिलला पाहून चकित झाले,कारण दोन
दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. आणि आता तो
खेळण्यासाठी मैदानात होता. पाहता पाहता सामन्याचे चित्र पालटले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आदिलला मैदानात कुणीच
अडवू शकत नव्हते. थोड्याच वेळात टाईम ऑफ झाला आणि आदिलच्या संघाने
3-2 ने विजय मिळवला. संपूर्ण स्टेडिअममध्ये जल्लोष
सुरू झाला. टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला. आदिलला सर्वांनी आपल्या खांद्यावर घेतले.
तात्पर्य: अंगात वेड भरलं असेल,तर तुम्हाला
यशापासून कुणीच रोखू शकत नाही.
No comments:
Post a Comment