1) आपण जे पेरतो ते उगवते आणि नशीब आपल्याला
आपल्या दुष्कृत्यांचे फळ भोगायला लावते.-एपिक्टेट्स
2) प्रत्येक माणसाला त्याच्या पापाची
शिक्षा भोगावी लागते.जो माणूस कायम हे लक्षात ठेवेल तो कोणावर
रागावणार नाही. दुसर्याशी नीचपणाने वागणार
नाही,दुसर्याला शिवीगाळ करणार नाही,
तिरस्कार करणार नाही. सतत दुसर्याला दोष देत राहणार नाही आणि समोरच्याचा अपमान करणार नाही.-एपिक्टेट्स
3) जे लोक आपल्याला आवड्त नाहीत,त्यांच्याबद्दल विचार करण्यावर आपण एकही मिनिट घालवणार नाही.-जनरल एल्सिनोवर
4) रागीट माणूस विषारी असतो.-
कन्फ्युसिअस
5) कृतज्ञता हे खूप चांगल्या लागवडीचे
फळ असते. ते सर्वसाधारण सगळ्या लोकांकडून मिळत नाही.-डॉ.जॉन्सन
6) आज मी अशा लोकांना भेटायला जाणार
आहे, जे खूप जास्त बोलतात, जे खूप स्वार्थी
आहेत, ज्यांना अहमगंड आहे,जे कृतघ्न आहेत,पण त्यामुळे मला आश्चर्य वाटणार नाही किंवा त्यांच्यामुळं
मी अस्वस्थसुद्धा होत नाही,कारण अशा लोकांशिवाय जग असणार हे माझ्या
कल्पनेतसुद्धा बसत नाही.-बरा. मार्क्स
7) कृतज्ञता व्यक्त करण्यास विसरण्र,
हे लोकांसाठी नैसर्गिक आहे.जर आपण कृतज्ञतेची अपेक्षा
करत राहिलो तर आपला कपाळमोक्ष होईल आणि आपल्याला हृदयविकार जडेल.-लेखक डेल कार्नेगी
8) या जगात प्रेम मिळवण्याचा फक्त एकच
मार्ग आहे- तो म्हणजे प्रेम कधीही मागू नका आणि त्याच वेळी निरपेक्ष
बुद्धीने दुसर्यावर प्रेम करा.
9) आपल्याला जर आनंद मिळवायचा असेल तर
आपण कृतज्ञतेबद्दल विचार करणे थांबवले पाहिजे आणि फक्त आपल्या आंतरिक आनंदासाठी दुसर्याला आनंद दिला पाहिजे.-अॅरिस्टॉटल
10) सापाच्या विषारी दातांपेक्षा कृतघ्न
मुले किती अधिक विषारी आहेत.-शेक्सपिअरचा किंग लिअर
11) कृतघ्नता हा नैसर्गिक आहे. ती रानटी तणाप्रमाणे असते. कृतज्ञता ही गुलाबाच्या रोपाप्रमाणे
असते. तिची मशागत करावी लागते.पाणी घालावे
लागते.त्याची लागवड करावी लागते आणि त्याला जपावे लागते.-डेल कार्नेगी
12) जर तुम्हाला ताजे, शुद्ध पाणी प्यायला असेल आणि जेवणचावेळेस अन्न उपलब्ध असेल तर तुम्हाला कधीही
कशाविषयीही तक्रार करण्याचे कारण नाही.- एडी रिकेनबॅकर
13) मी मूर्खासारखा कशाची काळजी करतो आहे?-एक जवान
14) सगळ्यात उत्तम डॉक्टर म्हणजे डॉक्टर
डाएट, डॉक्टर क्वाएट आणि डॉक्टर मेरीमन-जोनाथन स्विफ्ट (गलिव्हर्स ट्रॅव्हल्सचा लेखक
15) आपण आपल्याकडे जे आहे त्याचा क्वचितच
विचार करतो आणि जे नाही त्याबद्दल झुरत बसतो. हीच खरी आपली शोकांतिका
आहे.-डेल कार्नेगी
16) प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टीने
पाहण्याचा धडा हा वर्षाला एक हजार पौंड कमावण्यापेक्षा अधिक मोलाचा असतो.-एक विचार
17) तुमच्या आयुष्यात दोन ध्येये असली पाहिजेत-पहिले म्हणजे तुम्हाला हवे ते मिळवणे आणि दुसरे म्हणजे त्याचा उपभोग घेणे.
फक्त शहाणा माणूसच दुसरे ध्येय गाठू शकतो.-लोगन
पिअसॉल
18) तुमच्याजवळील चांगल्या गोष्टींचा विचार
करा. वाईट गोष्टी विसरून जा.-डेल कार्नेगी
19) आपण इतरांची नक्कल करू नये.
स्वत:ला ओळखा आणि स्वत्त्व जपा. डेल कार्नेगी
20) नशिबाने आपल्याला लिंबू दिले तर,
त्याच्यापासून सरबत करायला शिका. थोडक्यात संधीचे
सोने करा.-एक सुविचार (मच्छिंद्र ऐनापुरे
यांच्या संग्रहातून)
No comments:
Post a Comment