Sunday, December 10, 2017

बेरोजगारीत भारत अव्वल

     
वाढती लोकसंख्येबरोबरच वाढणारी बेरोजगारी जगाचीच एक मोठी समस्या बनली आहे. आणि आपल्या भारतात तर ती एक कलंक म्हणून पुढे येत आहे. आपल्या आशिया खंडात आपल्या देशाचा बेरोजगारीचा दर हा सर्वात अधिक आहे. आणि हीच सध्या चिंतेचा विषय आहे. सत्ताधारी मंडळी कितीही आश्वासने देत असले तरी बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी कित्येक दिव्ये पार पाडूनही काही उपयोग होईनासा झाला आहे. सरकार रोजगार उपलब्ध करण्यास असमर्थ ठरत आहेत.त्यामुळे आणखी काही वर्षांनी आपल्या देशाचे काय होणार, अशी भीती सगळ्यांच्याच मनात घर करून बसली आहे. सरकारच्या एका आकडेवारीनुसार आपला देशाचा बेरोजगारीचा दर 8.0 इतका आहे. दुसर्या क्रमांकावर फिलिपिन्स (5.6) आणि तिसर्या क्रमांकावर इंडोनेशिया (5.5) आहे. आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी चीन चौथ्या क्रमांकावर सून त्याचा बेरोजगारीचा दर 4 टक्के आहे. म्हणजे आपला दर हा चीनपेक्षा दुप्पट आहे. यानंतर दक्षिण कोरिया,मलेशिया, जपान, सिंगापूर आणि थायलंड या देशांचा क्रमांक लागतो. थायलंडचा बेरोजगारी दर 1.3 असा आहे. आपल्या देशातल्या वाढत्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताची अवस्था पारच चिंता करण्यासारखी आहे. कारण चीनसारख्या मोठ्या देशाबरोबरच अनेक लहान देश चांगले प्रदर्शन करत आहेत. उद्योग क्षेत्रात नोकर्या कमी होत आहेत. आधीच आपल्या देशातल्या केंद्र सरकारसह अनेक राज्यांनी कित्येक वर्षे झाली नोकरभरती स्थगित ठेवली आहे.त्यामुळे सर्वच क्षेत्रात नोकर्यांचे दरवाजे बंद झाले आहेत. उद्योगधंदे,व्यवसाय करायला कुशल मनुष्यबळाचा अभाव दिसून येत असून बँकाही कर्ज द्यायला तयार नसल्याने आपल्या देशातल्या बेरोजगारांची अवस्था फारच वाईट झाली आहे.

No comments:

Post a Comment