एक साधू जंगलात झोपडी बांधून राहत होता. तो सरयू ब्राम्हण होता. त्यामुळे
त्याला लोक सरयू ब्राम्हण म्हणूनच ओळखत होते.तो देवाचा मोठा भक्त
होता. पाच मैल दूर रोज आंघोळ करायला जात असे.
एक दिवस साधूला थोडा ताप आला. तरीही तो रोजच्याप्रमाणे नदीवर स्नान करून आला.
दुसर्यादिवशी मात्र अंगात चांगलाच ताप चढला.
डोके तर इतके दुखत होते की, त्याला बसतादेखील येत
नव्हते.
साधूला पूजा करायची होती. स्नानाशिवाय तो कधीच पूजा-पाठ करत
नसे. इतकेच नव्हे तर जलग्रहणदेखील करत नव्हता. त्याने स्नानाला जाण्याचा निश्चय केला. काही अंतर चालून गेल्यावर त्याला चक्कर आली. तो एका झाडाखाली
विश्रांतीसाठी बसला. थोड्या वेळात झाडाच्या गार सावलीखाली त्याला
झोप आली.
साधूला जाग आली, तेव्हा त्याने पाहिले की, सूर्य
अगदी माथ्यावर आला आहे. तो भरभर चालू लागला. पण अचानक त्याच्या पायाला ठेस लागली. दगडाला पायाला जोराची
ठोकर लागल्याने त्यातून
रक्त येऊ लागले.
आजारपणामुळे साधू आधीच क्षीण झाला होता. त्याच्या अंगात त्राण उरले नव्हते. आता तर त्याला पुढे चालणे अशक्यच झाले. जरा दुखायचे थांबल्यावर
तो पुन्हा चालू लागला. नदी अजून बरीच दूर होती.नदीवर जाण्यापूर्वीच तो जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला.
ज्यावेळेला त्याचे डोळे उघडले,त्यावेळेला त्याच्यासमोर एक ब्राम्हण उभा असलेला दिसला.सरयू साधूने विचारले, “तुम्ही कोण आहात? काय हवंय तुम्हाला? ”
ब्राम्हण म्हणाला, “ मी एक साधासुधा ब्राम्हण आहे.तुम्ही थोडे पाणी प्या. तुम्हाला बरे वाटेल. ”
“ स्नान केल्याशिवाय पाण्याचा थेंबही
घेत नाही. ” सरयू साधू निश्चयाने म्हणाला.
ज्यावेळेला खूप सांगूनही साधू पाणी प्याला
नाही,त्यावेळेला तो ब्राम्हण खर्या वेशात
आला. म्हणाला, “ सरयू, मी जलदेवता वरुण. मी तुझ्या तपस्येवर खूप प्रसन्न झालो
आहे. बोल, तुला काय हवंय. ”
वरुण देवाला साक्षात समोर पाहून सरयू
साधूला फार आनंद झाला. म्हणाला, “ वरुण देवा, जर तुम्हाला मला काही द्यायचे असेल,
एक नदी द्या. जवळपास एकही नदी नाही. प्राणी-पक्ष्यांनादेखील पाण्यासाठी दूर-दूरपर्यंत भटकंती करावी लागत आहे. त्यांचेही पाण्याशिवाय
खूप हाल होताहेत. ”
वरुणदेवाने आशीर्वाद दिला, “तुला जसं हवं,तसं होईल.
इथून वाहणारी नदी पुढे सरयू नावाने ओळखली जाईल. ”
पर्वत रांगांमधून निघणार्या या नदीला सरयू नावाने ओळखळे जाते,याच नदीच्या काठी आयोध्या नगरी वसली आहे.
No comments:
Post a Comment