Wednesday, December 20, 2017

हवीहवीशी ढोबळी मिरची

     युरोपियन लोकांच्या आवडीची भाजी असलेली ढोबळी मिरची ब्राझीलमध्ये उगम पावली आणि भारताल्या सिमला प्रांतात अवतरली. नंतर ती उत्तर प्रदेशात गेली. नंतर ती संपूर्ण भारताची झाली. तिच्या रुचकर चवीमुळे तिने भारतीयांच्या ताटात आपले स्थान पक्के केले. तिच्या औषधी गुणांमुळे ती आबालवृद्धांची आवडती झाली. तिखटपणा नसलेल्या या भाजीने हॉटेल, खानावळीत तर आपले स्थान अगदीच पक्के करून टाकले आहे. ही मिरची वर्षभर बाजारात उपलब्ध असते. त्यामुळे दुसरी कुठली हिरवी भाजी दिसली नाही तरी हमखास गिर्हाईक तिला आपल्या घरी घेऊन जातं. तिला असलेल्या सततच्या मागणीमुळे शेतकरी बांधवही तिचे पीक मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे दिसून येते.

     कमी पाण्यात आणि कमी कष्टात ही ढोबळी मिरची शेतकर्याला चांगले उत्पन्न मिळवून देते. त्यामुळे काही शेतकरी वर्षभर हेच पीक घेऊन आपल्या घरात समृद्धी आणताना दिसत आहेत. आपल्या महाराष्ट्रात ही मिरची थोडीशी मोठी म्हणजे ढबू असल्याने तिचे ढोबळी असे नामाकरण झाले असले तरी ती अन्य सिमला मिरची म्हणून ओळखली जाते.
ही ढोबळी मिरची भाजीपाला पिकांमध्ये नगदी पीक म्हणून ओळखली जाते. मिरची हे नगदी पीक आहे. आपल्या दररोजच्या आहारात मिरची अविभाज्य घटक बनली आहे.
    मिरचीमध्ये विविध औषधी गुणधर्म देखील आढळतात. ‘ ‘, ‘’, ‘आणिजीवनसत्व असलेली मिरची रक्तवर्धक आणि कृमीनाशक आहे. शेतकर्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणणार्या या मिरचीने सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातल्या टाकळी गावच्या सुधीर जनगोंडा पाटील यांच्याही जीवनात समृद्धी आणली आहे. या शेतकर्या दीड एकरात तब्बल 12 लाख रुपयांचे ढोबळी मिरचीचे उत्पन्न घेतले आहे.
     वास्तविक सांगली जिल्ह्यात मिरज पूर्वभाग ढोबळी मिरचीच्या उत्पादनात अग्रेसर म्हणून ओळखला जातो. येथून गतवर्षी दररोज दोनशे ते अडीचशे टन ढबूची मुंबई व दिल्ली येथे निर्यात होत असते. अधिक उत्पादन झाल्यावर दर पडतो, हा नेहमीचा अनुभव आहे. तसाच प्रकार या भागातही झाला. तर काही ठिकाणी रोगाला बळी पडल्याने काही शेतकर्यांनी मिरची पीक उखडून टाकले.
     पावसामुळे परिसरातल्या शेतकर्यांनी मिरची पीक उखडून टाकले तरी  अनेक संकटांवर मात करीत सुधीर पाटील यांनी मात्र विक्रमी उत्पादन घेतले आहे. मल्लेवाडी येथे दीड एकरामध्ये जूनमध्ये ढोबळीच्या रोपांची लागण केली. त्यांनी पहिल्यांदा नांगरट व रोटर मारून बेड तयार करून घेतला. रसायन व शेणखत घातले. त्याच्यावर परत मातीचा बेड तयार करून मल्चिंग पेपर टाकून जून महिन्यात सव्वा फुटावर एक छिद्र मारून ढोबळी मिरचीची रोपे लावली. पाण्याच्या नियोजनासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. दीड एकरामध्ये 14 हजार रोपांची लागवड केली. रोपांची लागवड केल्यापासून 48 दिवसांत पहिली तोड आली. साडेचार महिन्यांमध्ये त्यांनी 52 टन ढोबळीचे उत्पादन घेऊन 12 लाखांचे उत्पन्न घेतले आहे. अजून दोन महिन्यांपर्यंत ढोबळीची तोड चालू राहणार आहे. त्यामुळे उत्पादनात आणखी वाढ होणार आहे. आवक कमी झाल्याने किलोस 25 रुपये दर मिळत आहे. मुंबई, दिल्लीसह अन्य भागात पाटील यांच्या ढोबळी ची विक्री होत आहे.
     योग्य नियोजन केल्यास आणि खराब हवामानात पिकांची काळजी घेतल्यास भरघोस पिक घेऊन चांगला नफा मिळवता येतो, हे सुधीर पाटील यांनी आपल्या मेहनतीतून दाखवून दिले आहे.

No comments:

Post a Comment