धुम्रपान मधुमेह
वाढवतो
डायबिटीजच्या रुग्णांना
धुम्रपान करण्याची सवय मृत्यूचा धोका दुप्पट ठरणार आहे. अमेरिकेच्या कोलोरोडो युनिव्हर्सिटीमध्ये
लागलेल्या शोधानुसार हा अभ्यास स्मोकिंग करणार्या डायबिटीक आणि
सामान्य लोकांच्या दरम्यान करण्यात आला. शोधात समोर असे आले आहे
की, 13 टक्के मधुमेही लोकांची परिस्थिती अगदी गंभीर होऊन त्यांचा
मृत्यू झाला तर सामान्य लोकांची टक्के वारी 6.8 इतकी होती.
वायू प्रदूषण जगाला
ताप
वायू प्रदूषण भारताबरोबरच
जगाची समस्या बनली आहे. मागे दिल्लीतील प्रदूषणाची परिस्थिती भयानक अनुभवास आली. कमी-जास्त प्रमाणात आपल्या देशातल्या अन्य महत्त्वाच्या
शहरांमध्ये परिस्थिती असून त्यामुळे लोकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.
जगातही या समस्येने मोठी उचल खाल्ली आहे. शरीर
विज्ञान आपल्याला सातत्याने वायू प्रदूषणापासून बचाव करण्याचा सल्ला देत आला आहे.
शास्त्रज्ञांच्या एका शोधानुसार असे आढळून आले आहे की, वायू प्रदूषणमुळे जगातील 100 लाखपेक्षाही अधिक लोक क्रॉनिक
किडनी डिजीजचे बळी ठरत आहेत. अमेरिकेतल्या क्लिनिकल एपिडेमियोलोजी
सेंटरच्या शास्त्रज्ञांनी वरील निष्कर्ष काढला आहे. थंडीच्या
दिवसांत वायू प्रदूषणाचा स्तर वाढतो, त्यामुळे या काळात बाहेर
पडताना चेहर्यावर मास्क लावणे, फायद्याचे
ठरणार आहे.
No comments:
Post a Comment