Sunday, August 5, 2018

ही काय खायची वस्तू आहे काय?


      हे जग अद्भूत चमत्कारांनी भरलेलं आहे. इथे काहीही घडू शकतं. त्याप्रमाणे या जगातील माणसं काहीही खावू शकतात. आपल्याला किळसवाणं वाटेल किंवा चमत्कारिक वाटेल,पण इथे असं घडू शकतं. आपण तरी भूक लागल्यावर आपल्याला आवडीचं खाणं खायला आवडतं. प्रत्येकाची खाण्याची,खाद्य पदार्थांची आवड वेगवेगळी आहे. अनेकांना आपल्या जिभेचे चोचले पुरवायला आवडतंदेखील.पण काही माणसं भूक लागल्यावर साबण, फोम,लोखंडाच्या जिनसा खातात किंवा पेट्रोल पितात. या जगात अशी सणकी,विचित्र माणसं आहेत, ती त्यांच्या हटके खाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहेत. सणक असेल किंवा एबनॉर्मेलिटीमुळं ही माणसं असं काही खातात की, ते पाहून आपल्याला म्हणावं वाटतं, ही काय खायची वस्तू आहे काय?

साबणाची वडी
अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये राहणारी टेंपेस्ट हेंडरसन ही 19 वर्षांच्या तरुणीला साबणाच्या वड्या खाण्याची सवय आहे. ही तरुणी आठवड्यातून कमीत कमी पाच साबण वड्या खाते. तिला साबण खाण्याचे व्यसन जडले आहे. ती आपल्या मुलाखतीत सांगते की, साबण खाल्ल्याने मला फ्रेश वाटते. सध्या तिच्यावर ही सवय सुटावी म्हणून बिहेवियरल थेरेपी सुरू आहे.
गादी आणि उशीतला कापूस
फ्लोरिडामध्येच राहणारी आणखी एक तरुणी आहे,ती गादी आणि उशीमधला कापूस खाते. या तरुणीचं नाव आहे, एडेल एडवर्डस. कुठेही गेली की, ती गादी किंवा उशी फाडते आणि त्यातला कापूस असो किंवा आणखी काही खायला सुरू करते. वास्तविक एडेलच्या आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे ती नैराश्याला बळी पडली होती. तेव्हापासून तिला ही सवय जडली आहे.
गैसोलीनचा शौकीन
चीनमध्ये राहणारा 71 वर्षांचा वृद्ध चेन जुजेन हा आपली भूक मिटवण्यासाठी गैसोलीन,पेट्रोल पितो. वास्तविक 1969 मध्ये त्यांना एकदा जोराचा खोकला आला होता आणि छातीत दुखू लागले होते. कोणी तरी एका वृद्ध व्यक्तीने त्यांना त्यावेळी थोडेसे केरोसिन तेल पिण्याचा सल्ला दिला होता. यामुळे त्यांना बरे वाटेल, असे त्यांनी सांगितले होते. विशेष म्हणजे त्यांनी थोडेसे केरोसिन पिले आणि दुसर्याच दिवशी त्यांना आराम पडला. मग काय! त्यांना केरोसिन पिण्याची सवयच लागली. त्याचबरोबरच पेट्रोलसुद्धा पिऊ लागले. गेल्या 45 वर्षांत त्यांनी आतापर्यंत 1.5 टन गैसोलीन पिले आहे.
लोखंडाच्या वस्तू
फ्रान्सचे राहणारे मिशेल   लोटीटो हे 57 वर्षांचे गृहस्थ लोखंड पिघळवणार्या मशीनपेक्षाही काही कमी नाहीत. हा विचित्र माणूस अंडी किंवा केळी खायला घाबरतो,कारण ते त्याला पचत नाहीत. आतापर्यंत या माणसाने 18 सायकली,15 शॉपिंग कार्ट, 7 टेलिव्हिजन सेट, 2 आयर्न बेड आणि 1 लोखंडी ताबूत,6 मेटेलिक वस्तू खाल्ल्या आहेत. या वस्तू तो छोट्या छोट्या तुकडे करून पाण्यासोबत खातो.

No comments:

Post a Comment