ज्यांना स्वप्नात
भाकर्या दिसू लागल्या,
ते स्वप्नात पोट
भरून खात राहिले।
कित्येक पिढ्या-पिढ्या जे मजूर आहेत,
ते डोक्यावर डोंगर
वाहून घेत राहिले।
अंगरक्षकाशिवाय
त्यांची घाबरगुंडी उडते,
ते प्रत्येक रात्र जागून काढू लागले।
जे सत्तेला चिकटून
आहेत, ते प्रत्येक वेळेला,
कलमवीरांना घाबरत
राहिले।
अशी माणसेच वाटतात, फार कठीण,
जे वाद-विवाद लपवत राहिले।
जे हसू इच्छित
नव्हते,पण
ते लाचारपणातही
हसत-हसवत राहिले।
काही डाव जे आजमावावयाचे
नव्हते,
ते वेळ
पाहून आजमावत राहिले।
No comments:
Post a Comment